ऊस गाळपासाठी ऑनलाईन अर्ज, मात्र, एफआरपी थकबाकीदारांच्या वाटेला कारवाईचा बडगा

| Updated on: Nov 12, 2021 | 2:01 PM

15 ऑक्टोंबरपासून राज्यात ऊसाचा गळीत हंगाम सुरु करण्यात आला आहे. मात्र, एफआरपी थकबाकी असलेल्या साखर कारखान्यांना अद्यापही परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र, नांदेड प्रादेशिक सहसंचालक कार्यालयांतर्गत चार जिल्ह्यातील 27 साखर कारखान्यांनी ऑनलाईन अर्ज केले होते. यामध्ये 18 खासगी तर 9 सहकारी साखर कारखान्यांचा समावेश आहे.

ऊस गाळपासाठी ऑनलाईन अर्ज, मात्र, एफआरपी थकबाकीदारांच्या वाटेला कारवाईचा बडगा
साखर कारखान्याचे संग्रहीत छायाचित्र
Follow us on

लातूर : 15 ऑक्टोंबरपासून राज्यात ऊसाचा गळीत हंगाम सुरु करण्यात आला आहे. मात्र, एफआरपी थकबाकी असलेल्या साखर कारखान्यांना अद्यापही परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र, ( Nanded Regional Director) नांदेड प्रादेशिक सहसंचालक कार्यालयांतर्गत चार जिल्ह्यातील 27 साखर कारखान्यांनी ऑनलाईन अर्ज केले होते. यामध्ये 18 खासगी तर 9 सहकारी साखर कारखान्यांचा समावेश आहे. पण ज्या साखर कारखान्यांकडे (Outstanding FRP) एफआरपी थकीत आहे त्यांना परवानगी नाकारण्यात आलेली आहे. नाशिक सहसंचालक कार्यालयांतर्गत 6 साखर कारखान्यांकडे तब्बल 32 कोटी 60 लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे कारखान्यांना परवानगी नाकारण्यात आली आहे. शिवाय थकबाकी असलेल्या साखर कारखान्यांनी गाळप सुरु केले तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

ऊस गाळपाचा हंगाम आता बहरात येऊ लागला आहे. त्यामुळे साखर कारखाने सुरु करण्याकडे संचालकांचा कल आहे. मात्र, एफआरपी थकीत असलेल्या साखर कारखान्यांसाठी जी नियमावली साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी जारी केलेली आहे. तीच आजही कायम आहे. यंदा प्रथमच साखर आयुक्तालयाकडून नियमांची अंमलबजावणी होत आहे. त्यामुळे भविष्यात का होईना शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पैसा मिळेल असे चित्र निर्माण झाले आहे.

सहा कारखान्यांकडे 32 कोटी 60 लाखांची थकबाकी

नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयांतर्गत असलेल्या 27 साखर कारखान्यांनी गाळप सुरु करण्यासाठी ऑनलाईन अर्ज केले आहेत. मात्र, यामधील 6 साखर कारखान्यांकडे 32 कोटी 60 लाखाची थकबाकी आहे. त्यामुळे या साखर कारखान्यांना गाळप सुरु करता येणार नाही. शिवाय थकबाकी असतानाही गाळप सुरु केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा साखर सहसंचालक यांनी दिला आहे. एवढेच नाही तर अशा कारखान्या विरुद्ध दंहासह गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती साखर सहसंचालक यांनी दिली आहे.

या 6 साखर कारखान्यांकडे आहे कोट्यावधींची थकबाकी

राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी अर्जाची पडताळणी केली असता 27 साखर कारखान्यांपैकी सहा कारखान्यांनी अद्याप एफआरपी रक्कम दिलेली नाही. यामुळे नांदेडमधील एमव्हीके ग्रो फूड लि.वाघलवाडा, सुभाष शुगर, हडसणी, कुंटूरकर शुगर्स. लातूरमधील श्री साईबाबा शुगर शिवणी, पन्नगेश्‍वर शुगर पानगाव तसेच हिंगोलीमधील टोकाई सहकारी कुरुंदा या कारखान्यांनी 32 कोटी 60 लाख 85 हजारांची एफआरपी थकविली आहे. त्यामुळे त्यांची परवानगी नाकारण्यात आलेली आहे.

अशी आहे साखर कारखान्यांकडे थकबाकी

 * नांदेड : एमव्हीके ग्रो फूड लि. वाघलवाडा – 11 कोटी 30 लाख 38 हजार, सुभाष शुगर, हडसणी – 7 कोटी 65 लाख 58 हजार व कुंटूरकर       शुगर्स, कुंटूर – 2 कोटी 97 लाख 93 हजार.

* हिंगोली : टोकाई सहकारी कुरुंदा – 4 कोटी 60 लाख 71 हजार.

*लातूर : श्री साईबाबा शुगर शिवणी – 3 कोटी 30 लाख 5 हजार व पन्नगेश्‍वर शुगर पानगाव -6 कोटी 25 हजार थकबाकी आहे.

संबंधित बातम्या :

कांदा आणखी रडवणार? आवक घटल्यानं कांद्याचे भाव वधारले 

शेतजमीन विकत घेत आहात का? ‘या’ गोष्टींची घ्या काळजी…!

मराठवाड्यात रब्बीच्या पेरण्या संथ गतीनेच, काय आहेत कारणे ?