Chickpea: ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिके धोक्यात, काय आहे कृषितज्ञांचा सल्ला?

सातत्याने होत असलेल्या वातावरणातील बदलामुळे उत्पादनात घट होण्याचा तर धोका आहेच पण शेतकऱ्यांची मेहनत आणि कष्टही निष्फळ ठरत आहेत. रब्बी हंगामातील बदललेल्या पीक पध्दतीमुळे मुख्य पिकाची जागा ही हरभरा पिकाने घेतलेली आहे. तर याच पिकावर अधिकचा परिणाम झालेला आहे. अशा प्रतिकूल परस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आधार मिळतो तो कृषितज्ञांच्या सल्ल्याचा.

Chickpea: ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिके धोक्यात, काय आहे कृषितज्ञांचा सल्ला?
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 17, 2022 | 12:36 PM

लातूर : उत्पादनवाढीच्या शेतकऱ्यांच्या नियोजनाला कायम निसर्गाच्या लहरीपणाचा अडसर ठरलेला आहे. जी स्थिती खरीप हंगामातील पिकांची झाली होती त्यापेक्षा विदारक अवस्था ही (Rabi Season) रब्बी हंगामात पाहवयास मिळत आहे. सातत्याने होत असलेल्या वातावरणातील बदलामुळे उत्पादनात घट होण्याचा तर धोका आहेच पण शेतकऱ्यांची मेहनत आणि कष्टही निष्फळ ठरत आहेत. रब्बी हंगामातील बदललेल्या पीक पध्दतीमुळे मुख्य पिकाची जागा ही (chickpea crop) हरभरा पिकाने घेतलेली आहे. तर याच पिकावर अधिकचा परिणाम झालेला आहे. अशा प्रतिकूल परस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आधार मिळतो तो (advice from farmers, agronomist) कृषितज्ञांच्या सल्ल्याचा. त्यामुळे पिकांचे रक्षण आणि घ्यावयाची काळजी याबाबत अचूक माहिती मिळाल्याने किमान वेळीची आणि अधिकच्या होणाऱ्या खर्चाची तरी बचत होते. त्यामुळे सध्याच्या प्रतिकूल परस्थितीमध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असाच सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत यांनी दिला आहे.

पिकावर किडीचा प्रादुर्भाव कशामुळे?

सध्याच्या वातावरणातील बदलाचा परिणाम सर्वाधिक फटका हरभरा पिकाला बसत आहे. सकाळचे धुके अन् दिवसफर ढगाळ वातावरण यामुळे पिकांवर किडीचा किंवा रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. हे वातावरण रोग वाढीस पोषक असते. विशेषत: हरभरा या पिकावर घाटीअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. शिवाय नोव्हेंबर ते मार्च दरम्यानच या अळीचा अधिकचा धोका असतो.

पिकाचे नेमके काय होते नुकसान?

हरभरा हे पीक ऐन फुलोऱ्यात असतानाच या अळीचा प्रादुर्भाव वाढतो. पीक वाढीच्या अवस्थेत असतानाच लहान अळ्या सुरवातीला कोवळी पाने, कळ्या, फुले कुरतडून खातात. तर घाटे लागल्यानंतर अळ्या घाटे कुरतडून अपरिपक्व तसेच परिपक्व दाणे खातात. एक अळी ही 30 ते 40 घाट्यांचे सहज नुकसान करते. या किडीचा प्रादुर्भाव वाढल्यास अधिकचे नुकसान हे ठरलेले आहे.

काय आहेत उपाययोजना?

अशा प्रसंगी सर्वात महत्वाचे आहे ते पिकांचे संरक्षण. याकरिता प्रतिएकरी शेतकऱ्यांना 2 कामगंध सापळे लावावे लागणार आहेत. किडीचा प्रादुर्भाव अधिकचा असेल तर मात्र, इमामेक्टीन बेंझोएट 4.5 ग्रॅम हे प्रति 10 लिटर पाण्यात याप्रमाणे प्रतिएकर 88 ग्रॅम क्लोरॅट्रानिलीप्रोल 18.5 टक्के 3 मिली प्रती 10 लिटर पाणा याप्रमाणे प्रतिएकर 125 ग्रॅम फवारावे लागणार आहे. जमिनीलगत रोपे कुरताडणाऱ्या अळीसाठी क्लोरपायरीफॉस 20 टक्के 20 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे प्रतिएकर 400 मिली खोडाभोवती आवळणी करणे फायद्याचे ठरणार आहे. असा सल्ला डॉ. दिगंबर पटाईत यांनी दिला आहे. (मात्र, ही केवळ शेतकऱ्यांना माहिती देण्याच्या उद्देश आहे, शेतकऱ्यांनी औषधाची योग्य तपासणी करुनच फवारणी करावी)

संबंधित बातम्या :

Crop Insurance : वातावरणातील बदलाचा परिणाम थेट रब्बी पीकविमा योजनेवर, गतवर्षीच्या तुलनेत काय झाले बदल? वाचा सविस्तर

पारंपरिक पिकांवर कृषी विभागानेच शोधला पर्याय अन् नगर जिल्ह्यात झाला हा बदल, वाचा सविस्तर

Rabi Season: अवकाळी, गारपिटीनंतर आता धुक्याचे सावट, खरिपापाठोपाठ रब्बीही धोक्यात

Non Stop LIVE Update
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा.
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?.
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग.
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?.
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?.
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?.
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार.
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.