इफकोकडून शेतकऱ्यांना खरिप हंगामापूर्वी गिफ्ट, नॅनो युरिया लाँच, पैसेही वाचणार

| Updated on: May 31, 2021 | 5:03 PM

इफकोनं शेतकऱ्यांसाठी नॅनो यूरिया लाँच केला आहे. Iffco launch nano liquid urea

इफकोकडून शेतकऱ्यांना खरिप हंगामापूर्वी गिफ्ट, नॅनो युरिया लाँच, पैसेही वाचणार
नॅनो यूरीया
Follow us on

नवी दिल्ली: इंडियन फार्मर फर्टिलायजर्स कोऑपरेटिव्ह लिमिटेड म्हणजेच इफकोनं शेतकऱ्यांसाठी नॅनो यूरिया लाँच केला आहे. इफकोच्या 50 व्या वार्षिक बैठकीत याचं लाँचिंग करण्यात आले. सामान्य यूरियाची मागणी 50 टक्केहून कमी करण्यासाठी नॅनो यूरियाचे लाँचिगं करण्यात आलं आहे. नॅनो यूरिया शेतकऱ्यांना लिक्विड स्वरुपात उपलब्ध होईल. नॅनो यूरियाच्या 500 मिलीमध्ये 40 हजार पीपीएम नायट्रोजन असतो. त्यामुळे यूरीयाच्या 50 किलोच्या बॅग इतकी पोषणतत्वे यामाध्यमातून मिळतील.(Iffco launch nano liquid urea it helpful and save money of farmer)

नॅनो यूरियाची किंमत काय? नॅनो यूरिया हा स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे तयार करण्यात आला आहे. कलोल येथील नॅनो जैवतंत्रज्ञान संशोधन संस्थेमध्ये याची निर्मिती करण्यात आली आहे. नॅनो यूरिया शेतकऱ्यांना मंगळवार पासून उपलब्ध होईल. नॅनो यूरियाची 500 मिली बॉटल 240 रुपयांना उपलब्ध होणार आहे. सामान्य यूरियाच्या दहा टक्के किमतीला शेतकऱ्यांना नॅनो यूरिया उपलब्ध होईल. नॅनो यूरियाच्या वापरासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांना किफायतशीर पर्याय उपलब्ध

अलीकडच्या काळात रासायनिक खतांच्या किमती वाढत आहेत. या काळात नॅनो यूरिया हा शेतकऱ्यांसाठी सामान्य यूरियाला चांगला पर्याय ठरणार आहे. बॉटलमध्ये द्रवरुपात नॅनो यूरिया उपलब्ध झाल्यानं वाहतुकीचा खर्च देखील कमी होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी देखील नॅनो यूरियाचा वापर फायेदशीर ठरेल.

94 पिकांवर चाचणी

राष्ट्रीय कृषी संशोधन प्रणालीच्या अंतर्गत 20 आयसीएआर, देशातील कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रांमध्ये 43 पिकांवर चाचणी करण्यात आली. यानंतर संपूर्ण भारतातील पिकांवरील परिणामकारकता तपासण्यासाठी 94 पिंकावर चाचणी करण्यात आली. नॅनो यूरियाच्या वापरामुळे पिकांच्या 8 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.

नॅनो यूरियाचा फायदा काय?

नॅनो यूरियाची निर्मिती आत्मनिर्भर भारत, आत्मनिर्भर शेती या अंतर्गत करण्यात आली आहे. इफको नॅनो यूरिया पिकांवर प्रभावी ठरला आहे. नॅनो यूरिया जमिनीतील पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी देखील फायदा होणार आहे. ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी नॅनो यूरियाचा प्रभावी ठरणार आहे. शेतकऱ्यांनी नॅनो यूरियाचा वापर केल्यास मातीची गुणवत्ता सुधारण्यास देखील मदत होणार आहे. नॅनो यूरियामुळे पिकांची गुणवत्ता वाढवण्यासा देखील मदत होणार आहे.

संबंधित बातम्या:

कृष्णा साखर कारखाना निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी उमदेवारांची लगबग, सत्ताधारी पॅनेल विरोधात विरोधकांची एकजूट?

केरळमध्ये मान्सून दाखल झाला हे कसं ठरवलं जात? हवामान विभागाचे नेमके निकष काय?

(Iffco launch nano liquid urea it helpful and save money of farmer)