Farmer Loan Waiver: 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना लॉटरी? पुण्यश्लोक अहिल्यादेवी कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार? मोठी अपडेट काय?

Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme: राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 लाखांपर्यंतचे पीक कर्ज माफ करण्याचे जाहीर केले. शेतकर्‍यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आली. त्याविषयी एक मोठी अपडेट समोर येत आहे

Farmer Loan Waiver: 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना लॉटरी? पुण्यश्लोक अहिल्यादेवी कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार? मोठी अपडेट काय?
पुण्यश्लोक अहिल्यादेवी कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार?
Image Credit source: गुगल
| Updated on: Mar 11, 2026 | 12:38 PM

Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme: राज्य सरकारने शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत पीक कर्ज माफीची घोषणा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात नुकतीच याविषयीचा निर्णय घेतला. शेतकर्‍यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आली. योजनेतंर्गत शेतकऱ्यांच्या जमिनीवरील कर्जाचा बोजा कमी करण्यात येणार आहे. त्यांच्या सातबारावरील थकबाकी कमी होईल. पीक कर्ज देणाऱ्या कोणत्याही बँकेतील दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ करण्यात येणार आहे. पण एक अपडेट समोर येत आहे. त्यानुसार, दोन लाखांच्यावर पीक कर्ज असणार्‍या शेतकर्‍यांनाही या योजनेचा लाभ मिळू शकतो. पण त्यासाठी एक अट पूर्ण करावी लागणार आहे.

दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकर्‍यांना फायदा?

ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज दोन लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही असे मानले जात होते. पण अशा शेतकर्‍यांनाही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचा फायदा मिळू शकतो अशी चर्चा होत आहे. त्यांनाही या योजनेची संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असणार्‍या शेतकर्‍यांना त्यासाठी एका अटीची पूर्तता करावी लागणार आहे. अशा शेतकर्‍यांना दोन लाखांपेक्षा अधिकची रक्कम स्वतः बँकेत जमा करावी लागेल. समजा एखाद्या शेतकऱ्यांकडे बँकेचे 3 लाखांचे पीक कर्ज असेल आणि त्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी वरील एक लाखांची रक्कम स्वतः बँकेत जमा करावी. त्यामुळे त्यांच्यावर दोन लाखांचा कर्ज बोजा असेल. योजनेनुसार त्यांना कर्जमाफी मिळेल. याविषयीची माहिती संबंधित बँकेत जाऊन शेतकर्‍यांनी घेतल्यास त्यांचा मोठा फायदा होऊ शकतो. त्यांच्यावरील कर्जाचा बोजा कमी होऊ शकतो.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना

शेतकरी कर्जमाफीची घोषणा गेल्या शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना केली. 30 सप्टेंबर 2025 रोजीपर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकर्‍यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळेल. त्यांचे कर्जमाफ होईल. तर नियमीत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचे जाहीर केले. त्याचा शेतकर्‍यांना मोठा फायदा होईल. दोन लाखांपर्यंत कुठलीही बँक असो, ज्यांना पीक कर्ज देण्याचा अधिकार आहे अशा कोणत्याही बँकेने दिलेले पीक कर्ज राज्य सरकार माफ करणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे.

बँकांना मोठा फायदा

सरकारच्या या निर्णयाचा केवळ शेतकऱ्यांनाच नाही तर सहकारी बँका आणि राष्ट्रीयकृत बँकांनाही तसेच पीक कर्ज देणाऱ्या पतसंस्थांना मोठा फायदा होईल. अनेक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. त्यांना पीक कर्ज माफीचा मोठा फायदा होईल. शेतकर्‍यांच्या खात्यावरील कर्ज माफ होणार आहे. थकीत कर्ज शासन भरणार असल्याने बँकांची वसुली होणार आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे.

Follow Us