‘या’ आम्लाचा वापर करा अन् ओसाड शेतजमिनही सुपिक बनवा, उत्पादनात वाढ अन् जमिनीचेही आरोग्य सुधारणा

'या' आम्लाचा वापर करा अन् ओसाड शेतजमिनही सुपिक बनवा, उत्पादनात वाढ अन् जमिनीचेही आरोग्य सुधारणा
संग्रहीत छायाचित्र

. जमिनीची पोत वाढविणे हे मोठे आव्हान नाही. मातीची रचना सुधारण्यासाठी आणि खतक्षमता वाढविण्यासाठी ह्यूमिक आम्ल वरदान ठरत आहे. बाजारात मिळणारे ह्यूमिक आम्ल खरे तर पोटॅशियमचा महत्वाचा भाग आहे. हे ह्यूमिक आम्ल हे पिकांवर कोणताही विपरीत परिणाम करत नाही. ह्यूमिक अॅसिड हे लिग्नाइट, पीट आणि माती समूहसारखा सेंद्रिय पदार्थांचा एक घटक आहे. त्यामुळे रोपाचे वाढ आणि सुधारणा होते.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: राजेंद्र खराडे

Dec 10, 2021 | 4:05 PM

मुंबई : शेती व्यवसयात जसा बदल होत आहे त्याचप्रमाणे वेगवेगळे शोधही लागत आहेत. आपण उत्पादन वाढीचा विचार करतो पण (Agricultural land) जमिनीच्या आरोग्याकडे अक्षम्य दुर्लक्ष. हानिकारक रसायने असलेल्या खतांच्या वापरामुळे जमिनीची पोत कमी होतो. त्याचा थेट परिणाम हा उत्पादनावर होतो. जमिनीची पोत वाढविणे हे मोठे आव्हान नाही. मातीची ( land cultivation) रचना सुधारण्यासाठी आणि खतक्षमता वाढविण्यासाठी ह्यूमिक आम्ल वरदान ठरत आहे. बाजारात मिळणारे ह्यूमिक आम्ल खरे तर पोटॅशियमचा महत्वाचा भाग आहे. हे ह्यूमिक आम्ल हे पिकांवर कोणताही विपरीत परिणाम करत नाही. ह्यूमिक अॅसिड हे लिग्नाइट, पीट आणि माती समूहसारखा सेंद्रिय पदार्थांचा एक घटक आहे. त्यामुळे रोपाचे वाढ आणि सुधारणा होते.

ह्यूमिक अॅसिड म्हणजे काय?

कृषितज्ञ डॉ. एस. के. सिंग यांच्या मते, ह्यूमिक आम्ल हे एक विविध बाबींवर उपयुक्त खनिज आहे. त्याचा वापर करून पडीक जमीनही सुपीक करता येते. जमिनीत ओलावा राखण्यासाठी हे उपयुक्त पडत आहे. यामुळे जमिनीत खत चांगले विरघळवते आणि वनस्पतींपर्यंत ते पोहोचते. तसेच जमिनीत नायट्रोजन आणि लोह जोडले जाते.

ह्यूमिक आम्ल तयार करण्याच्या पद्धती

डॉ. एस. के. सिंग यांच्या मते, हुमिक आम्ल बनवण्याची पद्धत जर शेतकऱ्यांना अवगत झाली तर उत्पादनात वाढ होणार आहे. ती तयार करण्यासाठी 2 वर्ष जुन्या शेणाचे गौऱ्या आणि सुमारे 50 लिटर क्षमतेचे पाण्याचे ड्रम आवश्यक आहेत. ते तयार करण्यासाठी प्रथम शेणाच्या गौऱ्यांनी ड्रम भरा. मग 30 लिटर पाण्याने ड्रम भरून 7 दिवस झाकून ठेवा. 7 दिवसानंतर त्या ड्रममधील पाणी गडद लाल व तपकिरी झालेले असेल. नंतर ड्रममधून सर्व शेन काढून कापडाने पाणी गाळून घ्या. आणि हे पाणी ह्यूमिक आम्ल म्हणून वापरा.

ह्यूमिक अॅसिड कसे वापरावे?

ड्रममध्ये तयार केलेले पाणी जमिनीत मिसळा. वनस्पती लावण्यापूर्वी त्यात मुळे या पाण्यात बुडवायची. कीटकनाशकांमध्ये मिसळलेले पिकांवर फवारणी करा. रासायनिक खतांमध्ये मिसळूनही वापरले जाऊ शकते. ठिबक सिंचन तसेच त्याचा वापर करता येतो.

नेमका काय फायदा होतो

* ह्यूमिक आम्ल हे वनस्पतींच्या आत एन्झाइम्स आणि हार्मोन्सउत्तेजित करते * मूळ श्वसन आणि दुय्यम आणि तृतीयक मुळे तयार होतात. * वनस्पतींची मुळे आणि पानांद्वारे सूक्ष्म पोषक द्रव्यांची उपलब्धता वाढते * वनस्पतींच्या आत जीवनसत्त्वांचे प्रमाण वाढते * वनस्पतींमध्ये प्रकाशसंश्लेषण वाढते * मातीमध्ये हवा वाढवते * पाणी धारण करण्याची क्षमता वाढते * हे वनस्पतींमध्ये पोषक तत्त्वांचे शोषण वाढवते

वापराची पद्धत

ह्यूमिक आम्ल वनस्पती फुलण्यापूर्वी किंवा सक्रिय वनस्पतिजन्य अवस्थेत सकाळी किंवा संध्याकाळी सर्व पिकांसाठी मासिक अंतराने ह्यूमिक आम्लाची पानदार फवारणी-3 मिली 1 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करु शकता.

संबंधित बातम्या :

कधी नव्हे ते सुर्यफूलाच्या क्षेत्रात वाढ, आता वाढीव उत्पादनासाठी ‘असे’ करा व्यवस्थापन..!

Banana Farming : गांधेलीच्या केळीची चवच न्यारी… शेतकऱ्यांचा निर्धार आता ब्रँड करण्याचा..!

सोयाबीनच्या दराने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर, आता साठवणूक ठरणार का फायद्याची?

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें