AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

US Tariff On India : टॅरिफ बद्दलचा अमेरिकेचा भारताबाबतचा निर्णय हा पाकिस्तान, बांग्लादेशसाठी झटका, नक्कीच त्यांना मिर्च्या झोंबतील, कारण…

US Tariff On India : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या टॅरिफ बद्दल एक चांगला निर्णय घेतला आहे. थेट 50 टक्क्यावरुन टॅरिफ 18 टक्क्यांवर आलाय. हा चीन, पाकिस्तान आणि बांग्लादेशसाठी मोठा धक्का आहे. ट्रम्प यांच्या निर्णयामागे असं काय आहे की हे देश नाराज होतील.

US Tariff On India : टॅरिफ बद्दलचा अमेरिकेचा भारताबाबतचा निर्णय हा पाकिस्तान, बांग्लादेशसाठी झटका, नक्कीच त्यांना मिर्च्या झोंबतील, कारण...
Modi-Trump
| Updated on: Feb 03, 2026 | 9:59 AM
Share

अमेरिकेसोबत दीर्घकाळापासून सुरु असलेल्या ट्रेड डीलशी संबंधित मोठी अपडेट आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: याबद्दल संकेत दिले आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत फोनवर चर्चा केली. त्यानंतर संपूर्ण ट्रेडच समीकरण बदललं. अमेरिकेने भारतावर 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ आणि 25 टक्के रेसिप्रोकल टॅरिफ लावला होता. म्हणजे एकूण टॅरिफ 50 टक्के होतो. आता त्याच अमेरिकेने पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत चर्चा करुन टॅरिफ 18 टक्क्यावर आणला आहे. हा टॅरिफ चीन, पाकिस्तान आणि बांग्लादेशच्या तुलनेत कमी आहे. ट्रम्प यांची टॅरिफ चाल समजून घेऊया तसच अन्य देशांवर लागणाऱ्या टॅरिफ बद्दलही जाणून घ्या.

अमेरिकेतून ट्रेड आणि टॅरिफ बद्दल आलेली ही बातमी मार्केटसाठी चांगली मानली जातेय. देशाच्या ऑटो सेक्टर पासून टेक्सटाइल क्षेत्रासाठी ही चांगली बातमी आहे. सोबतच पुढच्या काही दिवसात अमेरिकेसोबत ट्रेड वाढण्याची शक्यता आहे. या सगळ्याच इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की, अमेरिकेने जो टॅरिफ कमी केलाय, तो जगातील इमर्जिंग मार्केटमध्ये दुसऱ्या नंबरवर येतो. याचा अर्थ असा की, इमर्जिंग मार्केटमध्ये दक्षिण कोरियानंतर भारतावरच सर्वात कमी टॅरिफ लागलाय. ट्रेड आणि विकासासाठी हे शानदार संकेत आहे. भारतीय सामानावर आता अमेरिकेत चीन, बांग्लादेश आणि शेजारच्या पाकिस्तानपेक्षा पण कमी टॅरिफ लागेल. याचा फायदा येणाऱ्या दिवसात भारताला मिळेल.

पाकिस्तानवर किती टक्के टॅरिफ?

इमर्जिंग मार्केट्स बद्दल बोलायचं झाल्यास अमेरिकेने सर्वात कमी टॅरिफ दक्षिण कोरियावर लावला आहे. हा टॅरिफ फक्त 15 टक्के आहे. यानंतर भारताचा नंबर येतो, 18 टक्के टॅरिफ. त्यानंतर थायलंड, फिलीपींस, मलेशिया, इंडोनेशिया, मेक्सिको, दक्षिण आफ्रिका, चीन आणि ब्राझील हे देश येतात. पाकिस्तानवर अमेरिकेने अजूनही 19 टक्के टॅरिफ लावलाय. भारतापेक्षा हा टॅरिफ एक टक्क्याने जास्त आहे. भारतापेक्षा जास्त टॅरिफ बांग्लादेशवरही आहे.

ऑगस्ट महिन्यापासून भारतावर अमेरिकेने हा टॅरिफ लावलाय. भारतीय अर्थव्यवस्थेला धक्का देणं हा ट्रम्प यांचा यामागे उद्देश होता. पण त्याचा भारतावर फार परिणाम झाला नाही.

Follow Us
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....
ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि...
Raj Thackeray : Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि संविधान.....
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?