Nashik : डाळिंब बागांना आता वाढत्या उन्हाचा धोका, काय आहे उपाययोजना?

मराठवाड्यात ढगाळ वातावरण असले तरी उन्हाळ्याच्या अंतिम टप्प्यात उत्तर महाराष्ट्रात उन्हामध्ये वाढ झाली आहे. नाशिक जिल्ह्याताल सपाटणे परिसरात पारा 40 शी पार गेला आहे. त्यामुळे डाळिंब झाडे ही तणावात आहेत तर वाढत्या उन्हामुळे आंबे बहरातील फळे ही तडकली जात आहेत. उन्हामुळे फळांवर चट्टे पडतात, तर काढणी योग्य तयार झालेले फळ टिकवून ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.

Nashik : डाळिंब बागांना आता वाढत्या उन्हाचा धोका, काय आहे उपाययोजना?
राजेंद्र खराडे

|

May 21, 2022 | 1:26 PM

नाशिक : राज्यभरातील (Pomegranate garden) डाळिंब बागांना कीड, रोगराईचा धोका निर्माण झाला आहे. हे कमी म्हणून की काय आता (Temperature) वाढत्या उन्हामुळे डाळिंब उत्पादकांच्या अडचणी वाढल्या आहेत. मध्यंतरी (Unseasonable Rain) अवकाळी पाऊस आणि किड रोगराईचा प्रादुर्भाव असातनाही शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करुन बागा जोपासल्या पण आंबीया बहरातील फळे काढणीसाठी तयार होत असताना वाढत्या उन्हाचा बागांवर परिणाम होत आहे. 40 अंशावर तापमान गेल्यावर हा धोका निर्माण होतो. आतापर्यंत शेतकऱ्यांनी विविध समस्यांवर पर्याय काढलेला आहे. मात्र, आतादेखील शेतकरी विविध उपाययोजना करुन बागा जोपासण्याचे काम करीत आहेत.

वाढत्या उन्हाचा नेमका परिणाम काय?

मराठवाड्यात ढगाळ वातावरण असले तरी उन्हाळ्याच्या अंतिम टप्प्यात उत्तर महाराष्ट्रात उन्हामध्ये वाढ झाली आहे. नाशिक जिल्ह्याताल सपाटणे परिसरात पारा 40 शी पार गेला आहे. त्यामुळे डाळिंब झाडे ही तणावात आहेत तर वाढत्या उन्हामुळे आंबे बहरातील फळे ही तडकली जात आहेत. उन्हामुळे फळांवर चट्टे पडतात, तर काढणी योग्य तयार झालेले फळ टिकवून ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. फळांचा दर्जाही ढासळतो असे दुष्पपरिणाम हे बागांवर होत आहे.

काय आहे उपाययोजना?

डाळिंब बागांचे वाढत्या उन्हापासून संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना गरजेनुसार जुन्या साड्या, कापड याचा वापर करावा लागणार आहे. बाष्पप्रतिरोधक फवारल्यास झाडातील पाणी टिकून राहते. फळांच्या शिफारशीनुसार कपड्याच्या व कागदाचा वापर करावा लागणार आहे. शिवाय रात्रीच्या वेळी बागांना पाणी द्यावे लागणार आहे तर बागांमध्ये पाणी टिकवून कसे ठेवता येईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

हे सुद्धा वाचा

अंतिम टप्प्यात बागा जोपासणे महत्वाचे

डाळिंब बागा आता अंतिम टप्प्यात आहेत. मध्यंतरी अवकाळी पाऊस, निसर्गाचा लहरीपणा आणि कीड रोगराईचा प्रादुर्भाव यामधून शेतकऱ्यांनी बागाची जोपसणा केली मात्र, वाढत्या उन्हाचा धोका हा कायम आहे. जर 43 ते 44 अंशापर्यंत पारा गेला तर मात्र, बागांवर नेटचे अच्छादन गरजेचे आहे. बागा जोपासण्यासाठी सुधारित पध्दतीच्या आच्छादनाचा वापर करता येत असल्याचे उत्पादक शेतकरी सांगत आहेत.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें