AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

P.M.KISAN : योजनेतील अपात्र शेतकऱ्यांचे खाते सील अन् रक्कमही परत, काय आहे धोरणात बदल?

पीएम किसान योजना ही खऱ्या अर्थाने गरजू शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती अवजारे आणि इतर शेती कामांना त्याचा उपयोग व्हावा हा त्यामागची केंद्र सरकारची भूमिका आहे. मात्र, शासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष आणि योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेकांनी कागदपत्रांची पूर्तता करुन पैले लाटलेले आहे.

P.M.KISAN : योजनेतील अपात्र शेतकऱ्यांचे खाते सील अन् रक्कमही परत, काय आहे धोरणात बदल?
पीएम किसान सन्मान योजना
| Updated on: Feb 07, 2022 | 2:29 PM
Share

बीड : (P.M. Kisan Sanman Yojna) पीएम किसान योजना ही खऱ्या अर्थाने गरजू शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती अवजारे आणि इतर शेती कामांना त्याचा उपयोग व्हावा हा त्यामागची (Central Government) केंद्र सरकारची भूमिका आहे. मात्र, शासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष आणि योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेकांनी कागदपत्रांची पूर्तता करुन पैले लाटलेले आहे. अखेर अहवालातून हे समोर आले असून देशभरातील 4 कोटी अपात्र शेतकऱ्यांकडून ही रक्कम वसुल केली जात आहे. एकट्या (Beed District) बीड जिल्ह्यातून आतापर्यंत 2 हजार अपात्र शेतकऱ्यांनी ही रक्कम परत केली आहे. योजनेतील अनियमिततेमुळे आता केंद्र सरकारने धोरणच बदलले आहे. जानेवारी महिन्यामध्ये 10 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. पण आता 11 व्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिवाय अपात्र शेतकऱ्यांकडून पैसे वसुल करण्याचे काम महसूल विभागाला देण्यात आले आहे.

हे आहेत अपात्र शेतकरी

अल्पभूधारक किंवा गरजू शेतकऱ्यांना ही रक्कम मिळावी हा सकारचा उद्देश राहिलेला आहे. असे असतानाही राज्यातील लाखो अपात्र शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेतलेला आहे. सरकारी कर्मचारी, माजी मंत्री, राज्यमंत्री विधानमंडळाचा सदस्य, महापौर, नगराध्यक्ष तसेच 10 हजारापेक्षा अधिकची पेन्शन घेणारे, आयकरचा भरणा करणारे, डॉक्टर, इंजिनिअर, वकील, नोदणीकृत व्यवसाय करणारे हे या योजनेसाठी अपात्र असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे अशा नागरिकांनी लाभ घेतला असेल तर त्यांना ही रक्कम परत करावी लागणार आहे.

बीड जिल्ह्यात 2 लाख 4 हजार शेतकऱ्यांना लाभ, 2 हजार अपात्र

पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यातील 2 लाख 4 हजार शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळालेला आहे. 10 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाल्यानंतर ही यादी जिल्हा प्रशासनाने समोर आणली आहे. याकरिता 40 कोटी 83 लाख रुपयांचा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. तर 2 हजार 91 शेतकरी हे अपात्र ठरले आहेत. ज्यांनी आयकर भरुनही लाभ घेतला आहे अशा अपात्र शेतकऱ्यांनी 2 कोटी 1 लाख रुपये परतही केले आहेत. यामुळे योजनेच्या धोरणांमध्ये बदल करण्यात आला आहे.

पंतप्रधान कृषी सन्मान योजनेत नाव नोंदवण्यासाठी काय कराल?

* तुम्हाला प्रथम पंतप्रधान किसान सन्मान योजना या अधिकृत वेबसाइटवर जावे लागणार आहे. * आता ‘फार्मर्स’ कॉर्नरला जा. * येथे आपल्याला ‘नवीन शेतकरी नोंदणी’ या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे. * आधार क्रमांक समाविष्ट करावा लागणार आहे. * त्याच वेळी कॅप्चा कोड घालून राज्याची निवड करावी लागते आणि मग पुढची प्रक्रिया ही करावी लागणार आहे. * आपल्याला आपली संपूर्ण वैयक्तिक माहिती या स्वरूपात भरणे आवश्यक आहे. * बँक खात्याचा तपशील आणि शेतीशी संबंधित माहिती देखील भरावी लागेल. * मग तुम्ही फॉर्म सादर करू शकता.

संबंधित बातम्या :

अवकाळीच्या नुकसानी खुणा : निसर्गानं सर्वकाही हिरावलं आता शेतकऱ्याचं सरकारकडे हे साकडं!

Crop Insurance : शेतकऱ्यांना अर्धवटच भरपाई, विमा कंपनीचे कंत्राट रद्द करण्याचा प्रस्ताव

Soybean Crop: उन्हाळी सोयाबीनने मिटणार खरिपातला प्रश्न, शेतकऱ्यांना घ्यावी लागणार ‘ही’ काळजी..!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.