खरिपातील तूर फुलोऱ्यात, काय आहे मराठवाडा कृषी विद्यापीठाचे आवाहन ?

| Updated on: Nov 11, 2021 | 5:35 PM

आता तूरीच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांनी पावले उचलणे गरजेचे झाले आहे. कारण तूरीवरील किडीचे नियोजन केले नाही तर तब्बल 70 टक्के उत्पादनात घट होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे मराठवाडा कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांना केलेल्य़ा आवाहनाचे पालन होणे गरजेचे आहे.

खरिपातील तूर फुलोऱ्यात, काय आहे मराठवाडा कृषी विद्यापीठाचे आवाहन ?
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

लातूर : खरिप हंगामातील कापसाच्या तोडणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. तर आता केवळ तूर हे उभे पिक आहे. मात्र, या पिकावरही आता किडीचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. खरिपातील सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर आता तूरीच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांनी पावले उचलणे गरजेचे झाले आहे. कारण तूरीवरील किडीचे नियोजन केले नाही तर तब्बल 70 टक्के उत्पादनात घट होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे मराठवाडा कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांना केलेल्य़ा आवाहनाचे पालन होणे गरजेचे आहे.

वातावरणातील बदलामुळे तूर पिकावर मारुका आणि शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. खरिपातील हे शेवटचे पिक असून यामधून शेतकऱ्यांना उत्पादनाची आशा आहे. मात्र, याकरिता किडीचे नियोजन हाच पर्याय असून शेतकऱ्यांनी त्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. कृषी विभागाने एक प्रणाली आखून दिली आहे. त्यानुसार जर उपाययोजना राबवण्यात आल्या तर उत्पादनात वाढ होणार आहे.

एकात्मिक कीड व्यवस्थापनेचा अवलंब करण

थेट रासायनिक किटकनाशकांची फवारणी न करता एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करणे आवश्यक आहे. यामध्ये किडीचे भक्षक असलेले क्रायसोपा, भक्षक कोळी, ढालकि़डा या मित्र कीटकांची संख्या नैसर्गिक वातावरणात चांगली असते. हे कीटक तूर पिकाला नुकसान करणाऱ्या किडीचे नैसर्गिकरित्या नियंत्रण करतात. त्यामुळे ही पध्दत कमी खर्चिक असून याचा लाभ घेणे आवश्यक आहे.

असे करा व्यवस्थापन, अन्यथा उत्पादनात घट

पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झालेली पाने गोळा करुन ती अळीसहीत नष्ट करावी लागणार आहेत. शिवाय तूरीतील तण वेळोवेळा काढावे लागणार आहे. तूरी पिक कळी लागण्याच्या अवस्थेत असताना एकरी 2 कामगंध सापळे पिकांच्या वर एक फूट उंचीवर लावावेत.
* शेतामध्ये पक्षी बसण्यासाठी पिकांच्या एक ते दोन फूट उंचीवर पक्षी थांबे हेक्टरी 50 ते 60 ठिकाणी उभा करावेत. त्यामुळे पक्षांना अळ्यांचे भक्षण करता येणार आहे.
* फुलकळी येऊ लागताच 5 टक्के निंबोळी अर्क किंवा अझाडिरॅक्टिन 300 पीपीएम 50 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
* दुसरी फवारणी ही शेंगा पोखरणारी अळी प्रथम अवस्थेत असताना सायंकाळी करावी.

संबंधित बातम्या :

मेहनतीचे फळ : देशात 1.25 लाख मेट्रीक टन मधाचे उत्पादन, 60 हजार मेट्रीक टनाची निर्यात

‘डीएपी’ खताचा तुटवडा, काय आहे कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला ?

सोयाबीनला माफक दर तरीही साठवणूकीवरच ‘भर’, शेतकऱ्यांचा दराबाबत आशा उंचावल्या