रविकांत तुपकरांचे शेतकऱ्यांकडून कौतुक, एआयसी पिकविमा कंपनीने जिल्ह्यातील ५० हजार ७५७ शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा

शेतकऱ्यांनी रविकांत तुपकरांवर केला फुलांचा वर्षाव केला आहे. पिकविमा तसेच नुकसान भरपाई मिळवून दिल्याबद्दल शेतकऱ्यांकडून सत्कार देखील करण्यात आला आहे. पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत.

रविकांत तुपकरांचे शेतकऱ्यांकडून कौतुक, एआयसी पिकविमा कंपनीने जिल्ह्यातील ५० हजार ७५७ शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा
RAVIKANT TUPKAR NEWS
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 16, 2023 | 8:46 AM

गणेश सोळंकी, बुलढाणा : आपल्या जिवाची पर्वा न करता आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी (Farmer news) लढा देत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा आणि नुकसान भरपाईची रक्कम मिळवून दिल्याबद्दल शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांच्यावर शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी फुलांचा वर्षाव केला. यावेळी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे शेतकऱ्यांकडून फटाके फोडू जंगी स्वागत देखील करण्यात आले. सोयाबीन-कापसाला दरवाढ, पिक विमा, सततचा पाऊस आणि अतिवृष्टीची नुकसान भरपाई (Flood Damage Compensation), पीक कर्ज यासह शेतकऱ्यांच्या महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी रविकांत तुपकर सातत्याने लढा देत आहेत. एल्गार मोर्चा आणि त्यानंतर मुंबईतील जलसमाधी आंदोलन, त्यानंतर जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या कार्यालयात मुक्काम, आत्मदहन आंदोलनाच्या माध्यमातून रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची रक्कम मिळवून दिली आहे.

आता पुन्हा एकदा त्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले होते. १५ जून पर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास १६ जून रोजी हजारो शेतकऱ्यांसह मुंबईत धडक देऊन एआयसी विमा कंपनीच्या २० व्या मजल्यावरील कार्यालयातून खाली उड्या मारु, असा गंभीर इशारा देत त्या आंदोलनाची तयारही सुरु केली होती. दरम्यान या आंदोलनाच्या धसक्याने एआयसी पिकविमा कंपनीने जिल्ह्यातील ५०,७५७ शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण असून शेतकऱ्यांनी तुपकर यांच्याकडे भेटण्यासाठी उत्स्फूर्त गर्दी करत तुपकरांचे उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी रविकांत तुपकर यांच्यावर शेतकऱ्यांनी पुष्पवृष्टी करुन त्यांचा तमाम शेतकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

जिथं शेतकऱ्यांवरती अन्याय झाला आहे. तिथं शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी जाऊन शेतकऱ्यांना मदत केली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मागील कित्येक वर्षांपासून ते मदत करीत आहेत. अनेकदा त्यांनी आंदोलनं केली आहेत. त्याचबरोबर त्यांनी शेतकऱ्यांसोबत केलेल्या आंदोलनाला यश देखील मिळालं आहे. महाराष्ट्रात रब्बी आणि खरीप हंगामात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. त्यासाठी देखील तुपकरांनी आंदोलन केलं होतं. सध्या ५० हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाल्याने शेतकरी वर्ग अधिक खूष आहे.