AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पीएम किसान योजनेच्या 14 व्या हप्त्यापूर्वी हे महत्त्वाचे काम करा, तरच तुमच्या खात्यात 2 हजार रुपये येतील

पीएम किसान योजनेची हलचाल सध्या वेगाने सुरु आहे. सरकारकडून शेतकऱ्यांना लवकरचं ई-केवाईसी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यावेळी कसल्याची प्रकारची अडचण आल्यानंतर मदन नंबर (155261 या 1800115526) (011-23381092) इथे संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे.

पीएम किसान योजनेच्या 14 व्या हप्त्यापूर्वी हे महत्त्वाचे काम करा, तरच तुमच्या खात्यात 2 हजार रुपये येतील
farmer
Updated on: Jun 15, 2023 | 2:38 PM
Share

मुंबई : पीएम किसान योजनेच्या (pm kisan kyc) माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपयांची मदत केली जाते. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चार महिन्यानंतर ३ टप्प्यांमध्ये दोन-दोन हजार रुपये जमा होतात. सध्या आतापर्यंत शेतकऱ्यांना १३ हप्ते देण्यात आले आहेत. 14 व्या हप्त्याची शेतकरी वाट पाहत आहेत. सरकारकडून शेतकऱ्यांना लवकरचं ई-केवाईसी (kyc) करण्याचे आदेश दिले आहेत. आजची शेवटची तारिख आहे, असं म्हटलं जात आहे की, १५ जूननंतर शेतचकऱ्यांच्या खात्यामध्ये (pm kisan kyc update) दोन हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे.

पीएम किसान योजनेचा देशातील सगळ्या शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. पण मागच्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांनी ई-केवाईसी केली नसल्यामुळे लाभार्थी शेतकरी कमी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. ज्यांच्या जमिनीच्या नोंदींची पडताळणी झालेली नाही, त्याच्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. 14 व्या हप्त्यादरम्यानही मोठ्या प्रमाणात अपात्र शेतकऱ्यांची नावे लाभार्थ्यांच्या यादीतून वगळली जाऊ शकतात. त्या शेतकऱ्यांना सरकारकडून पैसे परत करण्यासाठी सातत्याने नोटिसा पाठवण्यात येत आहेत. पैसे परत न केल्यास त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे. काही लोकांनी पैसे परत केले आहेत.

ज्या शेतकऱ्यांना ई-केवाईसी करायची आहे, त्यांनी सुरुवातीला किसान योजना या ऑफिशियल वेबसाइटवरती जाऊन त्या प्रक्रियेला पूर्ण करायची आहे.

सुरुवातीला तुम्ही www.pmkisan.gov.in या संकेतस्थळावरती जावं लागेल त्यानंतर तुमचं होम पेज ओपन होईल त्यानंतर E-KYC या पर्यायावरती जावे तिथं आधारकार्ड नंबर आणि कैप्चा भरावा आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाका त्याच्यानंतर तुमच्या मोबाईलवरती ओटीपी येईल ओटीपी टाकल्यानंतर तुमची e-KYC होऊन जाईल

इथे संपर्क साधा

पीएम किसान योजनेच्या संदर्भात कसल्याही प्रकारची असल्यास किसान ईमेल आईडी pmkisan-ict@gov.in इथं संपर्क साधू शकता. पीएम किसान योजनेची हलचाल सध्या वेगाने सुरु आहे. सरकारकडून शेतकऱ्यांना लवकरचं ई-केवाईसी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यावेळी कसल्याची प्रकारची अडचण आल्यानंतर मदन नंबर (155261 या 1800115526) (011-23381092) इथे संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे.

उद्धव ठाकरेंकडून दानवेंचं कौतुक अन् विरोधकांना चिमटे
उद्धव ठाकरेंकडून दानवेंचं कौतुक अन् विरोधकांना चिमटे.
दानवेंच्या निरोप समारंभात फडणवीसांची शाल-पागोट्यातून टोलेबाजी
दानवेंच्या निरोप समारंभात फडणवीसांची शाल-पागोट्यातून टोलेबाजी.
Mahadev Munde Case:माझ्या सिंदूरला न्याय द्या, ज्ञानेश्वरी मुंडे भावूक
Mahadev Munde Case:माझ्या सिंदूरला न्याय द्या, ज्ञानेश्वरी मुंडे भावूक.
उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांची भेट अन् हसून गप्पा
उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांची भेट अन् हसून गप्पा.
महाजन मनसेत नाराज? अमित ठाकरेंचा फोन; तुम्ही मीडियाकडे का गेलात..
महाजन मनसेत नाराज? अमित ठाकरेंचा फोन; तुम्ही मीडियाकडे का गेलात...
दोन्ही सेना अन्यायाविरुद्ध रस्त्यावर लढणाऱ्या - उपमुख्यमंत्री शिंदे
दोन्ही सेना अन्यायाविरुद्ध रस्त्यावर लढणाऱ्या - उपमुख्यमंत्री शिंदे.
पायाला जखमा, 12 दिवस खांद्यावर नांगर अन् मुंबईच्या दिशेन पायपीट
पायाला जखमा, 12 दिवस खांद्यावर नांगर अन् मुंबईच्या दिशेन पायपीट.
नितेश राणेंच्या खात्याची जाहिरात सामनाच्या फ्रंट पेजवर; राऊत म्हणाले..
नितेश राणेंच्या खात्याची जाहिरात सामनाच्या फ्रंट पेजवर; राऊत म्हणाले...
शिंदेंसोबतच्या युतीवर आनंदराज आंबेडकरांची मोठी प्रतिक्रिया
शिंदेंसोबतच्या युतीवर आनंदराज आंबेडकरांची मोठी प्रतिक्रिया.
प्रेमासाठी आत्महत्येचा बनाव करत दुसऱ्याच महिलेला जीवंत जाळलं अन्...
प्रेमासाठी आत्महत्येचा बनाव करत दुसऱ्याच महिलेला जीवंत जाळलं अन्....