Agricultural : खत टंचाईवर रामबाण उपाय, नॅनो युरिया वापरा अन् कमी खर्चात उत्पादन वाढवा

| Updated on: May 07, 2022 | 6:13 AM

युरिया आणि नॅनो युरिया लिक्विड यामध्ये शेतकऱ्यांना हा लिक्विड युरियाच अधिकचा प्रभावी ठरणार आहे. केवळ उत्पादनासाठी नाही तर खर्चाच्या अनुशंगानेही हा युरिया चांगला ठरणार आहे. याचा कमी आकार आणि मोठी क्षमता असा हा नॅनो युरिया आहे. या युरिया रोपांच्या पोषणासाठी प्रभावी आणि परिणामकारक राहणार आहे. यामुळे उत्पादनात तर वाढ होईलच पण पोषण तत्वांच्या गुणवत्तेमध्येही वाढ होणार आहे.

Agricultural : खत टंचाईवर रामबाण उपाय, नॅनो युरिया वापरा अन् कमी खर्चात उत्पादन वाढवा
द्रवरुपी नॅनो युरिया
Follow us on

लातूर : यंदाच्या हंगामात बियाणांपेक्षा शेतकऱ्यांना (Fertilizer) खताची चिंता लागून राहिली आहे. त्याअनुशंगाने वेगवेगळे पर्याय उपलब्ध करुन दिले जात असले तरी शेतकऱ्यांमध्ये धास्ती कायम आहे. असे असले तरी (Agricultural Department) कृषी विभागाने आता द्रवरुपी नॅनो युरिया हाच यावरचा सर्वोत्तम पर्याय असल्याचे सांगितले आहे. कच्च्या मालाच्या तुटवड्यामुळे यंदा (DAP) डीएपी खताचा तुटवडा भासणार आहे. त्यामुळे हंगाम सुरु होण्यापुर्वीच कृषी विभागाकडून विविध पर्याय उपलब्ध करुन दिले जात आहेत. 500 मिली इफ्को नॅनो युरियाची बाटली ही 45 किलो युरिया खतापेक्षा अधिक कार्यक्षम आहे. शिवाय युरियाच्या गोणीपेक्षा याचे दरही 10 टक्क्यांनी कमी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होणार असून उत्पादनात वाढ होणार आहे.

युरियाची एक गोणी म्हणजेच अर्धा लिटल नॅनो युरिया लिक्विड

युरिया आणि नॅनो युरिया लिक्विड यामध्ये शेतकऱ्यांना हा लिक्विड युरियाच अधिकचा प्रभावी ठरणार आहे. केवळ उत्पादनासाठी नाही तर खर्चाच्या अनुशंगानेही हा युरिया चांगला ठरणार आहे. याचा कमी आकार आणि मोठी क्षमता असा हा नॅनो युरिया आहे. या युरिया रोपांच्या पोषणासाठी प्रभावी आणि परिणामकारक राहणार आहे. यामुळे उत्पादनात तर वाढ होईलच पण पोषण तत्वांच्या गुणवत्तेमध्येही वाढ होणार आहे. शिवाय खरीप हंगाम सुरु होण्यापूर्वी शेतकऱ्यांना याची माहिती व्हावी या दृष्टीने जनजागृती केली जात आहे.

कृषी विभागाकडून कार्यशाळेचे आयोजन

नॅनो युरिया लिक्विडमुळे जमिनीतील जलपातळीची गुणवत्ता सुधारते तर टिकाऊ उत्पादनावर सकारात्मक परिणाम करीत ग्लोबल वार्मिंग कमी करण्यास मदत होते. यामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होणार असून उत्पादनात वाढ होणार आहे. याच अनुशंगाने कृषी विभागाकडून जनजागृती केली जाणार आहे. खत टंचाईवर पर्याय म्हणून यंदा नॅनो युरिया शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरणार आहे. पारंपरिक युरिया 100 किलो वापरला तर 35 किलो पिकांना लागू होतो. द्रवरूप नॅनो युरिया खत अर्धा लिटर वापरले तर 90 टक्के पिकांना लागू होते.

हे सुद्धा वाचा

तक्रारीसाठी नियंत्रण कक्षाचीही स्थापना

निविष्ठांची विक्री ज्यादा दराने करणे, मुदतबाह्य निविष्ठांचीही विक्री करणे, शिवाय बियाणांची उगवण न होणे, यासारख्या तक्रारी ह्या ठरलेल्याच आहेत. त्यामुळे यंदा तक्रारीसाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष उभारला जाणार आहे. यामार्फत आलेल्या तक्रारींवर कारवाई करणे, खतांचा साठा होऊ न देता शेतकऱ्यांना त्याचा पुरवठा करणे आदी जबाबदारी ही या नियंत्रण कक्षाची राहणार आहे.त्यामुळे उत्पादनवाढीच्या अनुशंगाने नॅनो खत हे फायदेशीर ठरणार आहे.