PM Kisan: 9.7 कोटी शेतकऱ्यांना राखी पौर्णिमेची भेट, खात्यात इतके कोटी जमा होणार

रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर केंद्र सरकार PM-Kisan योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात 20 वा हप्ता जारी करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतील एका कार्यक्रमात हा हप्ता जारी करणार आहेत.

PM Kisan: 9.7 कोटी शेतकऱ्यांना राखी पौर्णिमेची भेट, खात्यात इतके कोटी जमा होणार
नमो शेतकरी महासन्मान योजनेतंर्गत 1892 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
| Updated on: Jul 30, 2025 | 7:12 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी २ ऑगस्ट रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे आयोजित होणाऱ्या एका कार्यक्रमात पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजनेचा २० वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहेत. यावेळी २०,५०० कोटी रुपयांचा निधी थेट ९.७ कोटी शेतकऱ्यांचा बँक खात्यात जमा केला जाणार आहे. साल २०१९ मध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी ही योजना सुरु करण्यात आली होती.

केव्हा जारी होणार २० वा हप्ता ?

कृषी मंत्रालयाच्यामते २०१९ मध्ये सुरु झालेल्या या योजनेंतर्गत आतापर्यंत सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात १९ हप्त्यांद्वारे एकूण ३.६९ लाख कोटी रुपये जमा केला आहेत. योजनेची २० वा हप्त्यांची माहिती देताना केंद्रीय कृषी मंत्रालयाने बुधवारी एक परिपत्रक जारी करीत सांगितले की २० वा हप्ता २ ऑगस्ट २०२५ रोजी बँकेत जमा केला जाणार आहे. यामुळे ९.७ कोटी शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.

येथे पाहा पोस्ट –

वाराणसीत होणार विशेष कार्यक्रम

केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बुधवारी सोशल मीडियावर एक पोस्ट केली. यात त्यांनी सांगितले की पंतप्रधान मोदी पीएम किसान योजनेचा २० हप्ता वाराणसीतील एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जारी होणार आहे.

काय आहे PM-Kisan योजना?

या पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. ही रक्कम शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांच्या हप्त्यात वर्षातून तीन वेळा त्यांच्या खात्यात थेट जमा केली जाते. या योजनेचा हेतू छोटे शेतकरी आणि अल्पभुधारक यांना आर्थिक मदत करणे हा आहे.

काय आहे पात्रतेचे निकष ?

PM-Kisan योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांजवळ E-KYC वाले बँक खाते हवे, हे शेतकऱ्याच्या आधारकार्ड कार्डशी लिंक असलेले हवे.या सोबत जमीन रेकॉर्ड योग्य आणि अपडेटेड असायला हवे, सरकारच्या वतीने या अटी सांगितलेल्या आहेत. कारण योग्य लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळावा आणि कोणाही गैरव्यवहार होऊ नये याची काळजी सरकार घेत असते.

शेतकऱ्यांना दिलासा

PM-Kisan योजना अल्पभूधारकांसाठी आधार आहे. ज्यांच्याकडे शेतीशिवाय उत्पन्नाचे कोणतेही अन्य साधन नाही त्यांच्यासाठी ही योजना संजीवनी आहे. या शेतकऱ्यांना आपल्या छोट्या-मोठ्या गरजांसाठी कर्ज काढावे लागते. परंतू या योजनेमुळे शेतकऱ्यांना दर तीन महिन्यांनी दोन हजार रुपये मिळतात. त्यामुळे त्यांच्या अडनडीला हा पैसा उपयोगी ठरतो.