सांगलीच्या पट्ठ्याची कमाल, पाश्चिमात्य देशातील लोकप्रिय ‘लाल भेंडी’ थेट वारणा किनारी

| Updated on: Mar 01, 2021 | 10:10 PM

पाश्चिमात्य देशात लोकप्रिय असलेली लाल भेंडी आता आपल्या देशातही पिकायला सुरुवात झालीय.

सांगलीच्या पट्ठ्याची कमाल, पाश्चिमात्य देशातील लोकप्रिय लाल भेंडी थेट वारणा किनारी
Follow us on

सांगली : पाश्चिमात्य देशात लोकप्रिय असलेली लाल भेंडी आता आपल्या देशातही पिकायला सुरुवात झालीय. सांगलीतील सदाशिव घेवारे या युवा शेतकऱ्याने लाल भेंडीचा प्रयोग यशस्वी केलाय. सांगलीच्या ऐतवडे खुर्द या वारणा नदी काठी वसलेल्या गावात हा अनोखा प्रयोग करण्यात आलाय. सदाशिव डी. वाय. पाटील आर्किटेक्टचर कॉलेज (कोल्हापूर) येथे चौथ्या वर्षात शिक्षण घेत आहे. सोबतच प्रयोगशील शेतीही करत आहे (Farming of Red ladyfinger in Sangli by young farmer).

लाल भेंडीमध्ये अँटी ऑक्सीडंटचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास या भेंडीची मदत होते. तसेच या भेंडीत पोटॅशियम कॅल्शियम आणि लोहाचे प्रमाणही सर्वाधिक आहे, अशी माहिती युवा शेतकरी सदाशिव घेवारे याने दिली.

वाराणसीत संशोधन केलेलं बियाणं वारणा काठीच्या काळ्या मातीत रुजवलं

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हेजिटेबल रिसर्च (वाराणसी) संस्थेतील शास्त्रज्ञांनी 1996 पासून सुरु केलेल्या संशोधनाला गेल्या वर्षी यश मिळाले. काशी लालीमा नावाच्या या वाणाचे बियाणे तेथेच उपलब्ध होते. ही माहिती मिळवून सदाशिव घेवारेने तेथून बियाणे गेतले. तसेच आपल्या काळ्या मातीत या पिकाचा यशस्वी प्रयोग केला.

आजीच्या नावाने अॅग्रो फार्म कंपनी, 11 परदेशी भाजीपाल्यांची लागवड

सदाशिवने आपल्या आजीच्या नावाने ‘ताराकाकी एक्झोटीक ॲग्रो फार्म’ अशी शेती सुरु केली. या फार्ममध्ये सध्या 11 परदेशी भाजीपाल्यांची लागवड करून निर्यात केली जाते. या ठिकाणी ‘ग्रोविंग कलरफुल व्हेजिटेबल फॉर कलरफुल इंडिया’ हे ब्रीद घेऊन सतत नवीन रंगीत पीकं घेतली जात आहे. लाल भेंडी हे पीक सर्वांच्या पसंतीस उतरेल, अशी आशा सदाशिवला आहे.

रोग प्रतिकारशक्ती वाढवणारी लाल भेडीत अनेक गुणसत्वं

लाल भेंडीमध्ये अँटी ऑक्सीडंटचं प्रमाण जास्त असल्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. तसेच पोटॅशियम कॅल्शियम आणि लोहाचे प्रमाणही सर्वाधिक आहे. त्यामुळे सर्वांनीच हे वापरणं आरोग्यासाठी चांगलं असल्याचं मत युवा शेतकरी सदाशिव घेवारे व्यक्त करतो.

हेही वाचा :

त्यांना पोलीस महासंचालक पदावरुन हटवलं तर थेट IPS अधिकाऱ्यानं नोकरी सोडली, म्हणाले, थेट गावी जाऊन शेती करतो !

शेती परवडत नाही म्हणता? मग रेशीम शेती करा, लाखो कमाईची हमी, सरकारकडून महारेशीम अभियान, वाचा सविस्तर

युवा शेतकऱ्याची कमाल, जिरे शेतीची 50 कोटींची उलाढाल

व्हिडीओ पाहा :

Farming of Red ladyfinger in Sangli by young farmer