महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा विक्रम, ऊसाच्या एफआरपीची 99 टक्के रक्कम जमा, शेतकऱ्यांना किती पैसे मिळाले?

| Updated on: Aug 12, 2021 | 7:35 AM

महाराष्ट्र साखर आयुक्त कार्यालयाच्या अहवालानुसार, साखर कारखान्यांकडे केवळ 1.28 टक्के म्हणजेच 391.90 कोटी एफआरपी थकबाकी आहे. गळीत हंगाम सुरू झालेल्या 190 कारखान्यांपैकी 141 साखर कारखान्यांनी 100% एफआरपी भरला आहे.

महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा विक्रम, ऊसाच्या एफआरपीची 99 टक्के रक्कम जमा, शेतकऱ्यांना किती पैसे मिळाले?
ऊस
Follow us on

नवी दिल्ली: महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी 31 जुलैपर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 30,418.01 कोटी रुपये एफआरपी (FRP) दिली आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत यावर्षीची एफआरपी 222 टक्के जास्त असून एकूण 16,689 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. जुलै 2020 मध्ये साखर कारखान्यांनी 13,728.94 कोटी रुपयांची एफआरपी दिली होती. ती रक्कम एकूण देय एफआरपीच्या 95 टक्के होती. साखर कारखान्यांनी यावर्षी 30,809.91 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहे. शेतकऱ्यांना द्यायच्या एकूण 99 टक्के रक्कम आहे.

एफआरपी म्हणजे काय?

साखर कारखाने ज्या किमतीला शेतकऱ्यांकडून ऊसाची खरेदी करतात त्या दराला एफआरपी म्हणतात. कमिशन ऑफ अ‌ॅग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइसेज दरवर्षी एफआरपीची शिफारस करतात. सीएसीपी कृषी उत्पादनांच्या किमतींसाठी सरकारकडे त्यांची शिफारस पाठवते. सरकार त्यावर विचार केल्यानंतर त्याची अंमलबजावणी करते.

391.90 कोटी थकबाकी

महाराष्ट्र साखर आयुक्त कार्यालयाच्या अहवालानुसार, साखर कारखान्यांकडे केवळ 1.28 टक्के म्हणजेच 391.90 कोटी एफआरपी थकबाकी आहे. गळीत हंगाम सुरू झालेल्या 190 कारखान्यांपैकी 141 साखर कारखान्यांनी 100% एफआरपी भरला आहे. त्याचबरोबर 49 साखर कारखान्यांनी एफआरपी थकवली आहे. साखर आयुक्तांनी थकबाकी वसूल करण्यासाठी 32 साखर कारखान्यांना आरआरसी नोटीस जारी केले आहे. तर, यापूर्वीच्या गाळप हंगामातील 321 कोटी रुपयांची एफआरपी साखर कारखान्यांकडं थकित आहे.

अमित शाह वसंतदादा शुगर इनन्स्टिट्यूटला भेट देणार ?

शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील साखर व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने सहकारमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन साखर उद्योगाच्या अडचणी दूर करण्याची विनंती केली होती. तर, येत्या काही दिवसांमध्ये अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असल्याचं समजल्यानंतर शरद पवार यांनी त्यांना पुणे येथील वसंतदादा शुगर इनस्टिट्यूटला भेट देण्याची विनंती केली होती.

शेतकऱ्यांचे ऊसाचे पैसे थकले

राज्यातील 2020-21 च्या ऊसाचा गळित हंगाम एप्रिल महिन्यात संपला. राज्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची देणी थकवल्याचं समोर आलंय. तर, काही कारखान्यांनी शेतकऱ्यांना ऊसाच्या बिलापोटी दिलेले चेक वटले नसल्याचं समोर आलंय. विविध जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची ऊसाची बिलं न दिल्यानंन शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. ऊसाचं बील न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून देण्यात आलाय.

शेतकऱ्यांचे पैसे पाच महिन्यांपासून थकवले

अंबड तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचा ऊस सोलापूर जिल्ह्यातील इंद्रेश्वर शुगर्स, लातूर जिल्ह्यातील श्री साईबाबा शुगर्स शिवणी व औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील सचिन घायाळ शुगर या साखर कारखान्यांनी गेल्या पाच महिन्यांपासून शेतकऱ्यांची कोटींची देणी थकविली आहेत. विशेष बाब म्हणजे श्री साईबाबा शुगर्स या कारखान्याने शेतकऱ्यांना जानेवारी महिन्यात दिलेले धनादेश खात्यावर रक्कम नसल्याने वटले नाहीत. या सर्वच कारखान्यांची जानेवारी ते एप्रिल 2021 पर्यंतची ही देणी थकीत आहेत. ऊसाचे बिल वेळेवर मिळत नसल्याचे ऊस उत्पादक शेतकरी सुभाष रोटे, नारायण आमटे यांनी संताप व्यक्त केला आहे.

इतर बातम्या:

PM Kisan : पीएम किसान योजनेचे 2000 रुपये खात्यात आले नाहीत, तर लगेच ‘या’ क्रमांकावर तक्रार करा

पीक विम्याच्या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समिती आक्रमक, बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा

Maharashtra Sugar mills paid 99 Percent FRP to farmers and Make Record 390 crore due