Cotton Rate : कापसाचे उत्पादन घटले मात्र, विक्रमी दरामुळे भरपाई, काय आहे विदर्भातले चित्र?

यंदा वातावरणातील बदलामुळे आणि अंतिम टप्प्यात बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एकरी उत्पादकता ही निम्म्यावरच आली असताना शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली होती. पण आता वाढती मागणी अनि पुरवठा कमी याचा परिणाम थेट दरावर झाला आहे. गेल्या 50 वर्षांमध्ये कापसाच्या दराबाबत झाले नाही ते यंदा घडलं आहे.

Cotton Rate : कापसाचे उत्पादन घटले मात्र, विक्रमी दरामुळे भरपाई, काय आहे विदर्भातले चित्र?
संग्रहीत छायाचित्र

नागपूर : (Kharif Season) खरीप हंगामातील (Cotton Crop) कापूस हे विदर्भातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठे नगदी पीक आहे. यंदा वातावरणातील बदलामुळे आणि अंतिम टप्प्यात बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरासरीच्या तुलनेत उत्पादकता ही निम्म्यावरच आली असताना (Farmer) शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली होती. पण आता वाढती मागणी आणि पुरवठा कमी याचा परिणाम थेट दरावर झाला आहे. गेल्या 50 वर्षांमध्ये कापसाच्या दराबाबत झाले नाही ते यंदा घडलं आहे. कापसाला प्रति क्विंटल 10 हजाराचा दर मिळत आहे. यापूर्वी विदर्भात 7 हजारापर्यंत दर मिळाला होता. पण यंदा सर्व विक्रम मोडत दराच्या बाबतीत कापूस खरीप हंगामातील पिकांमध्ये आघाडीवर आहे. उत्पादनात जरी घट झाली असली तरी त्याची कसर ही आता दराने भरुन काढली आहे. सध्या कापसाची वेचणी अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे बाजारपेठेचा अंदाज घेऊन आता कापूस विक्रीचा निर्णय शेतकरी घेत आहे.

दराने साथ दिली मात्र, पिकाने नाही

वातावरणातील बदलाचा परिणाम खरीप हंगामातील सर्वच पिकांवर झाला आहे. कापूस अंतिम टप्प्यात असताना झालेल्या अवकाळी पावसामुले बोंडाचे नुकसान झाले तर ढगाळ वातावरणामुळे बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळे ज्या क्षेत्रावर 20 क्विंटलचे उत्पन्न शेतकऱ्यांना अपेक्षित होते त्या ठिकाणी 4 क्विंटलच कापूस शेतकऱ्यांच्या पदरी पडलेला आहे. मात्र, घटलेल्या उत्पादनाचा परिणाम थेट आता दरावर झालेला आहे. गेल्या महिन्याभरात कापसाचे दर हे 3 हजाराने वाढले आहेत. शिवाय अजून वाढतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पिकामध्ये घट झाली तरी दराने चांगली साथ दिल्यानेच शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे.

गेल्या 50 वर्षातला विक्रमी दर

खरीप हंगामातील कापूस हेच विदर्भातील शेतकऱ्यांचे मुख्य पिक आहे. मात्र, यापूर्वी उत्पादनातील घट आणि दरामध्ये झालेली पडझड यामुळे शेतकरी या मुख्य पिकापासून दुरावलेला होता. आता पुन्हा सरासरी क्षेत्रावर कापूस लागवड करण्यात आली आहे. मात्र, उत्पादनात घट झाल्याने या मुख्य पिकाचे काय होणार याची चिंता शेतकऱ्यांना होती. पण विक्रमी दरामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. गेल्या 50 वर्षात यंदा सर्वाधिक दर मिळालेला आहे. प्रति क्विंटल 10 हजार रुपयांनी कापसाची विक्री होत आहे. शिवाय भविष्यात अणखीन वाढ होईल असा अंदाज व्यक्त होत आहे. कापूस दरवाढीमध्ये शेतकऱ्यांचीही महत्वाची भूमिका राहिलेली आहे. दर कमी असताना कापसाची साठवणूक आणि दरात वाढ झाली की टप्प्याटप्प्याने विक्री ही पध्दत शेतकऱ्यांनी अवलंबल्याने आज दरवाढीचे चित्र पाहवयास मिळत आहे.

गतवर्षीपेक्षा दुपटीने वाढले दर

निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामातील सर्वच पिकांबाबत शंका उपस्थित केली जात होती. सोयाबीन, कापूस आणि आता नव्याने बाजारात आवक होत असलेली तूर. यामधून पदरी केवळ निराशाच पडणार असेच चित्र निर्माण झाले होते. कारण प्रत्येक पिकाचे काढणी दरम्यान नुकसानच झाले होते. त्यामुळे उत्पादनात निम्म्याने घट ही ठरलेलीच. घटलेल्या उत्पादनामुळे आता सर्वच पिकांच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे सोयाबीन, कापूस आणि तूरीच्या दरात आता वाढ होतानाचे चित्र आहे.

संबंधित बातम्या :

Start Up : शेतकऱ्याच्या मुलाने लावला स्वयंचलित फवारणी यंत्राचा शोध, 15 राज्यांमध्ये विस्तार अन् लाखोंची कमाई

E-Shram Card : असंघटीत कामगारांसाठीची योजना, नोंदणी आणि काय मिळणार लाभ, वाचा सविस्तर

Kharif Season: उत्पादनात घट मात्र, वाढत्या दराने खरिपातील तीन पिकांचा मिळतोय शेतकऱ्यांना ‘आधार’

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI