
PM Kisan Yojana 22th Instalment Farmer ID: पंतप्रधान शेतकरी सन्माननिधी योजना अल्पभूधारक शेतकऱ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. या योजनेचे 21 हप्ते आतापर्यंत वितरीत करण्यात आले आहे. या योजनेत वार्षिक 6 हजार रुपयांचा लाभ देण्यात येतो. दोन हजार रुपयांचे तीन हप्ते थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येतात. सध्या काही राज्यात केंद्राच्या या योजनेप्रमाणेच शेतकऱ्यांसाठी थेट लाभ योजना राबविण्यात येत आहे. पीएम किसान योजनेचा 22 वा हप्ता नवीन वर्षात शेतकऱ्यांना मिळेल. पण त्यापूर्वी केंद्र सरकारने एक अट घातली आहे. त्यानुसार, शेतकऱ्यांना फार्मर आयडी जोडल्याशिवाय या योजनेचा लाभ घेता येणार नाही, कसा तयार करणार फार्मर आयडी? जाणून घ्या.
काय आहे शेतकरी ओळखपत्र (Farmer ID Details)
शेतकरी योजनेत बोगस लाभार्थ्यांना चाप बसावा. या राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ किती शेतकऱ्यांना मिळतो याची माहिती समोर यावी यासाठी शेतकऱ्यांचे ओळखपत्र तयार करण्यात येत आहे. त्यालाच फार्मर आयडी असं म्हणतात. हे शेतकऱ्यांचे डिजिटल प्रोफाईल आहे. यामध्ये शेतकऱ्यांची सर्व माहिती जतन आहे. शेतकऱ्याची जमीन कुठे आणि किती आहे. त्याच्या शेतात सध्या कोणते पीक आहे यासह इतर माहिती यामध्ये जतन होते.
असे तयार करा फार्मर आयडी (How to make Farmer ID?)
पहिली स्टेप
फार्मर आयडी तयार करण्यासाठी अगोदर AgriStack Portal वर जाऊन युझर आयडी तयार करावी लागते.येथे ‘Create New User’ च्या पर्यायावर क्लिक करा. अटी आणि शर्तीचा फॉर्म सबमिट करा. यानंतर आधार कार्डशी लिंक मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल. व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करा. पुन्हा एकदा हिच प्रक्रिया पूर्ण करा. ओटीपीने व्हेरिफाय करा.
दुसरा स्टेप
आता नवीन पासवर्ड तयार करा आणि तो सेव्ह करा
आता या नवीन आयडी आणि पासवर्डसह लॉगिन करा
लॉगिन झाल्यावर ‘Farmer Type’ मध्ये ‘Owner’ निवडा
यानंतर ‘Fetch Land Detail’ वर क्लिक करा
आता जमिनीचा खासरा क्रमांक आणि जमिनीची इतर माहिती नोंदवा
तिसरी स्टेप
आता व्हेरिफिकेशन करा. नंतर ‘Social Registry Tab’ उघडा
या ठिकाणी शेतकऱ्याला फॅमिली आयडी अथवा रेशन कार्डची माहिती द्यावी लागेल
त्यानंतर’Department Approval मध्ये Revenue Department’ निवडा
या प्रक्रियेनंतर ‘Consent’ वर टिक करुन डिजिटल स्वाक्षरी करावी लागेल
या सर्व प्रक्रियेनंतर फार्मर आयडी तयार होईल