Eknath Khadse – नाथाभाऊंची बातच न्यारी, शेती-शिवारातही भरारी, 50 एकरात खजुराचे दमदार उत्पादन

| Updated on: May 21, 2022 | 4:58 PM

खजुराच्या शेतीचा प्रयोग हे नगण्य शेतकरीच करतात. कारण ही शेती पध्दत खर्चिक तर आहेच पण याबाबत अधिकची माहिती कुणाला नाही. त्यामुळे एकनाथ खडसे यांनी आखाती देशातून खजुराच्या रोपाची आयात केली आणि लागवड पध्दतीपासून ते बाजारपेठेपर्यंतची माहिती ही त्यांनी युट्यूबवर घेतली होती.

Eknath Khadse - नाथाभाऊंची बातच न्यारी, शेती-शिवारातही भरारी, 50 एकरात खजुराचे दमदार उत्पादन
Follow us on

जळगाव : अधिकतर राजकारणी हे शेतकरीच आहेत. पण राष्ट्रवादीचे (Eknath Khadse) एकनाथ खडसे यांनी आपण बांधावरचा शेतकरी असल्याचे दाखवून दिले आहे. शेती हा नियोजनाचा आणि कल्पकतेचा विषय नसून त्यासाठी प्रत्यक्ष शेती व्यवसायात उतरावेच लागते. त्यामुळे त्यांना तब्बल 50 एकरात (Date palm farming) खरबुजाची शेती शक्य झाली आहे. राजकारणात काही का असेना पण एकनाथ खडसे यांनी (Muktainagar) मुक्ताईनगच्या शिवारात हा शेती क्षेत्रातील प्रयोग यशस्वी करुन दाखवला आहे. चार वर्षापूर्वी केलेली लागण आता कुठे नावारुपाला आली आहे. खजुराची शेती ही महागडी असली तरी त्यामधून उत्पन्नही तसेच मिळते.

आखाती देशातील रोपे अन् युट्यूबच मार्गदर्शक

खजुराच्या शेतीचा प्रयोग हे नगण्य शेतकरीच करतात. कारण ही शेती पध्दत खर्चिक तर आहेच पण याबाबत अधिकची माहिती कुणाला नाही. त्यामुळे एकनाथ खडसे यांनी आखाती देशातून खजुराच्या रोपाची आयात केली आणि लागवड पध्दतीपासून ते बाजारपेठेपर्यंतची माहिती ही त्यांनी युट्यूबवर घेतली होती. 4 वर्ष जोपासणा केल्यानंतर आता कुठे खजुराचे फळ लागले आहे. योग्य निघराणी, व्यवस्थापन याचेच हे फळ असल्याचे मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे.

4 हजार 500 रुपयांना एक रोप

खजुराची शेती हा काही सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडेल असा प्रयोग नाही. कारण खजुराचे रोप हे आखाती देशातून आयात करावे लागते. शिवाय एक रोप हे 4 हजार 500 रुपयांना असल्याने ते सर्वसामान्यांना परवडणारे नाही. त्यामुळे खजुराचे रोपासाठी अनुदान देण्याची मागणी खडसे यांनी सरकारकडे केली आहेत. शिवाय या शेतीचा समावेश फळबाग योजनेत करावा अशी मागणीही केली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यामुळे खजुराच्या शेतीचे क्षेत्र वाढेल आणि कमी पाण्यात अधिकचे पीक यासाठी ही शेती पध्दत महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

हे सुद्धा वाचा

पोषक वातावरणामुळे 4 वर्षात फळ

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी तब्बल 50 एकरामध्ये खजुराची लागवड केली आहे. शिवाय लागवडीपूर्वीच त्यासाठी आवश्यक असलेल्या वातावरणाचा त्यांनी अभ्यास केला होता. खानदेशातील तापमान यासाठी अनुकूल असून परागिकरणच्या दरम्यान थंडी असणे गरजेचे आहे तर फलधारणेच्या दरम्यान अतिउष्ण तापमान गरजेचे असते. या दोन्हीही बाबी खानदेशात असल्याने अवघ्या 4 वर्षात फलधारणा झाली आहे. यशस्वी राजकारणी बरोबरच यशस्वी शेतकरी याचे उत्तम उदाहरण म्हणजे एकनाथ खडसे.