Wardha : खत-बियाणे विक्रीमध्ये अनियमितता, सावधान..! कृषी सेवा केंद्रावर 9 भरारी पथकांची नजर

| Updated on: May 31, 2022 | 8:40 AM

शेतकरी पेरणीपूर्वी खत - बियाणांची खरेदी करीत नाहीत ऐन वेळी कृषी सेवा केंद्रात जातात. शिवाय कोणतेही बियाणे पाहणी न करता सेवा चालक देतील ते बियाणे आणि देतील तीच पावती घेऊन ते परतीची वाट धरतात. मात्र, शेतकऱ्यांची येथेच मोठी चूक होती. शेतकऱ्यांनी फसवणूक टाळण्यासाठी रीतसर आणि पक्की पावती घेणे गरजेचे आहे.

Wardha : खत-बियाणे विक्रीमध्ये अनियमितता, सावधान..! कृषी सेवा केंद्रावर 9 भरारी पथकांची नजर
भरारी पथकातील अधिकारी
Follow us on

वर्धा : यंदा (Agricultural Department) कृषी विभागाने कारवाईचा श्रीगणेशा वर्धा जिल्ह्यातून सुरु केला आहे. अगोदर नियमांचे उल्लंघन करुन कापशी बियाणांची विक्री आणि दोन दिवसांपूर्वी (Seed Company) बियाणे कंपनीने कागदपत्रांची न केलेली पूर्तता यामुळे कारवाई करण्यात आली आहे. (Kharif Season) खरीप हंगाम सुरु होण्यापूर्वीच जिल्ह्यात खत-बियाणांबाबत अनियमितता होत असल्याने कृषी विभागाने 9 भरारी पथकांची नेमणूक केली आहे. त्यामुळे भविष्यात अनियमितता होणार नाही याची काळजी कृषी विभागाकडून घेतली जाणार आहे. हंगाम सुरु होण्यापूर्वीच खताचा तुटवडा भासेल असे चित्र निर्माण केले जात आहे. त्यामुळे ऐन वेळी खताच्या किंवा बियाणांच्या किंमती वाढविल्या जाणार असल्याची शंका उपस्थित झाल्याने भरारी पथक तैनात करण्यात आले आहेत.

खत, बियाणे खरेदी करताय? ही घ्या काळजी

शेतकरी पेरणीपूर्वी खत – बियाणांची खरेदी करीत नाहीत ऐन वेळी कृषी सेवा केंद्रात जातात. शिवाय कोणतेही बियाणे पाहणी न करता सेवा चालक देतील ते बियाणे आणि देतील तीच पावती घेऊन ते परतीची वाट धरतात. मात्र, शेतकऱ्यांची येथेच मोठी चूक होती. शेतकऱ्यांनी फसवणूक टाळण्यासाठी रीतसर आणि पक्की पावती घेणे गरजेचे आहे. शिवाय कृषी सेवा केंद्राची नोंदणी क्रमांक असलेलीच पावती, बियाणे किंवा खते यांचे पॅकिंगवर दिले तेवढेच वजन आहे का नाही याची तपासणी, साधे बील न घेता छापील पावतीच घेणे गरजेचे आहे. जे शेतकरी उधारीवर खत घेतात त्यांनाच सेवा चालक हे साधे बील देतात.

भरारी पथके स्थानिक पातळीवर

यंदाच्या खरिपात खत आणि बियाणे विक्रीमध्ये अनियमितता होणार नाही याची सर्वतोपरी काळजी कृषी विभागाकडून घेतली जात आहे. तालुकानिहाय एक आणि जिल्हास्तरावर एक अशी 9 भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली असून अनियमितता आढळ्यास कारवाई अटळ आहे. यापूर्वी दोन ठिकाणी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करुन बियाणे विक्रीस बंदी घातली आहे. शिवाय केवळ तालुका ठिकाणीच नाही तर गाव स्तरावर असलेल्या कृषी केंद्रावरही भरारी पथकांची करडी नजर असणार आहे.

हे सुद्धा वाचा

https://www.youtube.com/watch?v=tFrs_egf7IU

अनियमितता आढळल्यास तक्रार करा

खरीप हंगामात पावतीविना बियाणे-खते विकली जातात यामधून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ शकते. लहान-मोठ्या सेवा केंद्रात असे प्रकार घडतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी खत-बियाणे खरेदी करतानाच त्याची तारिख, पक्की पावती अशा बाबी तापसून खरेदी करणे गरजेचे आहे. याबाबत अनियमितता आढळून आल्यास शेतकऱ्यांनी थेट कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक यांनी केले आहे. हंगाम सुरु होण्यापूर्वीच जिल्ह्यात दोन ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होईना अशा प्रकरावर अंकूश बसेल असा विश्वास आहे.