
इंदापूर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तालुक्यातील वरकुटे बुद्रुक परिसरातील शेताला लागलेल्या आगीत तब्बल 32 एकर ऊस जळून खाक झाला आहे. यामध्ये शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे.

उसाच्या शेताला आग लागल्याची घटना वरकुटे बुद्रुक परिसरामध्ये घडली आहे. या आगीमध्ये तब्बल 32 एकर ऊस जळून खाक झाला. ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती समोर आलेली नाही.

आग लागल्याचे कळताच स्थानिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. स्थानिकांच्या मदतीने आठ ते दहा एकर ऊस वाचवण्यात यश आले आहे.


दरम्यान आग नेमकी कोणत्या कारणाने लागली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आग लागून झालेल्या नुकसानाचा पंचनामा करण्यात आला आहे.