हुश्श…! अखेर सणासुदीत का होईना खाद्यतेलाचे दर घटणार ; दिवाळी होणार गोड होणार

| Updated on: Oct 19, 2021 | 5:16 PM

महागाई आणि दिवसेंदिवस वाढत असलेले दर यामुळे मुलभूत गरजांचा पुरवठा करताना तारेवरची कसरत करावी लागत होती. पण केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे यंदाची दिवाळी गोड होणार आहे. (Reduced import duty on edible oil) खाद्यतेलावरील आयातशुल्क हे कमी करण्यात आले असून त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश केंद्र सरकारने राज्य सरकारला दिलेले आहेत.

हुश्श...! अखेर सणासुदीत का होईना खाद्यतेलाचे दर घटणार ; दिवाळी होणार गोड होणार
खाद्यतेल
Follow us on

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून (Central Government) केंद्र सरकार हे खाद्यतेलाचे दर कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे. आता या निर्णायाचा फायदा सर्वसामान्य जनतेला सणासुदीत होणार आहे. ऐन सणासुदीच्या काळातच हा निर्णय होत असल्याने सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळणार आहे. महागाई आणि दिवसेंदिवस वाढत असलेले दर यामुळे मुलभूत गरजांचा पुरवठा करताना तारेवरची कसरत करावी लागत होती. पण केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे यंदाची दिवाळी गोड होणार आहे. (Reduced import duty on edible oil) खाद्यतेलावरील आयातशुल्क हे कमी करण्यात आले असून त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश केंद्र सरकारने राज्य सरकारला दिलेले आहेत.

केंद्र सरकारकडून खाद्यतेल आणि तेलबियांवरील आयातशुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला होता. यातच आता कच्च्या तेलावरील सीमाशुल्कही रद्द करण्यात आला आहे. याचाच अर्थ असा की, सरकारने पामतेल आणि सनफ्लावॅर तेल यावरील कृषी उपकर आणि कस्टम ड्युटी कमी केली आहे. त्यामुळे दरात घसरण होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून खाद्यतेलावरील दर नियंत्रणात ठेवण्यासाठी वेगवेगळ्या पध्दतीने प्रयत्न केले जात होते. वेळप्रसंगी व्यापारी आणि शेतकरी संघटनांकडून या निर्णयाला विरोधही करण्यात आला होता. मात्र, आता आयातशुल्क कमी करण्याचे निर्देशच राज्य सरकार यांना देण्यात आल्याने किमान सणामध्ये तरी दर कमी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

खाद्यतेलावरील किती शुल्क कमी होणार

आयातशुल्क कमी करण्यासंदर्भात एक कालावधी ठरवण्यात आलेला आहे. सरकारने 31 मार्च 2022 पर्यंत पाम, सोयाबीन आणि सूर्यफुलाच्या तेलाच्या कच्च्या जातींवरील कृषी उपकर कमी केले आहे. याचा फायदा असा होणार आहे की, खाद्य तेलाच्या किंमती तर कमी होतीलच पण सणासुदीच्या काळात देशांतर्गत खाद्यतेलाचा तुटवडा भासणार नाही. कच्च्या पाम तेल, कच्च्या सोयाबीन तेल आणि कच्च्या सूर्यफुलाच्या तेलावरील शुल्क हे 2.5 टक्क्यांवरून शून्य करण्यात आले आहे. कच्च्या पामतेलाचे कृषी उपकर 20 टक्क्यांवरून 7.5 टक्क्यांपर्यंत आणि कच्च्या सोयाबीन तेल आणि कच्च्या सूर्यफुलाच्या तेलासाठी 5 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहेत.

अशा प्रकारे घटले कर

सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार खाद्यतेलावरील जकात कमी करण्यात आली आहे. तसेच कृषी उपकरही कमी केला जातो.सरकारने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, कच्च्या पाम तेलावरील शुल्क 8.25% केला आहे जो आगोदर 24.75%, आरबीडी पामोलिन 19.25 तर आगोदर 35.75, आरबीडी पाम तेल 19.25 केला आहे आगोदर 35.75, कच्चे सोया तेल 5.5 सध्या केला आहे तर पूर्वी २४.७५, रिफाइंड सोया तेल 19.5 सध्या तर आगोदर 35.75, कच्चे सूर्यफुलाचे तेल 5.5 तर पूर्वी 24.75 आणि सूर्यफुलाचे तेल 19.25 आगोदर 35.75 होते. शुल्ककमी केल्यामुळे तेलाच्या दरात घट झाली आहे. ही शुल्क कपात 14 ऑक्टोबरपासून लागू झाली असून 31 मार्च 2022 पर्यंत लागू राहील राहणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. (Edible oil prices to come down, government’s relief to common man during Diwali festival)

संबंधित बातम्या :

दुष्काळात तेरावा ! कांदा चाळीतील 90 टन कांदा सडला, काय आहे उपापयोजना ?

मल्चिंग पेपर पीकासाठी संरक्षणाचे कवच, गादीवाफा अन् मल्चिंग पसरवण्याचे यंत्र

खरीप गेलं…रब्बी पदरात पाडून घ्या : रब्बीची लगबग अन् खरीपाची काढणी, शेतकऱ्यांनी नेमके करावे काय?