Onion Rate : कांदा दराचा लहरीपणा आता शेतकऱ्यांच्या मुळावर, 15 दिवसांमध्येच बदलले चित्र

| Updated on: Mar 15, 2022 | 2:04 PM

गेली दोन महिने सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केवळ कांद्याचा बोलबाला होता. कधी नव्हे सलग दोन महिने कांद्याचे दर हे टिकून होते. विशेष म्हणजे विक्रमी आवक असतानाही दरामध्ये वाढ होती. वाढत्या आवकमुळे दोन महिन्यात तीन वेळा बाजार समितीमधील व्यवहार हे बंद ठेवण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली होती. मात्र लाल कांद्याची आवक संपताच आणि उन्हाळी कांद्याची आवक सुरु होतात चित्र बदलण्यास सुरवात झाली होती. 3 हजार 500 रुपये क्विंटलवर गेलेले दर आता थेट 1 हजार रुपयांवर येऊन ठेपले आहे.

Onion Rate : कांदा दराचा लहरीपणा आता शेतकऱ्यांच्या मुळावर, 15 दिवसांमध्येच बदलले चित्र
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती,
Follow us on

सोलापूर : गेली दोन महिने (Solapur Market) सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केवळ कांद्याचा बोलबाला होता. कधी नव्हे सलग दोन महिने कांद्याचे दर हे टिकून होते. विशेष म्हणजे विक्रमी आवक असतानाही दरामध्ये वाढ होती. वाढत्या आवकमुळे दोन महिन्यात तीन वेळा बाजार समितीमधील व्यवहार हे बंद ठेवण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली होती. मात्र (Red Onion) लाल कांद्याची आवक संपताच आणि (Summer Onion) उन्हाळी कांद्याची आवक सुरु होतात चित्र बदलण्यास सुरवात झाली होती. 3 हजार 500 रुपये क्विंटलवर गेलेले दर आता थेट 1 हजार रुपयांवर येऊन ठेपले आहे. घटलेली मागणी आणि वाढलेली आवक यामुळे ही परस्थिती ओढावल्याचे सांगण्यात येत आहे. यंदा उन्हाळी कांद्याची विक्रमी लागवड झालेली आहे. आता कुठे हंगाम सुरु झाला आहे. भविष्यात यापेक्षा कमी दर होतील असा अंदाज आहे. चांगल्या दर्जाच्या कांद्याला 1 हजार 600 पर्यंत दर असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.

काढणी, छाटणी की विक्री

सध्या रब्बी हंगामातील पिकांच्या काढणीला सुरवात करण्यापूर्वी किमान दर मिळावा या आशेने शेतकरी रात्रीचा दिवस करुन कांदा काढणी, छाटणी आणि लागलीच विक्री करीत आहे. किमान दर मिळावा यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे. रात्रीतून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 300 ते 400 ट्रकमधून कांद्याची आवक सुरु आहे. मध्यंतरी ढगाळ वातावरण आणि अवकाळीमुळे आवक घटली होती. मात्र, सध्या आवक वाढली असून किमान 15 रुपये किलोने कांद्याची विक्री व्हावी अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

कलिंगडची आवक वाढली दर स्थिर

कलिंगड हे हंगामी पीक आहे. रमजान ईद, वाढता उन्हाळा याचा कोनोसा घेऊन लागवड केली जाते. त्यामुळे सध्या आवक सुरु असली दुसरीकडे शेतशिवारात लागवड कायम आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कलिंगडला 1 हजार ते 2 हजार 500 असा क्विंटलला दर आहे. गतवर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कलिंगडातून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. यंदा मात्र, भरपाई काढण्याच्या उद्देशाने लागवड आणि जोपासणा केली जात आहे. किमान 6 ते 7 रुपये किलोप्रमाणे जरी दर मिळाला तरी यामधून चांगले उत्पन्न पदरी पडत असल्याचे शेतकरी भऊ गायकवाड यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

…म्हणे महिला शेतकरी सन्मान वर्ष, सन्मान सोडाच- शेतकरी महिलेच्या कष्टाचीही कदर नाही..!

‘जलयुक्त’चा घोटाळा : पहिल्या टप्प्यात निलंबन आता थेट अधिकाऱ्यांना अटक, परळीतच मुरलयं पाणी!

Photo Gallery : सरकार निर्णयाचे ‘असे’ हे स्वागत, जळगावात केळीच्या खोडाचे पूजन अन् जंगी मिरवणूक