AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड

Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड

| Updated on: Jul 01, 2026 | 4:20 PM
Share

मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को ड्रग्ज प्रकरणात वनराई पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवत आणखी एका आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणातील हा १३ वा आरोपी असून, दीपक हमलानी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, सहआरोपीने ड्रग्जचे एक पॅकेट दीपक हमलानी याच्याकडे ठेवण्यासाठी दिले होते. मात्र, त्या पॅकेटमध्ये नेमके काय आहे, याची कोणतीही माहिती नव्हती, असा दावा हमलानीने चौकशीदरम्यान पोलिसांसमोर केला आहे.

हे प्रकरण एप्रिल महिन्यात गोरेगाव येथील नेस्को परिसरात आयोजित करण्यात आलेल्या एका कॉन्सर्टनंतर समोर आले होते. कॉन्सर्टदरम्यान कथितरित्या एक्स्टसी (Ecstasy) गोळ्यांचे सेवन केल्यानंतर एका एमबीए विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पोलिसांनी ड्रग्ज पुरवठा साखळीचा तपास सुरू केला असून आतापर्यंत १३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास व नराई पोलीस करत असून, ड्रग्ज रॅकेटशी संबंधित आणखी काही धागेदोरे मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Published on: Jul 01, 2026 04:20 PM

Follow Us