ऊसातील तणामुळे दुहेरी नुकसान, वेळीच बंदोबस्त केला तर उत्पादनात होणार वाढ

| Updated on: Dec 11, 2021 | 8:40 AM

महाराष्ट्रात ऊसाचे पीक हे तीन हंगामात घेतले जाते. यामध्ये आडसाली, पूर्वहंगामी आणि सुरू हंगामी असे प्रकार आहेत. ऊसाचे पीक हे वर्षभर शेतात उभे असते, त्यामुळे ऊसात तणाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. ऊस लागवडीनंतर ऊस उगवायला साधारण 12 ते 15 दिवस लागतात परंतु तण हे तीन ते पाच दिवसातच उगवते. वाढत्या तणामुळे उत्पादनात 40 ते 50 टक्के घट येते त्यामुळे वेळेवर तण नियंत्रण करणे गरजेचे आहे.

ऊसातील तणामुळे दुहेरी नुकसान, वेळीच बंदोबस्त केला तर उत्पादनात होणार वाढ
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

लातूर : ऊस हे सर्वात मोठे नगदी पीक आहे. काळाच्या ओघात सिंचनाची सोय होत असल्याने क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. (Sugarcane crop) ऊस उत्पादनाच्या दृष्टीने महाराष्ट्र हे एक महत्वाचे राज्य आहे. महाराष्ट्रात ऊसाचे पीक हे तीन हंगामात घेतले जाते. यामध्ये आडसाली, पूर्वहंगामी आणि सुरू हंगामी असे प्रकार आहेत. ऊसाचे पीक हे वर्षभर शेतात उभे असते, त्यामुळे ऊसात तणाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. ऊस लागवडीनंतर ऊस उगवायला साधारण 12 ते 15 दिवस लागतात परंतु तण हे तीन ते पाच दिवसातच उगवते. वाढत्या ( weed killer) तणामुळे उत्पादनात 40 ते 50 टक्के घट येते त्यामुळे वेळेवर ( proper management) तण नियंत्रण करणे गरजेचे आहे. उत्पादनवाढीसाठी शेतकरी अनेक प्रयत्न करतात पण मूलभुत बाबींकडेच दुर्लक्ष होते त्यामुळे वेळीच तणाचा बंदोबस्त केला तर ऊसाच्या उत्पादनात तर वाढ होणारच आहे पण शेतजमिनीचा दर्जाही टिकून राहणार आहे.

ऊसात आढळणारे तण

लव्हाळा, हरळी, कुंदा, रेशीमकाटा, गाजरगवत ही तणे तीनही हंगामात दिसून येतात. चांदवेल व खांडकूळी ही आता ऊस लागवड क्षेत्रात सगळीकडे दिसून येत आहेत. हे वेलवर्गीय तण असून मोठ्या बांधणी नंतर ते ऊसाची पाने गुंडाळण्यास तसेच वाढीवर परिणाम करतात. त्यामुळे उत्पादनात घट येते व तोडणीसही अडथळा निर्माण होतो. त्यामुळे तण नियंत्रणासाठी पूर्ण कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत शेतात पसरावे, शेतातील बांध तसेच पाण्याचे पाट तण विरहित ठेवावे लागणार आहेत. हिरवळीच्या पिकाचे बी घेताना त्यात तणांचे बी नसावे. तर तणे फुलावर येण्यापूर्वी त्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.

तणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना

ऊस लागवडीसाठी शेत तयार करताना उभी आडवी नांगरट करावी. यावेळी लव्हाळ्याच्या गाठी, हळदीच्या काश्या, कुंदाची खोडे व मुळे वेचून ती जाळावीत. टारफुलासारखी परोपजीवी तण ज्वारीच्या पिकातून ऊसात येते. त्यासाठी या तणाचा बंदोबस्त उभी ज्वारी असतानाच करावा व ज्वारीनंतर उसाचे पीक घेऊ नये. तणे काढताना ती मुळासकट काढली तर त्याचा फायदा होतो नाही तर ते तण पुन्हा जोमाने वाढते. त्यामुळेच खुरपणी ही वेळेवर व तणे मुळासकट काढणे आवश्यक आहे.

आंतरपिकाचे महत्व

आंतरपीकांमुळे तणांचे नियंत्रण होते द्विदल वर्गातील आंतरपीके ऊसात घेतल्यास हवेतील नत्राचे जामिनीत स्थिरीकरण होऊन नत्राची उपलब्धता वाढते. बैल किंवा ट्रॅक्टर औजारांच्या साह्याने मोठ्या बांधणीपूर्वी व नंतर देखील अंतरमशागत करावी. पट्टा पद्धत व रुंद सरीमध्ये पाचटाचे अच्छादन करावे किंवा आंतरपीके व हिरवळीचे पीक घेऊन त्याचे आच्छादन करावे.

रासायनिक पद्धतीने तणनियंत्रण

रासायनिक तणनाशकांचा वापर करून तणांचा बंदोबस्त करता येऊ शकतो. तण नाशकाची पहिली फवारणी उस लागवडीनंतर जमिनीच्या वापश्यावर 3 ते 5 दिवसांनी व दूसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर 30 दिवसांनी करावी.

तणनाशके फवारणी करताना घ्यावयाची काळजी

ऊसाची लागण झाल्यानंतर 3 ते 5 दिवसांनी ॲट्राटूप हे तणनाशक जमीन वापश्यावर असतांना हेक्टरी 5 किलो 500 लिटर पाण्यातून सर्वत्र फवारावे. त्यानंतर मोठ्या बांधणीपर्यत आवश्यकतेनुसार एक खुरपणी व एक किंवा दोन कुळपण्या कराव्यात. फवारणी करताना ढगाळ, पावसाळी वातावरण असताना करू नये. तणनाशाक शक्यतो तणांवर फवारावे, ऊसावर फवारले जाणार नाही याची काळजी घ्यावी. त्यासाठी नोझला प्लॅस्टीकच्या हुड वापरता येतो. वाऱ्याच्या दिशेने फवारणी करावी. स्वच्छ सुर्यप्रकाशत वारा शांत असतांना तणनाशके फवारल्यास तणनाशकाची क्रिया शिलता वाढते. तणनाशक फवारणीसाठी सपाट, फ्लॉट नोझल वापरावा.

संबंधित बातम्या :

Pik Vima : अखेर पीक विमा रक्कम जमा होण्यास सुरवात, ज्यांना अडचण आहे त्यांचे काय?

‘या’ आम्लाचा वापर करा अन् ओसाड शेतजमिनही सुपिक बनवा, उत्पादनात वाढ अन् जमिनीचेही आरोग्य सुधारणा

कधी नव्हे ते सुर्यफूलाच्या क्षेत्रात वाढ, आता वाढीव उत्पादनासाठी ‘असे’ करा व्यवस्थापन..!