Cotton Rate: पांढर सोनं अजूनही घरातच, दरावरुन शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम कायम, काय आहे सल्ला?

खरिपातील कापसाचा हंगाम अंतिम टप्प्यात असला तरी शेतकऱ्यांना अजूनही दरवाढीची प्रतीक्षा आहे. कारण सुरवातीपासूनच कापसाला चांगला दर मिळाल्याने प्रतिकूल परस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला होता. शिवाय मध्यंतरी कापसाने 10 हजार रुपये प्रति क्विंटलचा टप्पा पार केला होता. सध्याही हमीभावापेक्षा दीड पटीने दर मिळत आहे. यापेक्षाही अधिक दर मिळेल या आशेने शेतकरी कापसाची साठवणूकच करीत आहे.

Cotton Rate: पांढर सोनं अजूनही घरातच, दरावरुन शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम कायम, काय आहे सल्ला?
यंदा कापसाला विक्रमी दर मिळाला आहे.
Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Feb 04, 2022 | 11:38 AM

वाशिम : खरिपातील कापसाचा हंगाम अंतिम टप्प्यात असला तरी शेतकऱ्यांना अजूनही दरवाढीची प्रतीक्षा आहे. कारण सुरवातीपासूनच कापसाला चांगला दर मिळाल्याने प्रतिकूल परस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला होता. शिवाय मध्यंतरी (Cotton Rate) कापसाने 10 हजार रुपये प्रति क्विंटलचा टप्पा पार केला होता. सध्याही (Guarantee Rate) हमीभावापेक्षा दीड पटीने दर मिळत आहे. यापेक्षाही अधिक दर मिळेल या आशेने शेतकरी कापसाची साठवणूकच करीत आहे. कापसाच्या वाढत्या दरामुळे शेतकऱ्यांनी फरदडमधूनही उत्पादन घेण्याची संधी हुकवलेली नाही. कापसाच्या दरात मोठी वाढ झाली असली तरी दुसरीकडे (Cotton Production) उत्पादनात मोठी घट झाली आहे. ही तफावत भरुन काढण्यासाठी शेतकरी अजूनही दरवाढीच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र, गेल्या 15 दिवसांपासून दर हे स्थिरावलेले आहेत. असे असले तरी बाजारात अपेक्षित आवक नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. वाढीव दराच्या प्रतिक्षेत अजूनही हजारो क्विंटल कापूस शेतकऱ्यांनी साठवूण ठेवलेला आहे.

यामुळे वाढल्या अपेक्षा..

हंगामाच्या सुरवातीपासूनच कापसाला चांगला दर मिळालेला आहे. उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने हे अपेक्षितच होते. मात्र, कापसाचे दर नियंत्रणात यावेत म्हणून वस्त्रउद्योजकांनी मोठे प्रयत्न केले. त्याअनुशंगाने केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांची देखील भेट घेऊन आयात शुल्क कमी करण्याची मागणी करण्यात आली होती. शिवाय याबाबत अर्थसंकल्पात घोषणा होईल असा आशावाद वस्त्रुउद्योजकांना होता. मात्र, यामध्ये अर्थमंत्र्यांनीही हस्तक्षेप केलेला नाही त्यामुळे दर वाढतील असा अंदाज व्यापारी अशोक अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे दर वाढणार असून शेतकऱ्यांना साठवणूकीचा फायदाच होणार आहे.

शेतकऱ्यांचीही भूमिका ठरली निर्णायक

शेतीमालाला योग्य दर तरच विक्री अशीच भूमिका यंदा शेतकऱ्यांनी घेतलेली आहे. त्यामुळेच मागणी सोयाबीन आणि कापसाचे दर वाढले होते. शिवाय कापसाची विक्री देखील टप्प्याटप्याने केल्यानेच हे दर टिकून राहिले आहेत. गेल्या 50 वर्षातील विक्रमी दर यंदा कापसाला मिळालेला आहे. त्यामुळे उत्पादनात घट झाली तरी त्याची कसर ही वाढीव दरातून भरुन निघाली आहे. सध्या कापसाचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. असे असताना देखील शेतकऱ्यांना वाढीव दराची अपेक्षा असल्याने पांढरं सोनं अजूनही शेतकऱ्यांनी घरीच ठेवलेले आहे.

काय आहेत कापासाचे दर?

हंगामाच्या सुरवातीला 7 हजार रुपये क्विंटल असलेला कापसाने सध्या 10 हजाराचा टप्पा पार केला आहे. मागणी वाढल्याने व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या दारात येऊन खरेदी करीत असल्याने शेतकऱ्यांचा वाहतूकीचा देखील खर्च कमी झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून कापसाचे दर हे 10 हजारावरच स्थिरावलेले आहेत. मात्र, कापसावरील आयात शुल्क बाबत अर्थसंकल्पात कोणताही निर्णय झाला नसल्यामुळे पुन्हा दर वाढतील अशी आशा शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे कापूस विक्रीपेक्षा साठवणूकीवरच भर दिला जात आहे.

संबंधित बातम्या :

Pomegranate : खोडकिडीचा परिणाम थेट डाळिंब निर्यातीवर, किडीमुळे उत्पादनात घट नाही तर बागाच नष्ट, वाचा सविस्तर

Banana : हमी पीक झाले बेभरवश्याचे, केळीवर कीडीचा प्रादुर्भाव अन् विम्यासाठी शेतकऱ्यांची परवड

काळ्या मिरचीची गोष्टच न्यारी लागवड सोपी अन् उत्पादन भारी, तीन महिन्यांमध्ये शेतकरी मालामाल