नाचणी पेरत शेतकर्यांची दुष्काळावर मात, धाराशिवमध्ये नैसर्गिक शेतीचा प्रयोग, हिरव्या चाऱ्यासह आर्थिक संकट दूर
Millet Nachni Dharashiv Farmers: दुष्काळाची चिंता वाहण्यापेक्षा त्यावर मात करण्यासाठी प्रयोग करण्याचे धाडस धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दाखवले. उमरगा तालुक्यातील ११ शेतकऱ्यांनी नाचणी पेरणीचा अनोखा प्रयोग केला आणि तो यशस्वी करून दाखवला. त्याची आता राज्यभर चर्चा होत आहे. काय आहे हा प्रयोग, काय झाला त्यातून फायदा?

Millet Nachni Dharashiv Farmers: धाराशिव जिल्ह्यामधील उमरगा तालुक्यातील जक्केकुरच्या शेतकऱ्यांनी शेतीतून उत्पन्नाचा नवा पर्याय शोधला आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर केवळ पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता ११ शेतकऱ्यांनी एकत्र येत तब्बल ११ एकर क्षेत्रावर नाचणी लागवडीचा यशस्वी प्रयोग केला आहे. यामुळे ऐन दुष्काळात जनावरांना हिरवा चारा उपलब्ध झाला. तर शेतकर्यांना आर्थिक बळही मिळाले. दुष्काळाशी दोन हात करत जक्केकुरच्या शेतकऱ्यांनी नाचणीच्या माध्यमातून शेतीला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे.
एकरी ६० हजारांचे उत्पन्न
धाराशिव जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असताना उमरगा तालुक्यातील जक्केकुरच्या शेतकऱ्यांनी शेतीतून उत्पन्नाचा नवा पर्याय शोधला आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर केवळ पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता ११ शेतकऱ्यांनी एकत्र येत तब्बल ११ एकर क्षेत्रावर नाचणी लागवडीचा यशस्वी प्रयोग केला आहे. विशेष म्हणजे, नैसर्गिक पद्धतीने केलेल्या या नाचणी लागवडीतून एकरी सुमारे ६० हजार रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. यासोबतच जनावरांसाठी हिरवा चाराही उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होण्याची शक्यता आहे. धाराशिव जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. दुष्काळाशी दोन हात करत जक्केकुरच्या शेतकऱ्यांनी नाचणीच्या माध्यमातून शेतीला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे.
आर्थिक उत्पन्नासोबतच जनावारांना हिरवा चारा
नाचणी लागवड प्रयोगातून दोन महत्त्वाचे उद्देश साध्य होणार आहेत. एकतर कमी पाण्यात शेतकऱ्यांना चांगेल आर्थिक पाठबळ मिळणार आहे. या प्रयोगातून ६० हजार रुपयांपर्यंतचे विक्रमी उत्पन्न मिळण्याची दाट शक्यता आहे. तर आर्थिक नफ्यासोबतच गावातील जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही सुटणार आहे. या पिकाच्या माध्यमातून जनावरांना पौष्टिक हिरवा चारा मिळणार आहे. यामुळे दूध उत्पादकांचा प्रश्न सुटणार आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही सुटणार आहे. तर आर्थिक गणितही जुळून येणार आहे.
धाराशिव जिल्ह्यातील पहिलाच अनोखा प्रयोग
धाराशिव जिल्ह्यात नाचणीचा असा सामूहिक शेतीचा पहिलाच प्रयोग राबवण्यात येत आहे. यामध्ये उमरगा तालुक्यातील जक्केकुरच्या ११ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. त्यांनी पारंपारिक शेतीला फाटा देत नाचणीची लागवड केली. दुष्काळी दोन हात करताना या शेतकऱ्यांनी एक नवीन आदर्श घालून दिला आहे. या प्रयोगाची आता राज्यभर चर्चा होत आहे. यापूर्वी लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यामधील बाणेगाव येथील चंद्रकांत परिहार यांच्या तैवान पिंक पेरूचा प्रयोगही चर्चेत आहे.