मराठवाड्यात उभा राहतोय रेशीम शेतीचा पर्याय, लागवड ते काढणी असे करा नियोजन..!

| Updated on: Apr 07, 2022 | 5:30 AM

जालना हे मराठवाड्यातील रेशीम शेतीचे केंद्र बनले आहे. बाजारपेठेसह या ठिकाणी रेशीम साठवणूकीचे यंत्र उभारण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आता कर्नाटकाची वारी मिटली असून स्थानिक पातळीवरच बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. शिवाय रेशीम महासंचालनालयाच्या भूमिकेमुळे रेशीम शेतीचे क्षेत्रही वाढत आहे. शेतकऱ्यांना आर्थिक हातभार देण्यात रेशीम शेतीचा मोठा वाटा आहे. जालना जिल्ह्यात वर्षागणीस रेशीम शेती क्षेत्रात वाढ होत आहे.

मराठवाड्यात उभा राहतोय रेशीम शेतीचा पर्याय, लागवड ते काढणी असे करा नियोजन..!
मरावाड्यात रेशीम शेतीच्या क्षेत्रात वाढ
Follow us on

जालना : जालना हे (Marathwada) मराठवाड्यातील (Silk Farming) रेशीम शेतीचे केंद्र बनले आहे. बाजारपेठेसह या ठिकाणी रेशीम साठवणूकीचे यंत्र उभारण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आता कर्नाटकाची वारी मिटली असून स्थानिक पातळीवरच बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. शिवाय रेशीम महासंचालनालयाच्या भूमिकेमुळे रेशीम शेतीचे क्षेत्रही वाढत आहे. शेतकऱ्यांना आर्थिक हातभार देण्यात रेशीम शेतीचा मोठा वाटा आहे. (Jalna District) जालना जिल्ह्यात वर्षागणीस रेशीम शेती क्षेत्रात वाढ होत आहे. आतापर्यंत रेशीम महसंचालनालयाच्या वतीने रेशीम शेतीचे महत्व पटवून सांगितले जात होते पण यामध्ये आता खरपुडी कृषी विज्ञान केंद्रानेही सहभाग घेतला असून रेशीम शेतीचे महत्व शेतकऱ्यांना पटवून सांगितले जात आहे. त्यामुळे आगामी जून-जुलैमध्ये याचा फायदा क्षेत्र वाढण्यासाठी होणार आहे.

असे करा लागवड ते काढणीपर्यंतचे नियोजन

रेशीम शेती हा पर्याय मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी नवीन असला तरी योग्य नियोजनातून शेतकऱ्यांच्या पदरी अधिकचे उत्पन्न मिळणार आहे. यामध्ये पहिल्या वर्षी जून ते जुलै या दरम्यान लागवड केल्यास डिसेंबरमध्ये याला पहिले पीक येते. तर दुसऱ्या वर्षी मे ते जून दरम्यान तुतीची तळ छाटणी करुन शेतकऱ्यांना जुलै तर ऑगस्टमध्ये पहिले पीक घेता येणार आहे. ऑक्टोंबरमध्ये दुसरे, जानेवारीमध्ये तिसरे व मार्च ते एप्रिल दरम्यान चौथे पीक घेता येणार आहे. दुसऱ्या वर्षी चारही पिके मिळून एकरी 500 किलो कोष उत्पादन शेतकरी घेऊ शकतात. त्यामुळे हवामानातील बदलानुसार शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल करुन आर्थिक क्षमता वाढवता येणार आहे. शिवाय जालना येथेच बाजारपेठ असल्याने शेतकऱ्यांचा अधिकच्या खर्चातही बचत होणार आहे.

कृषी विज्ञान केंद्राकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

शेतकऱ्यांनी केलेल्या पीक पध्दतीमधील बदलामध्ये कृषी विज्ञान केंद्राचे मोठे योगदान आहे. वातावरणातील बदलाप्रमाणे शेतकऱ्यांनी काय उत्पादन घ्यावे, त्याचे नियोजन कसे असावे याबाबत जालना जिल्ह्यातील खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून सातत्याने मार्गदर्शन केले जाते. दर महिन्याच्या 5 तारखेला हा अभिनव उपक्रम हा पार पाडला जातोच. यामुळे थेट शेतकऱ्यांशी संवादही होतो आणि शेतकऱ्यांना बांधावर पडलेल्या शंकेचे निरसणही होते. या कृषी विज्ञान केंद्राचे 296 वे मासिक चर्चासत्र नुकतेच पार पडले आहे.

खरिपातील सोयाबीनबाबत काय आहे सल्ला?

सोयाबीन हे खरिपातील मुख्य पीक आहे. सध्या उन्हाळी हंगाम अंतिम टप्प्यात असून यानंतर आता खरिपाचीच लगबग सुरु होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मध्यम ते भारी आणि पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीमध्येच सोयाबीनचा पेरा करणे महत्वाचे आहे. हलक्या जमिनीत उत्पादन हे कमी होते. तर ज्या जमिनीत पाणी साचून राहते तिथे सोयाबीनची उगवण होत नाही. ज्या जमिनीचा सामू हा 6 ते 6.5 आहे या क्षेत्रावर पेरा केल्यास सोयाबीन बहरते. शिवाय बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण होण्यासाठी जैविक बुरशीनाशके बीजप्रक्रिया करणे महत्वाचे असल्याचे सोयाबीन पैदासकार डॉ. शिवाजी म्हेत्रे यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

Drone Farming: ‘ड्रोन’ खरेदीबाबत महत्वाचा निर्णय, नियमांचे पालन करा अन्यथा कृषी संस्थांनाचा भुर्दंड

Latur Market : सोयाबीनच्या दरात पुन्हा सुधारणा, शेतकरी करणार का संधीच सोनं…!

Fact Check : काय सांगता? Kisan Credit Card वर आकारले जाणार नाही व्याज..! सरकारची बाजू समजून घ्या अन् गैरसमज दूर करा