Rabi Season: आपला शेतकरीही आता कमर्शियल, पारंपरिक पिकांना डावलून कडधान्यावरच भर

| Updated on: Feb 07, 2022 | 4:18 PM

हंगाम कोणताही असो आता पीक पध्दतीमध्ये बदल ही मोठी गोष्ट राहिलेली नाही. शेतकरीच बाजारपेठेचा अंदाज बांधून उत्पादन घेत आहे. रब्बी हंगाम म्हणलं की गहू, हरभरा ज्वारी हीच मुख्य पिके. शिवाय यामध्ये बदल केला तर नुकसानच अशीच परंपरा गेल्या अनेक वर्षापासून सुरु आहे. मात्र, आता परंपरेला नाही तर नगदी पिकांना अधिकचे महत्व दिले जात आहे.

Rabi Season: आपला शेतकरीही आता कमर्शियल, पारंपरिक पिकांना डावलून कडधान्यावरच भर
वाशिम जिल्ह्यामध्ये मोहरीचे क्षेत्र वाढले असून पोषक वातावरणामुळे पिक असे बहरले आहे.
Follow us on

वाशिम : हंगाम कोणताही असो आता पीक पध्दतीमध्ये बदल ही मोठी गोष्ट राहिलेली नाही. शेतकरीच बाजारपेठेचा अंदाज बांधून उत्पादन घेत आहे. (Rabbi Season) रब्बी हंगाम म्हणलं की गहू, हरभरा ज्वारी हीच मुख्य पिके. शिवाय यामध्ये बदल केला तर नुकसानच अशीच परंपरा गेल्या अनेक वर्षापासून सुरु आहे. मात्र, आता परंपरेला नाही तर नगदी पिकांना अधिकचे महत्व दिले जात आहे. त्यामुळे यंदा रब्बी हंगामात पोषक वातावरण असताना शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये मोठा बदल केला आहे. (Marathwada) मराठवाड्यात रब्बी हंगामात प्रथमच सोयाबीनचा पेरा वाढलेला आहे. तर इकडे वाशिम जिल्ह्यामध्ये कडधान्य असलेल्या (Mustard) मोहरीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. त्यामुळे हंगाम कोणताही असो उत्पन्नात कशी वाढ होईल याचाच विचार शेतकरी करीत आहेत. शिवाय या अभिनव उपक्रमाला कृषी विभागाचेही पाठबळ मिळत आहे. यंदा प्रथमच शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बदल तर केला आहे पण आता त्या प्रमाणात उत्पादन वाढले तर शेतकऱ्यांचे धाडसही वाढणार आहे.

कमी खर्चात अधिकचे उत्पन्न

पारंपरिक पिकांमधून उत्पादन तर कमीच पण अधिकचा खर्च आणि कष्टही. मात्र, जनावरांना चारा आणि खाण्यासाठी आवश्यक असलेल्या ज्वारीचा पेरा कधीच कमी होत नव्हता. पण मराठवाड्यात देखील ज्वारीचे क्षेत्र हे घटलेले आहे. तर वाशिम जिल्ह्यामध्ये मोहरीचे क्षेत्रात विक्रमी वाढ झालेली आहे. या भागात गहू, हरभरा या पिकांवरच शेतकऱ्यांचा भर असत. मात्र, यंदा ही परस्थिती बदललेली आहे. कमी खर्चात,कमी कालावधीत भरघोस पीक देणारी मोहरी असल्याने जिल्ह्यातील शेतकरी या पिकाकडे वळत आहे.यंदा जिल्ह्यात जवळपास दीड हजार एकरावर शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. यंदा वातावरण इतर पिकाला उपयुक्त नसताना ही मोहरी चे चांगलेच बहरले आहे.

मध्यंतरीच्या वातावरणाचा परिणाम

रब्बी हंगामातील पिके बहरात असतानाच मध्यंतरी अवकाळी पाऊस, गारपिट आणि अंतिम टप्प्यातील गारवा. तशी थंडी ही रब्बी हंगामातील पिकांना पोषकच असते मात्र, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की दुष्परिणामच अगदी त्या प्रमाणेच रब्बी हंगामातील पिकांवर किडीचा प्रादुर्भाव झाला होता. मात्र, वातावरण कोरडे होताच शेतकऱ्यांनी फवारणी केल्याने पुन्हा रब्बी हंगामातील पिके बहरलेली आहेत. वाशिम जिल्ह्यात यंदा प्रथमच मोहरीचे क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा पहिलाच प्रयोग असून उत्पादन वाढीच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत.

संबंधित बातम्या :

Untimely Rain : अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान, तरीही उत्पादन वाढीसाठी कृषितज्ञांचा काय आहे सल्ला ?

P.M.KISAN : योजनेतील अपात्र शेतकऱ्यांचे खाते सील अन् रक्कमही परत, काय आहे धोरणात बदल?

अवकाळीच्या नुकसानी खुणा : निसर्गानं सर्वकाही हिरावलं आता शेतकऱ्याचं सरकारकडे हे साकडं!