शेतकऱ्यांवरील संकट कमी होईना, पपईचं पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

| Updated on: Mar 28, 2023 | 2:45 PM

पेरणीसाठी लागणाऱ्या बियाणं आणि साहित्य घेण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्त प्रोत्साहनपर योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. त्यामुळे आता झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून ती पद्धत देखील तात्काळ मिळावी असे देखील मागणी शेतकरी राजा करू लागला आहे.

शेतकऱ्यांवरील संकट कमी होईना, पपईचं पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
Papaya Plant
Image Credit source: tv9marathi
Follow us on

नंदुरबार : जिल्ह्यातील शेतकरी अवकाळी आणि गारपिटीमुळे (Unseasonal Rain) मोठ्या संकटीत सापडला आहे. या संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारकडून महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहनपर योजना राबविण्यात येत आहे. अल्प मुदतीच्या पीककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील ५ हजार ७५५ शेतकऱ्यांना २६ कोटी १९ लाख रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना (farmer) मोठा दिलासा मिळाला आहे. प्रत्येक शेतकऱ्याला पन्नास हजार लाभ देण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला असून ऐन पेरणीच्या वेळेस आलेल्या पैशामुळे पुढे हंगामासाठी शेतकरी पेरणी करू शकणार आहे.

पेरणीसाठी लागणाऱ्या बियाणं आणि साहित्य घेण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्त प्रोत्साहनपर योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. त्यामुळे आता झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून ती पद्धत देखील तात्काळ मिळावी असे देखील मागणी शेतकरी राजा करू लागला आहे.

नंदुरबार जिल्हा हा पपई उत्पादक म्हणून ओळखला जात असतो. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पपईची लागवड केली जाते. मात्र गेल्या अनेक वर्षापासून पपई पीक संकटात सापडत चालला आहे. जिल्ह्यात तापमानाच्या पारा 40° सेल्सियस पर्यंत गेला होता. त्यामुळे पपई पिकाला मोठा फटका बसला होता. तर अवकाळी पावसामुळे देखील पपईच्या नुकसान झालं होतं. अशा संकटातला पपई उत्पादक शेतकरी तोंड देत असताना पुन्हा पपई उत्पादक शेतकऱ्यांसमोर संकट येऊन ठेपला आहे.

हे सुद्धा वाचा

पपई पिकावर मोजँक आणि डावणी रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पपई उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. त्यामुळे पपई उत्पादक शेतकऱ्यांसमोरील संकट काय कमी होताना दिसून येत नाही आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतात मोर्केज रागाचा प्रादुर्भाव दिसून येत असून, उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घट होण्याची परिस्थिती उपस्थित होत आहे. सध्या पपईच्या बागांवर पडलेल्या या असाध्य रोगांपासून अजून दोन महिने पपई धोका असून पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे.