Beed : काय सांगता..? खत म्हणून कोळसा अन् वाळू मिश्रणाची विक्री, व्यापाऱ्याचा अजब कारभार थेट खंडपीठात

| Updated on: Jul 29, 2022 | 11:09 AM

यंदा खरिपाच्या पेरण्या उशिराने झाल्या आहेत. यात खत आणि बियाणांची टंचाई भासेल असा अंदाज हंगाम सुरु होतानाच व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी खताची पारख न करता खत खरेदीवर भर दिला. शेतकऱ्यांचे दुर्लक्ष आणि व्यापाऱ्यांचा अर्थार्जनाचा उद्देश यामुळे यंदा बोगस खत विक्रीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

Beed : काय सांगता..? खत म्हणून कोळसा अन् वाळू मिश्रणाची विक्री, व्यापाऱ्याचा अजब कारभार थेट खंडपीठात
बोगस खताचा साठा जप्त करताना बीड येथील कृषी अधिकारी
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

बीड : आतापर्यंत (Bogus Fertilizer) बोगस बियाणे आणि खत विक्रीची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. बीडमध्ये मात्र, अजबच प्रकार समोर आला आहे. नामांकित खत कंपनीच्या नावाचा वापर करुन खत म्हणून चक्क कोळसा आणि वाळूच्या मिश्रणाची विक्री करण्यात आली होती. याप्रकरणी थेट (High Court) उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात करण्यात आली होती. एकीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी त्रस्त आहे. (Kharif Season) खरिपात दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढावले होते तर अशा बोगस खत विक्रीतूनही अनेकांचे नुकसान झाले आहे. खत विक्रीतून शेतकऱ्यांची फसवणूक अशा घटना दिवसेंदिवस वाढत असून यावर तोडगा काढणे गरजेचे आहे. शिवाय खताची विक्री आणि वापर केल्यानंतर वास्तव बाहेर येत असल्याने होणारे नुकसान कोणी भरुन काढू शकत नाही. बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात हा प्रकार घडला होता. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

नेमके प्रकरण काय ?

यंदा खरिपाच्या पेरण्या उशिराने झाल्या आहेत. यात खत आणि बियाणांची टंचाई भासेल असा अंदाज हंगाम सुरु होतानाच व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी खताची पारख न करता खत खरेदीवर भर दिला. शेतकऱ्यांचे दुर्लक्ष आणि व्यापाऱ्यांचा अर्थार्जनाचा उद्देश यामुळे यंदा बोगस खत विक्रीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. माजलगावमध्ये तर खत म्हणून कोळसा आणि वाळूचे मिश्रण विकले गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान तर होणार आहेच पण व्यापाऱ्यांकडून केवळ पैसा कमावण्याच्या दृष्टीकोनातून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे.

काय आहेत खंडपीठाचे आदेश?

माजलगावातील व्यापाऱ्याचा हा प्रताप समोर येताच औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. याबाबत खंडपीठाने माजलगाव कृषी विभागाला छापेमारी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शहरातील एका व्यापाऱ्याकडून तब्बल तीस पोते बोगस खत जप्त करण्यात आले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. एवडेच नाहीतर याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

यंदाच्या हंगामात तक्रारी वाढल्या

यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरवातीलाच खत आणि बियाणांची टंचाई असल्याचे भासविण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकचा वेळ खर्ची न करता खत खरेदीवर भर दिला. मात्र, त्याची गुणवत्ता न तपासता शेतकऱ्यांनी खत कसे पदरात पडेल हेच पाहिले. शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा व्यापारी तसेच खत कंपन्यांनी गैरफायदा घेतला. बोगस खताची आणि बियाणांची विक्री होऊ नये म्हणून कृषी विभागाने तालुकानिहाय भरारी पथकाची नेमणूक केली होती. असे असताना यंदा शेतकऱ्यांच्या तक्रारी ह्या वाढेलेल्या आहेत.