शेतकऱ्यांच्या हक्कासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा महासंग्राम मेळावा

| Updated on: Feb 28, 2022 | 10:17 AM

एकीकडे 'एफआरपी'चे दोन तुकडे केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राज्यभर आंदोलने सुरु आहेत. ठिकठिकाणी शासन निर्णयाची होळी केली जात आहे. तर दुसरीकडे बुलडाणा येथे शेतकऱ्यांच्या हक्काचा असलेला पीकविमा आणि घरकुल मिळावे या मागणीसाठी महासंग्राम मेळावा पार पडला आहे. सरकारकडून योजनांच्या घोषणा तर होतात पण प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे दुर्लक्ष होत आहे.

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा महासंग्राम मेळावा
शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन बुलडाणा जिल्ह्यातील पातूरडा येथे महासंग्राम मेळावा पार पडला
Follow us on

बुलडाणा : एकीकडे (FRP) ‘एफआरपी’चे दोन तुकडे केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राज्यभर आंदोलने सुरु आहेत. ठिकठिकाणी शासन निर्णयाची होळी केली जात आहे. तर दुसरीकडे (Buldhana) बुलडाणा येथे शेतकऱ्यांच्या हक्काचा असलेला पीकविमा आणि घरकुल मिळावे या मागणीसाठी महासंग्राम मेळावा पार पडला आहे. सरकारकडून योजनांच्या घोषणा तर होतात पण प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे दुर्लक्ष होत आहे. (Kharif Season) खरीप हंगामात अनेक शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत सहभाग नोंदवला पण प्रत्यक्षात अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्याची रक्कम ही अदा झालेली नाही. आंदोलन आणि मोर्चे काढल्याशिवाय याची नोंद घेतली जात नाही म्हणूनच बुलडाणा जिल्ह्यातील पातूरडा येथे शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डीक्कर यांच्या नेतृत्वामध्ये या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

पीकविमा योजना, सुविधांपेक्षा अडचणी अधिक

नैसर्गिक आपत्तीमधून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी याकरिता केंद्र सरकारच्या माध्यमातून ही योजना राबवली जात आहे. मात्र, स्थानिक पातळीवर विमा कंपन्यांची मनमानी होत असल्याने अनेक शेतकरी हे योजनेपासून वंचित राहत आहेत. यामुळे राज्यासाठी स्वतंत्र विमा योजना राबवण्याची मागणी शेतकरी संघटनांनी राज्य सरकारकडे केली होती. पीकविम्याचे पैसे हे शेतकऱ्यांच्या हक्काचे असून ते मिळवून देण्यासाठीच या महासंग्राम मेळाव्याचे आयोजन संघटनेच्यावतीने करण्यात आले होते. या मागण्या मान्य न झाल्यास स्वाभिमानी स्टाईल ने या सरकारला धडा शिकविल्या जाईल असा इशारा यावेळी। या महासंग्राम मेळाव्यात देण्यात आला आहे.

हक्काच्या घरापासूनही शेतकरी वंचित

घरकुल योजनेत हक्काचे घर उभारणीसाठी शासनाच्या माध्यमातून गरजुंना 3 लाखापर्यंतची मदत केली जाते.पण अनेकांना याचा लाभ मिळत नाही. त्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांचे अजून हक्काचे घरही नाही. शेतकऱ्यांचे विविध प्रश्न घेऊन या मेळाव्यात राज्य सरकारच्या कारभारावर बोट ठेवण्यात आले होते. ग्रामीण भागात अनुदान कमी आणि शहरी भागात अनुदान जास्त असा भेदभाव घरकुल लाभार्थ्यांच्या बाबतीत करण्यात येत आहे. त्यामुळे हा अन्याय दूर करण्याची मागणी ही या मेळाव्यात करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे मुलभूत प्रश्न घेऊन या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान, शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

संबंधित बातम्या :

PM Kisan Yojna : योजनेचा लाभ मिळाला नाही मग, चिंता सोडा अन् बातमी वाचा

Red Chilly : मिरचीचे उत्पादन घटले दर वाढले, लाल मिरचीच्या आगारात काय आहे चित्र ?

e-Shram Yojana : 25 कोटी कामगारांची नोंदणी मात्र, योजनेचा लाभ नेमका कुणाला? वाचा सविस्तर