Sugar Factory :अतिरीक्त साखरेवर आता इथेनॉल निर्मितीचा रामबाण पर्याय, देशातील इथेनॉल निर्मितीमध्ये महाराष्ट्राचा मोठा वाटा

Sugar Factory :अतिरीक्त साखरेवर आता इथेनॉल निर्मितीचा रामबाण पर्याय, देशातील इथेनॉल निर्मितीमध्ये महाराष्ट्राचा मोठा वाटा
संग्रहीत छायाचित्र

सन 2020 - 21 मध्ये देशात 302 कोटी लिटरचे इथेनॉल निर्मित झाले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील साखर कारखान्यांतून 80 कोटी लिटरचे योगदान देण्यात आले आहे. इथेनॉल निर्मितीवर सरकारचा मोठा भर असून यातून शेतकऱ्यांचेही उत्पन्न वाढणार आहे. राज्यातील 78 साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीचे प्रकल्प उभारले आहेत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: राजेंद्र खराडे

Dec 10, 2021 | 12:39 PM

पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून ( Ethanol production) इथेनॉल निर्मितीवर भर देण्याचा प्रयत्न केला जात आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तर प्रत्येक ठिकाणच्या कार्यक्रमात इथेनॉल निर्मितीचे महत्व पटवून सांगितलेले आहे. सन 2020 – 21 मध्ये देशात 302 कोटी लिटरचे इथेनॉल निर्मित झाले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील (Sugar factories) साखर कारखान्यांतून 80 कोटी लिटरचे योगदान देण्यात आले आहे. इथेनॉल निर्मितीवर सरकारचा मोठा भर असून यातून शेतकऱ्यांचेही उत्पन्न वाढणार आहे. राज्यातील 78 साखर कारखान्यांनी (ethanol manufacturing projects) इथेनॉल निर्मितीचे प्रकल्प उभारले आहेत. यामधून इथेनॉलची निर्मिती अजून वाढले असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

इथेनॉलपासून मिळणारे उत्पन्न

इथेनॉल निर्मितीची मदत इंधनामध्ये तर होणारच आहे. पण यामधून साखर कारखान्यांच्या उत्पन्नात देखील वाढ होत आहे. ज्या साखर कारखान्यांकडे स्वत:चे प्रकल्प नाहीत अशा कारखान्यांनी ऊसाच्या गाळपानंतर तयार होणारा कच्चा माल हा ज्या ठिकाणी प्रकल्प उभारण्यात आले आहेत. त्यांना देऊन इथेनॉलची निर्मिती करुन घ्यावयाची आहे. सी हेवी या कच्च्या मालापासून तयार होणाऱ्या इथेनॉल 45 रुपये लिटर तर बी हेवीपासून 55 रुपये व थेट ऊसाच्या रसापासून तयार होणाऱ्या इथेनॉल 65 रुपये तेल कंपन्या ह्या खरेदी करतात. राज्यातील 80 कोटी लिटरच्या इथेनॉल निर्मितीतून 4 हजार 500 कोटी रुपये मिळाले असल्याचा अंदाज आहे. तर तेल कंपन्या हे पैसे 15 दिवसांमध्ये देतात हे विशेष

सरकारचे काय आहे उद्दीष्ट?

इंधनासाठी इथेनॉलचा उपयोग होतो म्हणून इथेनॉलची निर्मितीवर भर द्यावा असे अवाहन सातत्याने केले जात आहे. यंदाच्या हंगामात सरकारने 120 कोटी लिटर इथेनॉल निर्मितीचे उद्दीष्ट ठेवलेले आहे. एवढेच नाही तर इथेनॉल निर्मितीचा प्रकल्प उभा करायचा असल्यास साखर कारखान्यांनी कर्ज घेतल्यास त्याच्या व्याजावर केंद्र सरकारने अनुदान सुरु केले आहे. राज्यातील 67 खासगी व 64 सहकारी साखर कारखान्यांनी याचा लाभ घेतलेला आहे. गतवर्षी कंपन्यांना 80 कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा साखर कारखान्यांनी केला होता.

साखरेचे अतिरीक्त उत्पादन

गेल्या काही वर्षापासून राज्यात साखरेचे अतिरीक्त उत्पादन होत आहे. यंदा तर पोषक वातावरणामुळे ऊसाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. अतिरीक्त उत्पादनामुळे साखऱ कारखानदार यांच्या समोरील अडचणींमध्ये वाढ झाली होती. मात्र, आता त्याला इथेनॉल निर्मितीचा पर्याय समोर आला आहे. कारखाने व ऊस उत्पादकांना त्याचा फायदा होणार आहे. मात्र, इथेनॉल निर्मितीचे प्रकल्प हे काही मर्यादित साखर कारखान्यांकडेच आहेत. त्यामुळे कच्च्या मालाच्या पुरवठ्या नंतरच इथेनॉलची निर्मिती होणार आहे.

संबंधित बातम्या :

कृषी आयुक्तांची अनोखी शक्कल, आता वाढणार शेतीमालाची निर्यात..!

अवकाळी पावसानंतर द्राक्ष बागांचे काय आहे चित्र ? नुकसानीमुळे बाजारपेठेवर परिणाम

किटकनाशक फवारणीसाठी ‘ड्रोन’ चा वापर करताय ? मग कृषी मंत्रालयाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन कराच

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें