फळ पिक विमा योजना अन् शेतकऱ्यांना कसा मिळतो परतावा

| Updated on: Oct 25, 2021 | 10:51 AM

पिकांना हवामान धोक्यांपासुन विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्या दृष्टीने मदत होईल या करता फळ पिक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. (Climate change reduces production) हवामानातील बदलामुळे उत्पादनात घट होऊन शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन हे मिळत नाही. फळपिक नुकसान भरपाई मिळण्यासाठी एक उपाय म्हणून पुनर्रचित हवामान आधारीत पीक विमा योजना राबवली जात आहे.

फळ पिक विमा योजना अन् शेतकऱ्यांना कसा मिळतो परतावा
संग्रहीत छायचित्र
Follow us on

मुंबई : पारंपारिक शेती पध्दतीपेक्षा फळबागांचे महत्व अधिक वाढत आहे. (fruit crop insurance scheme) हवामान आणि भौगोलिक परस्थितीनुसार फळांची लागवड केली जाते. (Weather based fruit) जेवढे अधिकचे उत्पन्न यामधून आहे. तेवढ्याच प्रमाणात तोटाही आहे. त्यामुळेच पिकांना हवामान धोक्यांपासुन विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्या दृष्टीने मदत होईल या करता फळ पिक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. (Climate change reduces production) हवामानातील बदलामुळे उत्पादनात घट होऊन शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन हे मिळत नाही. फळपिक नुकसान भरपाई मिळण्यासाठी एक उपाय म्हणून पुनर्रचित हवामान आधारीत पीक विमा योजना राबवली जात आहे.

फळपिक विमा योजनेत या फळांचा समावेश

पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा योजना मृग बहारामध्ये संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिकू, पेरु, लिंबू, सिताफळ व द्राक्ष (क) या 8 फळपिकांसाठी 26 जिल्ह्यामध्ये तसेच आंबिया बहारामध्ये संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष, प्रायोगिक तत्वावर स्ट्रॉबेरी व पपई या 9 फळपिकांसाठी 30 जिल्ह्यामध्ये महसूल मंडळ हा घटक धरुन राबविण्याचे ठरविण्यात आले आहे.

काय आहे शासन निर्णय ?

प्रधानमंत्री फसल विमा योजनेतंर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना सन 2021 ते 2024 या तीन वर्षासाठी मृग बहारामध्ये संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिकू, पेरु, लिंबू, सिताफळ व द्राक्ष (क) या ८ फळपिकांसाठी व आंबिया बहारामध्ये संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष (अ व ब), प्रायोगिक तत्वावर स्ट्रॉबेरी व पपई या 9 फळपिकांसाठी लागू करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे. फळबाग लागवड केलेल्या जिल्ह्यात निर्धारीत केलेल्या हवामानुसार हा विमा लागू केला जातो.

शेतकऱ्यांना काय लाभ मिळणार

1. नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे फळ पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना संरक्षण देणे.
2. पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे,
3. शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारीत मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे.
4. कृषि क्षेत्रासाठीच्या पत पुरवठ्यात सातत्य राखणे, जेणेकरून उत्पादनातील जोखमींपासून शेतकऱ्यांच्या संरक्षणाबरोबरच अन्नसुरक्षा, पिकांचे विविधीकरण आणि कृषि क्षेत्राचा गतिमान विकास व स्पर्धात्मकतेत वाढ हे हेतु साध्य करणे.

योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये :

ही योजना सन 2020-25 पासून पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील पिकांसाठी ऐच्छिक आहे.
अधिसूचित क्षेत्रातील फळपिकांसाठी खातेदारांचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास घेऊ शकतात.
यामध्ये केंद्र शासनाचा विमा हप्ता 30 टक्के दरापर्यंत मर्यादित केला आहे. त्यामुळे 30 टक्के वरील विमा हप्ता राज्य शासन व शेतकरी यांनी कंपनीला अदा करणे बंधनकारक राहणार आहे.

विमा संरक्षित रक्कम व शेतकऱ्यांनी भरावयाचा पीक विमा हप्ता:

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेतंर्गत राज्यात सन 2020-21 साठीचे पीक निहाय कर्ज दर हे विमा संरक्षित रक्कम म्हणून ग्राह्य धरण्याचे निश्चित करण्यात आले असून सदर दर सन 2021-22 ते 2023-24 या कालावधीसाठी पीक विमा संरक्षित रक्कम म्हणून कायम राहतील.

विमा क्षेत्र घटक:

अधिसुचित फळपिकांखाली एकूण 20 हेक्टर व त्यापेक्षा जास्त क्षेत्र असणाऱ्या महसूल मंडळात योजना राबविण्यात येत आहे. त्यानुसार महसूल मंडळे ठरविण्यात आली आहे. स्थानिक पातळीवरुन तसा अहवाल गेल्यानंतर कोणत्या मंडळाचा या योजनेसाठी सहभाग करुन घ्यावयाचा हे ठरवले जाते.

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अदा करण्याची कार्यपद्धती

1 विमा कंपनीला शेतकरी आणि राज्य सरकारकडून हप्त्यापोटी रक्कम अदा करण्यात आलेली असते. यामधील एक जरी हप्ता कंपनीकडे जमा झाला असला तरी विम्याची रक्कम देणे बंधनकारक राहणार आहे. अंतिम हप्त्याची वाट न पाहता ही रक्कम कंपनीला अदा करावी लागणार आहे.

2 योजनेमध्ये भाग घेतलेल्या शेतकऱ्याची नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात विमा कंपनी मार्फत जमा केली जाईल. सदर नुकसान भरपाईची माहिती विमा कंपनीमार्फत बँकांना दिली जाईल.

3 विमा कंपनीने नुकसान भरपाई बाबतची माहिती संकेतस्थळावर प्रसिध्द करणे आवश्यक राहील.

4 विमा योजनेत सहभागी शेतकरी व इतर भागधारकांच्या तक्रारीचे निवारण विमा कंपनीने विनाविलंब करणे आवश्यक राहील.

5 काही कारणास्तव आक्षेपातील विमा नुकसान भरपाईचे दाव्यांच्या बाबतीत नुकसान भरपाई अदा केल्यापासून 1 महिन्यांपेक्षा अधिक कालावधी नंतर सदर प्रकरणे राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समिती कडे पाठवून निकाली काढली जातात. (How do farmers get a refund of fruit crop insurance scheme? What is the process)

संबंधित बातमी :

काय आहे ‘कृषी कर्ज मित्र’ योजना ? शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होणर कर्ज

कृषी यांत्रिकरणाचा लाभ घ्यायचा आहे ? मग असा करा अर्ज अन् मिळवा योजनेचा लाभ

पाऊस, अतिवृष्टी नंतर आता बुरशीचा प्रादुर्भाव, फळबागांच्या उत्पादनात निम्म्याने घट