दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर ‘झेंडू’ला आले अच्छे दिन, कसे आहेत भाव?

अतिवृष्टीमुळे फुलांचे मोठे नुकसान झाले असून त्यामुळे झेंडूची आवक कमी आहेत, परिणामी झेंडूला असलेली मागणी बघता झेंडूच्या फुलांची कमतरता भासणार आहे.

दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर झेंडूला आले अच्छे दिन, कसे आहेत भाव?
Image Credit source: Marigold flowers fetch good prices
| Updated on: Oct 04, 2022 | 8:23 PM

नाशिक : दसऱ्याला झेंडूच्या (Marigold Flower) फुलांचे महत्व अधिक असतं. पूजे बरोबरच घराला तोरण हे झेंडूच्या फुलांचं असतं. वाहनांना देखील झेंडूच्या फुलांचे हार घालत असतात. त्याच पार्श्वभूमीवर झेंडू उत्पादक शेतकरी (Famer) हे दसऱ्याच्या (Dassehra) तोंडावर फुलं येतील असे नियोजन करत असतात. त्यातच तब्बल दोन वर्षानंतर कोरोनाचे (Corona) सावट दूर झाल्याने मोठ्या उत्साहात सण-उत्सव साजरे केले जात आहेत. त्यातच यंदाच्या वर्षी दोन वर्षाच्या खंडानंतर होणाऱ्या नवरात्र उत्सवात नागरिकांचा उत्साह द्विगुणित झालेला होता. याच काळात मात्र ठिकठिकाणी अतिवृष्टी देखील झाली आहे. त्यामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच दसऱ्याला लागणारे झेंडूची फुलं बाजारात भाव खाऊन जात आहेत. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला झेंडूचे भाव हे 90 रुपयांपर्यंत पोहचले आहे. साहजिकच दसऱ्याच्या दिवशी झेंडूची फुले ही किलोला शंभरी पार करतील असा अंदाज लावला जात आहेत.

झेंडूच्या फुलांना घाऊक बाजारामध्ये किलोला 80 रुपये ते 90 रुपये भाव मिळत असून आणखी भाववाढ होईल अशी स्थिती निर्माण झाली आहे.

दरम्यान घाऊक बाजारातील भाव बघता किरकोळ बाजारात झेंडूच्या फुलांचे दर 20 ते 30 टक्के वाढीव दराने खरेदी करावे लागणार आहे.

त्यातच वाहनांसाठी हार, घरांसाठी लागणारे तोरण यांची आणखी वेगवेगळे दर आहेत. त्यांच्याही भावात वाढ होण्याची शक्यता असल्याने झेंडूच्या फुलांना अच्छे दिन आले आहेत.

किरकोळ बाजारात ठिकठिकाणी भाव हे आत्ताच सव्वाशे ते दीडशे असून आणखी भाववाढ होणार असल्याने नवरात्रीत फूलबाजार तेजीत आहे.

अतिवृष्टीमुळे फुलांचे मोठे नुकसान झाले असून त्यामुळे झेंडूची आवक कमी आहेत, परिणामी झेंडूला असलेली मागणी बघता झेंडूच्या फुलांची कमतरता भासणार आहे.

नाशिक, मालेगाव येथील बाजार समितीत दरवर्षी पेक्षा यंदाच्या वर्षी मागणी ही 30 टक्के इतकी वाढल्याची माहिती आहे. त्यातच झेंडूच्या फुलांचे नुकसान बघता व्यापारी झेंडू उत्पादकांच्या शोधात आहे.