AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जन्नत झुबैर आणि तिच्या भावावर मोठं संकट, पनवेलमध्ये दोघांवर हल्ला! कशी आहे दोघांची प्रकृती?

Jannat Zubair And Ayan Zubair Allegedly Attacked : टीव्ही विश्वाताली लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्री जन्नत झुबैर आणि तिच्या भावावर पनवेल येथे हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे अभिनेत्रीचे चाहते देखील चिंतेत आहेत.

जन्नत झुबैर आणि तिच्या भावावर मोठं संकट, पनवेलमध्ये दोघांवर हल्ला! कशी आहे दोघांची प्रकृती?
Jannat Zubair
| Updated on: Mar 16, 2026 | 12:23 PM
Share

Jannat Zubair And Ayan Zubair Allegedly Attacked : टीव्ही विश्वाताली लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्री जन्नत झुबैर आणि तिचा भाऊ अयान झुबैर यांच्याबद्दल मोठी धक्कादायक माहिती समोर येत आहे. असं सांगितलं जात आहे की, जन्नत आणि अयान यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. पनवेल येथे दोघांवर हल्ला झाला आणि हल्ल्यात भाऊ – बहीण जखमी अल्याचं देखील सांगितलं जात आहे. पण याबद्दल अद्याप कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. शिवाय जन्नत आणि अयान यांनी देखील यावर कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही…

जन्नत आणि अयान हल्लात जखमी झाल्याची माहिती समोर येतात चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. शिवाय चाहत्यांनी चिंता देखील व्यक्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जन्नत आणि अयान काही दिवसांपूर्वी पनवेल याठिकाणी गेले होते… तेथे त्यांच्यावर हल्ला झाला…

14 मार्च रोजी सोशल मीडियावर जन्नत आणि अयान यांच्यावर हल्ला झाल्याची एक पोस्ट व्हायरल झाली होती. ज्यामुळे दोघे जखमी असल्याची माहिती चाहत्यांपर्यंत पोहोचली. पण, जन्नत जुबैर, तिच्या कुटुंबियांनी किंवा पनवेल पोलिसांनी अद्याप कोणतेही अधिकृत विधान जारी केलेलं नाही. त्यामुळे नक्की कधी आणि काय घडलं याबद्दल कोणतीच माहिती समोर आलेली नाही.

जन्नत जुबैर हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, बालकलाकार म्हणून तिने अभिनय विश्वात पदार्पण केलं. ‘फुलवा’ मालिकेमुळे जन्नत हिच्या चाहत्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली. त्यानंतर जन्नत हिने कधी मागे वळून पाहिलंच नाही. जन्नत हिने टीव्ही विश्वासोबत अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये देखील नशीब आजमावलं आहे… अभिनेत्री राणी मुखर्जी स्टारर ‘हिचकी’ ते अभिनेत्री श्रद्धा कपूर स्टारर ‘लव का दी एंड’ सिनेमात जन्नत हिने काम केलं आहे.

जन्नत जुबैरप्रमाणेच त्याचा भाऊ अयान जुबैरनेही टीव्ही शोमध्ये आपला हात आजमावला आहे. त्याने “जोधा अकबर” या लोकप्रिय मालिकेत प्रिन्स सलीमची भूमिका साकारली होती. आता तो सोशल मीडियाद्वारे त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो.

Follow Us
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!