AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA : तिसऱ्या वनडे सामन्यात पराभव कसा झाला? दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने सांगितलं कारण

दक्षिण अफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका भारताने 2-1 ने खिशात घातली. दुसरा वनडे सामना गमवल्याने भारतीय क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढली होती. पण भारताने हा सामना 9 गडी राखून सहज जिंकला.

IND vs SA : तिसऱ्या वनडे सामन्यात पराभव कसा झाला? दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने सांगितलं कारण
IND vs SA : तिसऱ्या वनडे सामन्यात पराभव कसा झाला? दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने सांगितलं कारणImage Credit source: PTI
| Updated on: Dec 06, 2025 | 9:31 PM
Share

दक्षिण अफ्रिकेने कसोटी मालिकेत भारताला धोबीपछाड दिल्यानंतर वनडेतही जेरीस आणलं होतं. पहिल्या वनडे सामन्यात भारताना 17 धावांनी विजय मिळवला. तर दुसऱ्या वनडे सामन्यात 358 धावा करूनही भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. त्यामुळे तिसऱ्या वनडे सामन्यात काय होतं? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून होतं. खरं तर भारताच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आणि भारताने अर्धा सामना तिथेच जिंकला. भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तसेच दक्षिण अफ्रिकेला 270 धावांवर गुंडाळलं. त्यानंतर हे आव्हान भारताने 1 गडी गमवून 39.5 षटकात पूर्ण केलं. यासह तीन सामन्यांची वनडे मालिका भारताने 2-1 ने जिंकली. या विजयानंतर नाणेफेकीचा कौल हा महत्त्वाचा ठरल्याचं कर्णधार केएल राहुलने सांगितलं. इतकंच 20 सामन्यानंतर भारताने नाणेफेक जिंकल्याने केएल राहुलने आनंदही व्यक्त केला. असं असताना दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा याने पराभवाचं कारण सांगितलं.

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा म्हणाला की, ‘आजचा सामना आम्हाला खूप रोमांचक करायचा होता. पण फलंदाजीच्या दृष्टिकोनातून, आमच्याकडे पुरेसे धावा नव्हत्या. प्रकाशात खेळणे सोपे होते. आम्ही विकेट पडत असताना आम्ही कदाचित हुशार असायला हवे होते. भारतीय संघाने त्यांची गुणवत्ता दाखवली. याबाबत त्यांचे कौतुक. जर तुम्ही पहिले दोन एकदिवसीय सामने पाहिले तर आम्ही ते केले. त्यामुळे या सामन्यात आम्ही खूप हुशार असू शकलो असतो. कदाचित आज परिस्थिती वेगळी होती. 50 षटकांच्या सामन्यात तुम्हाला कधीही सर्वबाद व्हायचे नसते. काही चांगल्या सुरुवातींपैकी क्विंटनने 100 धावा काढल्या आणि मीही तो केल्या पण त्यात तेवढं यश मिळालं नाही.’

‘आम्ही निश्चितच खूप काही शिकलो आहोत. आम्ही कसे खेळायचे याबद्दल बरेच काही बोलतो. भारताकडे दर्जेदार फिरकी गोलंदाज आहेत आणि त्यांना दबावाखाली आणणे कधीच सोपे नसते. मालिकेतील बऱ्याच भागांसाठी आम्ही ते केले. मला वाटते की जर 10 बॉक्स असतील तर आम्ही त्यापैकी 6 किंवा 7 बॉक्स जिंकले आहेत.’, असंही टेम्बा बावुमा पुढे म्हणाला.

भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.