Onion : दरामुळे नाही तर ‘या’ कारणामुळे लाल कांद्याचा झाला वांदा, हंगामाची सुरवात अन् शेवटही अडचणीचाच

| Updated on: Jan 13, 2022 | 12:25 PM

कांद्याचा वांदा म्हणलं की आपल्या समोर कारण येते ते दराचे आणि ते साहजिकही आहे. कारण रात्रीतून कांद्याचे दर कोसळलेले आणि विक्रमी गाठलेली असे अनेक वेळा झाले आहे. पण यावेळी सरासरी दर मिळत असतानाही वांदा झालेला आहे आणि त्याचे कारण आहे सध्या राज्यात सुरु असलेला अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरण.

Onion : दरामुळे नाही तर या कारणामुळे लाल कांद्याचा झाला वांदा, हंगामाची सुरवात अन् शेवटही अडचणीचाच
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

नाशिक : कांद्याचा वांदा म्हणलं की आपल्या समोर कारण येते ते दराचे आणि ते साहजिकही आहे. कारण रात्रीतून कांद्याचे दर कोसळलेले आणि विक्रमी गाठलेली असे अनेक वेळा झाले आहे. पण यावेळी सरासरी दर मिळत असतानाही वांदा झालेला आहे आणि त्याचे कारण आहे सध्या राज्यात सुरु असलेला (Untimely Rain) अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरण. सध्या (Kharif Season) खरीप हंगामातील कांद्याच्या काडणीचे काम जोमात सुरु आहे. शिवाय लाल कांद्याचे मार्केटही टिकून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रात्रीचा दिवस करुन कांद्याची काढणी, छाटणी आदी कामे उरकली मात्र, अचानक होत असलेल्या पावसामुळे पसरणीवर असलेल्या (Damage to onion) कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे कांदा भिजल्याने नासण्याचे प्रमाण वाढले आहे. जिल्हा तसेच राज्यभरात अनेक ठिकाणी हीच परस्थिती ओढावलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पुन्हा अवकाळी पावसाने हिसकावल्याचे चित्र आहे.

आतापर्यंत कांदा पिकाचे असे झाले नुकासान

यंदा केवळ मुख्य पिकावरच वातावरणातील बदलाचा परिणाम झाला नाही तर हंगामी पिकेही शिकार बनलेली आहेत. खरीप हंगामात कांद्याची लागवड होताच वातावरणामुळे बुरशीचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना बुरशीनाशक फवारुन कांद्याची जोपासना करावी लागली होती. पुन्हा पीक जोमात असतानाच डिसेंबर महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने कांद्याचे नुकसान झाले होते. लागवडीपासून काढणीपर्यंत हे पीक धोक्यातच होते. आता कुठे काढणी आणि छाटणी करुन कांदा बाजारपेठत जात होता. मात्र, अंतिम टप्प्यातही संकटाने शेतकऱ्यांची पाठ सोडलेली नाही. बाजारात 2 हजार रुपये सरासरी दर असल्यामुळे शेतकऱ्यांनी रात्रीचा दिवस करुन काढणी आणि छाटणी केली मात्र, शेतातच पसरणीला ठेवलेला कांदा पावसाने भिजला त्यामुळे उत्पादनात तर घट होणारच आहे.

अवकाळीचा मारा अन् शेतकऱ्यांची धावपळ

सध्या बाजारपेठेत केवळ लाल कांद्याचीच आवक सुरु आहे. नाशिकसह सोलापूर बाजार पेठेतही हेच चित्र आहे. मात्र, शेतकऱ्यांची काढणी आणि छाटणीची कामे सुरुच असताना अवकाळी पावसाचाही धोका कायमच होता. मराठवाड्यातील उस्मानाबाद, परंडा या भागात छाटणी करुन शेतामध्येच पसरण केली असताना अचानक झालेल्या पावसामुळे कांद्याचे नुकसान झाले आहे. त्याचा परिणाम आता दरावर होणार असल्याचे शेतकरी संदीप मगर, बाबुराव शेटे यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या

Farmer: अवकाळीमुळे सर्वकाही व्यर्थ मात्र, चंद्रपुरात कृषी विभागाचा चक्रावून टाकणारा दावा

Farmer Advice: वाढलेली हुडहुडी अन् घटलेल्या तापमानाचा रब्बी पिकांवर परिणाम, कृषी विज्ञान केंद्राचा काय आहे सल्ला?

Cotton Rate : कापसाचे उत्पादन घटले मात्र, विक्रमी दरामुळे भरपाई, काय आहे विदर्भातले चित्र?