काळ्या मिरचीची गोष्टच न्यारी लागवड सोपी अन् उत्पादन भारी, तीन महिन्यांमध्ये शेतकरी मालामाल

भारत देशामध्ये लागवड केली जात असलेल्या मिरचीचे वेगवेगळे प्रकार आहेत. या माध्यमातून बनला जाणारा मसला म्हणजे या विविधतेमधील एकतेचे प्रतीक आहे. यामुळेच भारतीय मसाल्यांचा सुगंध सबंध जगभर दरवळत आहे. येथील मसाल्यांना जगभरातून मागणी आहे. एवढेच नाही मसाल्यांच्याच्या निर्यातीमध्ये भारताचा पहिला क्रमांक आहे. मोठ्या प्रमाणातील क्षेत्रावर मसाल्याचे पदार्थांचे उत्पादन घेतले जाते.

काळ्या मिरचीची गोष्टच न्यारी लागवड सोपी अन् उत्पादन भारी, तीन महिन्यांमध्ये शेतकरी मालामाल
काळ्या मिरचीची लागवड पध्दृत सोपी असून कमी खर्चात अधिकचे उत्पादन शेतकऱ्यांना मिळते
Follow us
| Updated on: Feb 04, 2022 | 2:08 PM

मुंबई : भारत देशामध्ये लागवड केली जात असलेल्या मिरचीचे वेगवेगळे प्रकार आहेत. या माध्यमातून बनला जाणारा मसला म्हणजे या विविधतेमधील एकतेचे प्रतीक आहे. यामुळेच (Indian Spices) भारतीय मसाल्यांचा सुगंध सबंध जगभर दरवळत आहे. येथील मसाल्यांना जगभरातून मागणी आहे. एवढेच नाही मसाल्यांच्याच्या निर्यातीमध्ये भारताचा पहिला क्रमांक आहे. मोठ्या प्रमाणातील क्षेत्रावर मसाल्याचे पदार्थांचे उत्पादन घेतले जाते. तर जवळपास सर्वच मसाल्यांची लागवड ही देशभरात केली जात आहे. त्यापैकीच एक असलेली ही (Black Chilly) काळी मिरची, या काळ्या मिरचीला देशांतर्गत आणि (International Market) आंतरराष्ट्रीय स्तरावर कायम मागणी असते. त्यामुळे शेतकऱ्यांना तर चांगला फायदा होत आहेच पण या मिरचीची लागवडपध्दती आणि त्यासाठी लागणारा खर्च सर्वकाही अटोक्यात असल्याने मिरची काळी असली तरी शेतकऱ्यांना मालामाल करणारी आहे. काळ्या मिरचीचा वापर शक्यतो गरम मसल्यासाठी केला जातो. शिवाय उत्पादनखर्च कमी असून बाजारातील दर हे कायम चढलेलेच असतात. देशात सर्वाधिक लागवड ही केरळात केली जात आहे. एकूण उत्पादनाच्या 98 टक्के उत्पादन केवळ केरळातून घेतले जात आहे. यानंतर कर्नाटक, अंदमान निकोबार बेटे, महाराष्ट्र आणि पांडेचेरी येथे लागवड केली जाते.

फळांच्या बागेमध्येही लागवड फायद्याची

वेगवेगळ्या फळांची झाडे मोठी असतील अशा क्षेत्रामध्ये आंतरपिक म्हणून काळ्या मिरचीची लागवड करता येते. कारण या मिरचीसाठी तीव्र सुर्यप्रकाश आणि योग्य आर्द्रता असलेले वातावरण पोषक असते. यामध्ये साधारणत: 10 ते 40 अंशापर्यंत तापमान आणि आर्द्रतेचे प्रमाण हे 60 ते 70 टक्के असणे आवश्यक आहे. अशा वातावरणात काळी मिरचीची वाढ झपाट्याने होते. असे पोषक वातावरण हे किनारपट्टीच्या लगत असते म्हणूनच केरळात सर्वाधिक क्षेत्र आणि उत्पादन दोन्ही अधिक आहे. सुपीक जमीन तिच्या लागवडीसाठी सर्वात योग्य मानली जाते. शिवाय येथील शेतीचे पीएच मूल्य 4.5 ते 6 च्या दरम्यान असते म्हणून चांगले उत्पादन मिळते. मिरपूडची झाडे वेलीसारखी वाढतात. त्यामुळे त्यांची वाढ होण्यासाठी उंचच उंच झाडांची गरज असते. हेच कारण आहे की रिकाम्या क्षेत्रात काळी मिरचा न पेरता उंच झाडे असलेल्या बागांमध्ये लागवड केली जाते. काळी मिरीचीची दोन टप्प्यात पेरणी होते. पहिल्या टप्प्यात वनस्पती तयार होते आणि दुसऱ्या टप्प्यात रोपाचे प्रत्यारोपण केले जाते. दुसऱ्या टप्प्यातील मिरची ही झाडांच्या मुळाजवळ लावली जाते. त्यामुळेच वेलीप्रमाणे ती झाडावर वाढते आणि उत्पादनही अधिकचे मिळते.

या गोष्टींची घ्यावी लागते काळजी

काळ्या मिरचीचे रोप तयार करण्यासाठी जुन्या वेलींवरुन या मिरचीची छाटणी करावी लागते. छाटणी केलेल्या मिरचीला माती आणि खताने भरलेल्या पॉलिथीनच्या पिशव्यांमध्ये ठेवावे लागते. या प्रक्रियेच्या 50 ते 60 दिवसांनंतर याचे रोप लागवडीयोग्य होते. रोपांसाठी एक हात रुंद आणि इतका खोल खड्डा खणला जातो. रोपवाटिकेनंतर तातडीने पाणी द्यावे लागते. सुरुवातीला दिवसातून दोन वेळा सिंचनाची गरज भासते. वेळ निघून गेल्यानंतर आठवड्यातून एकदाच पाणी दिले तरी मिरचीची वाढ जोमात होणार आहे. शिवाय पावसाळ्यात तर सिंचनाची गरजच नसते. मिरचीच्या वाढीसाठी 15 ते 20 दिवसांमधून तण काढावे लागते तर मिरचीची झाडे वर चढू लागली की छाटणीचे काम करावे लागते. मिरचीच्या वेली वाढल्या की, त्यावर हिरवे गुच्छ दिसू लागतात. गुच्छात एकापेक्षा जास्त फळे दिसले की नोव्हेंबरमध्ये तोडणी करता येणार आहे. योग्य जोपासणा झाली तर एका रोपाला साधारणतः दीड किलो कोरडी काळी मिरी मिळते. उत्पन्न वाढीचा हा चांगला मार्ग असून दिवसेंदिवस काळ्या मिरचीचे क्षेत्र वाढत आहे.

संबंधित बातम्या :

Onion: बाजार समितीच्या एका निर्णयाने कांदा उत्पादकांचा प्रश्न मिटला, आवक सुरुच उलट दरात सुधारणा

Drone farming | जमलंच गड्या! इकडं अर्थमंत्र्यांनी सांगितलं अन् भंडाऱ्याच्या बहाद्दरानं ड्रोन शेतीचा प्रयोगही केला!

Crop Insurance : पीकविम्यासाठी राज्याची स्वतंत्र योजना, कृषिमंत्र्यांनीही दिले संकेत, कशामुळे निर्माण झाली परस्थिती?

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.