AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुष्काळात तेरावा ! कांदा चाळीतील 90 टन कांदा सडला, काय आहे उपापयोजना ?

सध्या कांद्याचे दर तेजीत आहेत अशातच शेतकरी उत्पादक कंपनीने कांदा चाळीत साठवणूक केलेला 90 टन कांदा अक्षरश: सडून गेला आहे. त्यामुळे या कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एकीकडे पाऊस शेतातील उभे पीक काढू देत नाही तर दुसरीकडे साठवलेल्या शेती पीकाची अशी अवस्था होत आहे.

दुष्काळात तेरावा ! कांदा चाळीतील 90 टन कांदा सडला, काय आहे उपापयोजना ?
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Oct 19, 2021 | 4:27 PM
Share

अहमदनगर : यंदाच्या वर्षात शेतकऱ्यांचा नैसर्गिक संकटाशी सामना सुरु आहे. (Heavy Rain) पावसाने लागवड केलेली पीके काढू दिली नाहीत आणि साठवणूक केलेली विक्री करु दिली नाहीत. सध्या कांद्याचे दर तेजीत आहेत अशातच शेतकरी उत्पादक कंपनीने (onion chawl) कांदा चाळीत साठवणूक केलेला 90 टन कांदा अक्षरश: सडून गेला आहे. त्यामुळे या कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. (Damage to onions) एकीकडे पाऊस शेतातील उभे पीक काढू देत नाही तर दुसरीकडे साठवलेल्या शेती पीकाची अशी अवस्था होत आहे. वेगवेगळ्या आकाराचा कांदा साठवण्यासाठी 36 चाळी उभ्या करण्यात आल्या होत्या मात्र, पुणतांबा येथे झालेल्या पावसामुळे या चाळीतील कांदा सडला असून त्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झालेले आहे.

कांदा हा नाशवंत आहे. शिवाय कांद्याचे उत्पादन अधिकचे झाले की दर कमी होतात. यावर पर्याय म्हणून कांदा चाळ उभारल्या जातात. नाशिक जिल्ह्यात कांद्याचे उत्पादन अधिक आहे. म्हणून जिल्ह्यात कांदा चाळीही मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र, पुणतांबा येथील रेल्वे स्टेशनच्या समोर शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केलेली आहे. या कंपनीच्या गोडावूनमध्ये 1136 टन कांद्याची साठवणूक केली होती. पैकी 90 टन कांदा हा पावसाच्या पाण्याने सडला आहे. त्यामुळे फेकून देण्याची नामुष्की आल्याचे शेतकरी उत्पादक कंपनीच्या अध्यक्षा सुनीता धनवटे यांनी सांगितले आहे.

नेमके काय झाले?

कांद्याला अधिकचे दर मिळत आहेत. शिवाय दिवसेंदिवस हे दर भविष्यात अजूनही दर वाढतील अशी आशा आहे. त्यामुळेच या शेतकरी उत्पादक कंपनीने कांद्याची साठवणूक केली होती. मात्र, चक्रीवादळ व गाराच्या पावसामुळे चाळीतील 90 टन कांदा अक्षरश: पाण्यात होता. त्यामुळे तो सडला आहे. या घटनेची माहिती मिळाली असता उत्पादक कंपनीच्या शेतकऱ्यांनी धाव घेतली पण कांद्याचे न भरुन निघणारे नुकसान झाले होते. त्यामुळे कांदा हा फेकून द्यावा लागला होता. उर्वरीत कांदा आता इतर गोण्यामध्ये भरुन ठेवण्यात आला आहे.

वाढत्या दरामुळे अधिकचे नुकसान

दर नसला तर कांद्याची साठवणूक हाच या कांदा चाळीचा उद्देश आहे. मात्र, 40 ते 50 रुपये किलो कांद्याला दर मिळत आहे. तब्बल 1136 टन कांद्याची साठवणूक असून यामाध्यमातून अधिकचे उत्पादन मिळेल असा आशावाद होता. पण पावसाने पाणी फेरले आहे. योग्य खबरदारी घेऊनही अधिकच्या पावसामुळे केवळ या शेतकरी उत्पादक कंपनीचेच नव्हे तर आजूबाजूच्या बोरबने वस्ती, चव्हाण वस्ती, डेरा नाला भागात शेतकर्‍यांच्या चाळीतील कांदा सडला आहे.

अशाप्रकारे घ्या काळजी

1) कांदा चाळीतील कांदा सडू नये म्हणून एकाच ठिकणी अधिकच्या प्रमाणात कांद्याची साठवणूक करु नये. शिवाय साठवणूक करण्यापूर्वी कांदा हा तीन ते चार वेळेस कडक ऊन्हामध्ये वाळवणे आवश्यक आहे. 2) कांदा वाळवल्यानंतर लागलीच तो गोण्यामध्ये भरुन ठेऊ नये किंवा ढीग घालून एकत्र ठेऊ नये. त्यामुळे ढीगाच्या खाली असलेला कांदा सडण्याची शक्यता निर्माण होते. 3) कांदा चाळीत ठेवलेल्या कांद्याची वेळोवेळी देखभाल करणे आवश्यक आहे. किमान जो कांदा खराब झाला आहे त्याला बाहेर काढून इतर कांद्यापासून दूर ठेवावे. जेणेकरुन इतर कांदे सडणार नाहीत. (Onion stored in onion chawl rotten, what are the protection measures)

संबंधित बातम्या :

मल्चिंग पेपर पीकासाठी संरक्षणाचे कवच, गादीवाफा अन् मल्चिंग पसरवण्याचे यंत्र

खरीप गेलं…रब्बी पदरात पाडून घ्या : रब्बीची लगबग अन् खरीपाची काढणी, शेतकऱ्यांनी नेमके करावे काय?

VIDEO ! व्यथा शेतकऱ्याची : जेव्हा डोळ्यासमोर स्वप्नांचा चुराडा होतो तेव्हा…!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.