सोयाबीनच्या दराने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर, आता साठवणूक ठरणार का फायद्याची?

सोयाबीनच्या दराने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर, आता साठवणूक ठरणार का फायद्याची?
लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती

आता गेल्या तीन दिवसांमध्ये लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 250 रुपयांनी घसरण झाली आहे. दिवाळीनंतर कायम दर हे वाढलेलेच आहेत पण आता आवक वाढत आहे तर दर हे कमी होत आहे. आतापर्यंत शेतकरी सोयाबीनच्या साठवणूकीवर भर देत होते पण बाजारपेठेतील चढ-उतार आणि केंद्र स्तरावर ठरणारे निर्णय यामुळे शेतकऱ्यांनाही आता दराची काळजी वाटू लागली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: राजेंद्र खराडे

Dec 10, 2021 | 1:52 PM

लातूर : सध्या सोयाबीनचे दर हे शाश्वत राहिलेले नाहीत. गेल्या पंधरा दिवसांपासून यामध्ये कायम चढ-उतार राहिलेला आहे. आता गेल्या तीन दिवसांमध्ये लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 250 रुपयांनी घसरण झाली आहे. दिवाळीनंतर कायम दर हे वाढलेलेच आहेत पण आता आवक वाढत आहे तर दर हे कमी होत आहे. आतापर्यंत शेतकरी सोयाबीनच्या साठवणूकीवर भर देत होते पण बाजारपेठेतील चढ-उतार आणि केंद्र स्तरावर ठरणारे निर्णय यामुळे शेतकऱ्यांनाही आता दराची काळजी वाटू लागली आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने का होईना आता सोयाबीन विक्रीला शेतकऱ्यांनी सुरवात केल्याचे चित्र आहे. गुरुवारी 10 हजार तर शुक्रवारी 14 हजार पोत्यांची आवक ही लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेली होती.

आवक वाढण्याचे काय आहेत कारणे ?

आतापर्यंत सोयाबीनचे दर वाढणारच हा विश्वास बांधावरील शेतकऱ्यालाही झाला होता. त्यानुसार दरामध्ये वाढही झाली. दिवाळीनंतर दीड महिन्याच्या कालावधीमध्ये 2 हजार रुपयांची वाढ झाली होती. मात्र, दराला घेऊन शेतकऱ्यांच्या अपेक्षा ह्या वाढतच गेल्या आहेत. मात्र, सोयापेंड आयातीची चर्चा आणि जागतिक बाजार पेठेचा परिणाम आता सोयाबीनवर होत आहे. त्यामुळे भावामध्ये कायम चढ-उतार होत आहे. दोन दिवसांमध्ये 250 रुपायांनी दर हे कमी झाले आहेत. शिवाय शेतीकामासाठी पैशाची आवश्यकता असल्याने सोयाबीन विक्रीला शेतकऱ्यांनी सुरवात केली आहे.

साठवणूक फायद्याची की तोट्याची..

आतापर्यंत अपेक्षित दरासाठी शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केली होती. त्यानुसार दरामध्ये वाढही झाली पण शेतकऱ्यांच्या अपेक्षा ह्या वाढतच आहेत. सोयाबीन 8 हजार रुपये क्विंटल होत नाही तोपर्यंत विक्री नाही अशी भूमिकाही शेतकऱ्यांनी घेतली होती. पण आता सोयबीनच्या दरात अधिकची वाढ होणार नसल्याचे कृषितज्ञ सांगत आहेत. शिवाय उन्हाळी सोयाबीनची मोठ्या प्रमाणात पेरा झाला आहे. त्यामुळे त्याची आवक सुरु झाली तर सोयाबीनचे दर हे घसरणारच आहेत. दुसरीकडे सोयापेंडच्या आयातीसंदर्भात निर्णयात सातत्याने बदल होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने विक्री केली तर अधिकचे नुकसान होणार नसल्याचे सांगितले जात आहे.

हमीभावापेक्षा तुरीला कमीच दर

खरीप हंगामातील तुरही आता बाजारात दाखल होत आहे. शुक्रवारी पांढऱ्या तुरीला 6 हजार 150 दर हा सौद्यामध्ये होता तर पोटलीत यापेक्षा कमी दर राहणार आहे. केंद्र सरकारने तुरीला 6 हजार 300 चा हमीभाव घोषित केला आहे. पण आता प्रत्यक्षात शेतकऱ्यांना तूर ही हमीभावापेक्षा कमीने विकावी लागत आहे. त्यामुळे नाफेडच्या माध्यमातून त्वरीत खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी होऊ लागली आहे. हमीभाव केंद्र सुरु नसल्याने व्यापारी मनमानी दर आकारत आहेत. हमीभाव केंद्र सुरु करण्याची घोषणा केंद्र सरकारने दोन महिन्यापूर्वीच केली होती पण प्रत्यक्षात अंमलबजावणीकडे दुर्लक्ष होत आहे.

इतर शेतीमालाचे कसे आहेत दर

लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. शुक्रवारी लाल तूर- 6425 रुपये क्विंटल, पांढरी तूर 6150 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6433 रुपये क्विंटल, जानकी चना 4915 रुपये क्विंटल, विजय चणा 4900, चना मिल 4850, सोयाबीन 7200, चमकी मूग 7100, मिल मूग 6450 तर उडीदाचा दर 7501, पांढरी तूर 6150 एवढा राहिला होता.

संबंधित बातम्या :

E-Pik- Pahani : खरिपात मोहीम यशस्वी आता रब्बी हंगामातही शेतकऱ्यांचीच भूमिका महत्वाची

Sugar Factory :अतिरीक्त साखरेवर आता इथेनॉल निर्मितीचा रामबाण पर्याय, देशातील इथेनॉल निर्मितीमध्ये महाराष्ट्राचा मोठा वाटा

कृषी आयुक्तांची अनोखी शक्कल, आता वाढणार शेतीमालाची निर्यात..!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें