E-Pik- Pahani : खरिपात मोहीम यशस्वी आता रब्बी हंगामातही शेतकऱ्यांचीच भूमिका महत्वाची

E-Pik- Pahani : खरिपात मोहीम यशस्वी आता रब्बी हंगामातही शेतकऱ्यांचीच भूमिका महत्वाची
संग्रहीत छायाचित्र

15 ऑगस्ट पासून राज्यभरात 'ई-पीक पाहणी'चा उपक्रम राबवण्याचा निर्णय राज्य सरकारच्या महसूल विभागाने घेतला होता. यामध्ये शेतातील पेऱ्याची नोंद ही शेतकऱ्यांनाच मोबाईलवर करावी लागणार होती. यंदाच्या खरीप हंगामात प्रथमच हा उपक्रम राबविण्यात आला होता. यामध्ये 58 लाख 39 हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता. आता रब्बी हंगामातही शेतकऱ्यांनाच ही भूमिका पार पाडावी लागणार आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: राजेंद्र खराडे

Dec 10, 2021 | 1:15 PM

लातूर : 15 ऑगस्ट पासून राज्यभरात (E-crop inspection) ‘ई-पीक पाहणी’चा उपक्रम राबवण्याचा निर्णय राज्य सरकारच्या महसूल विभागाने घेतला होता. यामध्ये शेतातील पेऱ्याची नोंद ही शेतकऱ्यांनाच मोबाईलवर करावी लागणार होती. यंदाच्या खरीप हंगामात प्रथमच हा उपक्रम राबविण्यात आला होता. यामध्ये 58 लाख 39 हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता. आता ( rabbi season) रब्बी हंगामातही शेतकऱ्यांनाच ही भूमिका पार पाडावी लागणार आहे. सध्या रब्बीचा पेरा हा अंतिम टप्प्यात आहे. पण ज्या (crop records) पिकांची पेरणी झाली आहे त्या पिकांच्या नोंदणीला सुरवात झाली आहे. यामुळे महसूल विभागावरील ताण कमी होणार असून खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पिकपेऱ्याची अचूक माहिती भरली असल्याने आता समस्या उद्भवणार नसल्याचे महसूल विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणने आहे.

पीक पेऱ्याच्या नोंदणीला सुरवात

यंदा रब्बीच्या पेरण्या तब्बल दीड महिन्याच्या फरकाने झालेल्या आहेत. सततच्या पावसामुळे पेरण्या लांबणीवर पडलेल्या आहेत. पण क्षेत्रावरील पेरणी झाली आहे तेथील पिकांच्या नोंदीला सुरवात झाल्याचे लातूर कृषी उपविभगीय अधिकारी राजेंद्र कदम यांनी सांगितले आहे. खरीप हंगामात सोयाबीनची अधिक प्रमाणात नोंद झाली होती तर रब्बी हंगामात हरभरा या पिकाची नोंद होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.

खरीप ऐवजी रब्बी हंगाम निवडून करा ‘ई-पिक पाहणी’

*शेतकऱ्यांनी प्ले स्टोअर मधून ‘ई-पिक पाहणी’ हे अॅप डाऊनलोड करुन घ्यायचे आहे. हे अॅप ओपन करुन नविन खातेदार नोंदणी करुन घ्यावयाची आहे. यामध्ये आपला जिल्हा, तालुका आणि गावाची निवड करयाची आहे. त्यानंतर खातेदारमध्ये पहिले नाव, मधले नाव, अडनांव आणि गट क्रमांक टाकायचा आहे. गट क्रमांक टाकल्यानंतर शेतकऱ्याला आपले नाव समोर येते. त्यानंतर खातेक्रमांक तपासून आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे जो पुन्हा बदलता येणार नाही. त्यानंतर मोबाईलवर चार अंकी पासवर्ड येईल तो कायम लक्षात ठेवावा लागणार आहे. कारण या अॅपमध्ये तोच पासवर्ड लागणार आहे जो एसएमएस द्वारे पाठवला जाईल.

*यानंतरच तुमची नोंदणी यशस्वी होणार आहे. यानंतर अॅप हे पूर्णपणे बंद करुन चालू करायचे आहे. अॅप पुन्हा चालू केल्यानंतर पुन्हा तुम्हाला खातेदार म्हणजे तुमचे नाव निवडावे लागेल. मॅसेजद्वारे आलेला पासवर्ड येथे नमूद करायचा आहे. त्यानंतर पुढे जाऊन परीचयमध्ये खातेदाराचा फोटो अपलोड करायचा त्यानंतर दिलेली माहिती भरून सबमिट करायचे. त्यानंतर होममध्ये येऊन पिकाची माहिती नोंदवा असा एक फॅार्म येतो. यामध्ये खातेक्रमांक नंतर गट क्रमांक, जमिनीचे क्षेत्र हे हेक्टरमध्ये भरायचे यानंतर हंगाम निवडायचा म्हणजे रब्बी की संपूर्ण वर्ष ते निवडायचे,

*त्यानंतर पिक पेरणीसाठीचे क्षेत्र किती याचा उल्लेख करायचा आहे. त्यानंतर पिकाचा वर्ग यामध्ये जे आपलं पिक आहे तेच निवडायचे यातील वेगवेगळे प्रकारही असू शकतात. त्यानंतर दिलेल्या पर्यापैकी तुमचं कोणतं पिक ते निवडायचे आहे. पुन्हा त्या पिकाचे क्षेत्र भरायचे.. त्यानंतर सिंचनाचे साधन काय आहे त्याचा उल्लेख करायचा त्यानंतर ठिबक पध्दती कशी आहे याची दिलेल्या पर्यातून निवड करायची..त्यानंतर पिक लागवडीची तारीख याची नोंद करायची. त्यानंतर कॅमेराचा पर्याय येईल यातून फोटो काढायचा आणि तो फॅार्म सबमिट करायचा आहे.

*सबमिट झाल्यानंतर पुन्हा होमवर यायचं ही नोंदवलेली माहिती केवळ तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह झाली.. ती बघायची असेल तर पुन्हा पिकाची माहिती नोंदवा याच्यावर क्लिक करायचे आहे. यामध्येही पिकाची माहिती यावर क्लिक करयाचे यामध्ये तुम्ही भरलेली माहिती दिसेल जी मोबाईलमध्ये सेव्ह झालेली असेल ही माहिती संबंधित सर्वरला पाठवण्यासाठी अपलोड या बटनाला क्लिक करायचे आहे. त्यानंतर आलेल्या दोन पर्यापैकी परिचय माहिती क्लिक करुन माहीती अपलोड झालेली पहायला मिळते त्याच प्रमाणे पिक माहितीवरती क्लिक करुन अपलोड करायचे आहे…अशा प्रकारे ‘ई-पिक पाहणी’ या अॅपद्वारे आपल्याला पिकाची माहिती भरता येते.

‘ई-पीक पाहणी’चे असे आहेत फायदे

1)‘ई-पीक पाहणी’ या अॅपमुळे शेतकऱ्यांच्या पीक पेरणीची अचूक नोंद होणार आहे. यामुळे ना शेतकऱ्याचे नुकसान होणार आहे ना सरकारची फसवणूक. 2) या अॅपरील नोंदीमुळे राज्यात, देशात एखाद्या पिकाचा पेरा किती झाला आहे याची अचूक आकडेवारी एका क्लिकर उपलब्ध होणार आहे. 3) पिकाच्या अचूक आकडेवारीमुळे उत्पादनाबद्दल अंदाज बांधता येतो. यावरुन भविष्यात बी-बियाणे लागणारे खत हे पण उपलब्ध करुन देता येणार आहे. शेतावरील गटावर झालेल्या पीक नोंदीचा फायदा हा देशात कीती क्षेत्रावर कीती ऊत्पन्न झाले हे सांगण्यासाठी देखील होणार आहे. 4) पिकाच्या छायाचित्रामुळे किती अक्षांश: आणि किती रेखाअंशावर कोणत्या पिकाचा पेरा झाला आहे हे समजले जाणार आहे. 5) एका मोबाईलहून 20 शेतकऱ्यांच्या नोंदी करता येणार आहेत. प्रत्येक शेतकऱ्याकडे मोबाईल नसतो त्यामुळेच अशा प्रकारची सोय करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

Sugar Factory :अतिरीक्त साखरेवर आता इथेनॉल निर्मितीचा रामबाण पर्याय, देशातील इथेनॉल निर्मितीमध्ये महाराष्ट्राचा मोठा वाटा

कृषी आयुक्तांची अनोखी शक्कल, आता वाढणार शेतीमालाची निर्यात..!

अवकाळी पावसानंतर द्राक्ष बागांचे काय आहे चित्र ? नुकसानीमुळे बाजारपेठेवर परिणाम

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें