Goat Bank: महाराष्ट्रातील अनोखी बँक; ग्रामीण महिलांना कर्जावर दिल्या जातात शेळ्या; तर व्याज म्हणून द्यावी लागते ही गोष्ट, तुमचाही विश्वास नाही बसणार

Maharashtra Goat Bank: महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील महिलांना कर्जावर शेळी देण्यात येते. ही अनोखी कल्पना ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसेल. पण यातून काही स्टार्टअप्स आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळाली आहे. काय आहे ही बँक? कशी करते ती काम?

Goat Bank: महाराष्ट्रातील अनोखी बँक; ग्रामीण महिलांना कर्जावर दिल्या जातात शेळ्या; तर व्याज म्हणून द्यावी लागते ही गोष्ट, तुमचाही विश्वास नाही बसणार
महाराष्ट्र बकरी बँक
Image Credit source: गुगल
| Updated on: Jan 15, 2026 | 3:20 PM

Seva Sahayog Foundation Jalgaon: आर्थिक बँकाविषयी, पतसंस्थांविषयी तुम्हाला माहिती आहेच. पण तुम्ही शेळी, बकरी बँकेविषयी ऐकले आहे का? राज्यातील काही भागात या बँकेचे प्रयोग सुरू आहे. या बँकेत कर्जावर शेळी देण्यात येते. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात हा प्रयोग सुरू आहे. या बँकेत पैशांची देवाण-घेवाण होत नाही तर शेळ्यांची आणि करडू देवाण-घेवाण करण्यात येते. या अनोखी बँकेची राज्यातच नाही तर देशातही मोठी चर्चा सुरू आहे. काय आहे ही बँक आणि कशी करते ती काम?

कर्जावर मिळते बकरी

राज्यातील जळगाव जिल्ह्यात कर्जावर बकरी देणारी बँक आहे. चाळीसगाव तालुक्यात ही बँक कार्यरत आहे. ही अनोखी बँक ग्रामीण भागातील हजारो महिलांना मोठी आर्थिक मदत करत आहे. ते पण कोणाताही पैसा न घेता. Goat Bank म्हणून ही बँक ओळखली जाते. या बँकेत कर्जावर शेळी उपलब्ध करून देण्यात येते. या बँकेत रोखीत व्यवहार होत नाही. तर बकऱ्यांचीच देवाण-घेवाण करण्यात येते. म्हणजे या बँकेतून ग्रामीण भागातील महिलांनी जर शेळी नेली तर त्या बदल्यात शेळीचे पिल्लू, करडू द्यावे लागते.

कोण चालवते ही बँक?

ही बकरी बँक, शेळी बँक पुण्यातील सेवा सहयोग फाऊंडेशन चालवते. गरीब, विधवा, परितक्त्या, एकट्या, जमीन नसलेल्या महिलांना ही बँक मदत करते. ज्या महिलांना सहज कर्ज उपलब्ध होत नाही. त्यांना ही बँक कर्जावर शेळी उपलब्ध करून देते. या स्वयंचळवळीने राज्यातील 300 हून अधिक महिला आत्मनिर्भर झाल्याचा दावा करण्यात येत आहे.

महिलांना देण्यात येते प्रशिक्षण

बकरी बँकेकडून महिलांना केवळ बकरी, शेळीचेच वाटप होते असे नाही. तर त्यांना पशुपालन आणि बकरी पालनाचे प्रशिक्षण देण्यात येते. प्रशिक्षणानंतर प्रत्येक प्रशिक्षणार्थीला एक गर्भधारणा केलेली बकरी देण्यात येते. पण या बँकेची एक अट आहे. त्यानुसार, शेळी दिल्यानंतर सहा ते नऊ महिन्यानंतर जेव्हा बकरी करडू जन्माला घालते. तेव्हा हे करडू या बँकेला ठेव म्हणून परत द्यावे लागते.

सेवा सहयोग फाऊंडेशनुसार एक बकरी साधारणपणे एका वर्षात तीन ते चार पिल्लं जन्माला घालते. एक पिल्लू बँकेला परत केल्यावर महिला इतर पिल्लांना विकू शकते. वा त्याचे पालनपोषण करून दूध विक्री करू शकते. या प्रक्रियेत महिलांना वार्षिक 30,000 रुपयांपर्यंत कमाई होते. ग्रामीण भागात रोजगाराचं हे एक चांगलं माध्यम असल्याचे दिसून येते. महिला सशक्तीकरणाचे हे मॉडेल सध्या देशभरात चर्चेत आहेत.