जळगावात अजूनही दमदार पावसाची प्रतिक्षा, खरीप हंगामातील पेरणी रखडली

| Updated on: Jun 27, 2021 | 10:07 AM

जून महिना संपायला अवघे 5 दिवस शिल्लक असतानाही पावसाचे आगमन झालेले नाही. त्यामुळे खरीप हंगामातील पेरणी रखडली आहे. (Jalgaon Farmer waiting for heavy rains Sowing of kharif season was delayed)

जळगावात अजूनही दमदार पावसाची प्रतिक्षा, खरीप हंगामातील पेरणी रखडली
शेतकरी
Follow us on

जळगाव : जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्रात मान्सूनने दमदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा कोसळायला सुरुवात केली आहे. मात्र असं असले तरी जळगाव जिल्ह्यात अद्याप मान्सूनच्या दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. जून महिना संपायला अवघे 5 दिवस शिल्लक असतानाही पावसाचे आगमन झालेले नाही. त्यामुळे खरीप हंगामातील पेरणी रखडली आहे. (Jalgaon Farmer waiting for heavy rains Sowing of kharif season was delayed)

दुबार पेरणी करावी लागण्याची शक्यता

आधीच कोरोनाचे संकट त्यात पावसाने दडी मारली आहे. यावर्षी संपूर्ण मृग नक्षत्र कोरडे गेल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. जून अखेरपर्यंत जिल्ह्यात फक्त 15 ते 17 टक्के पेरण्या झाल्या आहेत. त्यातही पूर्वहंगामी कापसाची लागवड अधिक आहे. जळगाव जिल्ह्यातील बहुसंख्य तालुक्यात दुबार पेरणी करावी लागणार आहे, अशी स्थिती आहे.

बळीराजाला दमदार पावसाची प्रतीक्षा

जळगाव जिल्ह्यात दरवर्षी साधारणपणे जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सून दाखल होतो. पण यावर्षी जून संपायला आला तरी पाऊस झालेला नाही. काही तालुक्यांमध्ये तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला होता. पण आतापर्यंत संपूर्ण जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. खरीपाच्या पेरणीसाठी बळीराजाला दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. पेरणीसाठी हवा तसा पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील पेरण्या खोळंबल्या आहेत.

अवघ्या 15 ते 17 टक्के पेरण्या

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत अवघ्या 15 ते 17 टक्के पेरण्या झाल्या आहेत. पाऊस लांबला तर परिस्थिती अजून गंभीर होण्याची भीती आहे. दरम्यान जिल्ह्यात पूर्वहंगामी कापसाची लागवड वगळली तर फक्त 5 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.

(Jalgaon Farmer waiting for heavy rains Sowing of kharif season was delayed)

संबंधित बातम्या : 

शेतकरी, त्याचं कुटुंब शेतात राबल्यानं कोरोना संकटात अन्न धान्य पुरलं, दादा भुसेंचं वक्तव्य, पुरेशा पावसानंतर पेरणीचं आवाहन

राज्यात आतापर्यंत 27 टक्के पेरण्या, हवामानाचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी पेरणी करावी, कृषीमंत्री दादाजी भुसेंचे आवाहन

आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न, राज्यभर कृषी संजीवनी मोहीम सुरु, दादाजी भुसेंची माहिती