AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वत:च्या ताटात पडलेलं गाढवं ज्याला काढता येत नाही, तो..मंत्र्यांच्या ताटात काजू, बदामवरुन सुषमा अंधारेंनी संजय शिरसाटना सुनावलं

उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकारावर बोचरी टीका केली आहे. "ज्याचं जळतं त्याला कळतं. ज्यांना दुष्काळाच्या झळा बसत आहेत, त्या शेतकऱ्याच्या तोंडचं पाणी पळालं आहे. काजू-बदाम खाणं तर दूरची गोष्ट आहे"

स्वत:च्या ताटात पडलेलं गाढवं ज्याला काढता येत नाही, तो..मंत्र्यांच्या ताटात काजू, बदामवरुन सुषमा अंधारेंनी संजय शिरसाटना सुनावलं
Sushma Andhare-Sanjay Shirsat
| Updated on: Sep 19, 2026 | 12:41 PM
Share

महाराष्ट्रात सध्या भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यावर एल निनोचा प्रभाव तीव्रतेने जाणवत आहे. मागच्या काही दिवसांपासून पाऊस गायब झाला आहे. यामुळे राज्यातला शेतकरी हवालदिल झाला आहे. पावसाअभावी शेती संकटात आली आहे. पाऊस नसल्याने शेतकरी पेरणी करु शकत नाहीय. दुसरीकडे जी पेरणी केली होती, ते पीक वाया जातय. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांकडून राज्यात कोरडा दुष्काळ लवकरात लवकर जाहीर करावा अशी मागणी होत आहे. राज्यातला शेतकरी दुष्काळाच्या या झळा सोसत असताना आज नांदेडमध्ये कृषी मंत्री दत्तात्रय भरणे गेले होते. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ते गेले होते. त्यावेळी बैठकीत चक्क मंत्री आणि आमदारांसाठी काजू, बदाम देण्यात आले. त्यावरुन राज्यात संतापाची लाट उसळली आहे.

उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकारावर बोचरी टीका केली आहे. “ज्याचं जळतं त्याला कळतं. ज्यांना दुष्काळाच्या झळा बसत आहेत, त्या शेतकऱ्याच्या तोंडचं पाणी पळालं आहे. काजू-बदाम खाणं तर दूरची गोष्ट आहे. पण जे आपले 50-50 खोके, भ्रष्टाचाराच्या फायली लपवायला गेले आहेत. जे नवी मुंबई, सिडको, एमआयडीसीच्या जमिनी हडप करुन बसले आहेत. त्यांना शेतकऱ्याचं दु:ख कळणार नाही” अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी सुनावलं.

जखमेवर मीठ चोळण्याचं काम

“मराठवड्यातला शेतकरी कोणत्या परिस्थितीतून जातोय. दुष्काळ जाहीर करण्यासाठी कसल्या बैठक घेता?. रेस्ट हाऊसवर बसून कसल्या बैठका करता, धरणं कोरडी पडली आहेत.रात्रीचा काही जिल्ह्यात तुरळक पाऊस पडला आहे. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दुष्काळ जाहीर करण्याची भूमिका का घेऊ नये? चमकोगिरी हे मंत्री करतायत. शेतकरी दु:खी, खिन्न अवस्थेत असताना त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम हे शिंदेंचे मंत्री करत आहेत” अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी टीका केली.

बंडू जाधव राज्यात मंत्री आहेत का?

“मूळात बैठकांचा हा फार्स शिंदेंचे लोक का घेतात? संजय शिरसाटकडे कृषी खातं आहे का? बंडू जाधव राज्यात मंत्री आहेत का? यांच्याकडे कुठले अधिकार आहेत? ते दिलासा देऊ शकतात का? संजय शिरसाटकडे जे खातं आहे, ते त्याला नीट चालवता येतं का?. सामाजिक न्यायचा निधी कोण पळवून नेतय हे त्याला कळत नाहीय. स्वत:च्या ताटात पडलेलं गाढवं ज्याला काढता येत नाही. तो शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन काय करणार?. ज्यांना कोळपणी, फवारणी, दुबार पेरणी, खुरपणी कळत नाही, अशा शिंदेंच्या मंत्र्यांनी चमकोगिरी करण्याची गरज नाही” असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं.

Follow Us
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा बदामावर
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा काजु-बदामावर ताव
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तप
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला वरंवार पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तपासणी
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांचां दावा
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश