PM Kisan Yojana: कुणाचा अडकणार 23 वा हप्ता? प्रत्येक प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्या
PM Kisan Yojana 23rd Installment: पीएम किसान योजनेचा 22 वा हप्ता गेल्या महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. आता पुढील 23 व्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. पण या शेतकऱ्यांची ती रक्कम अडकू शकते. त्यासाठी ही प्रक्रिया अगोदर करावी लागेल.

PM Kisan Yojana 23rd Installment: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतंर्गत केंद्र सरकार लवकरच कोट्यवधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नवीन हप्ता जमा करेल. त्यासाठीची तयारी सरकारी पातळीवर सुरू आहे. पंतप्रधान मोदी यांनी यापूर्वी 13 मार्च 2026 रोजी यशस्वीरित्या 22 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला. देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये थेट जमा झाले. आता शेतकऱ्यांना 23 व्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. पण या शेतकऱ्यांच्या तो हप्ता अडकू शकतो. त्यासाठी त्यांना काही प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.
कधी जमा होणार 23 वा हप्ता?
तज्ज्ञ आणि काही वृत्तानुसार, सरकार जून महिन्यात म्हणजे शेतीची बि-बियाणे खरेदी करताना दोन हजार रुपये जमा करू शकते. तर काहींच्या मते जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही हा हप्ता जमा होऊ शकतो. पंतप्रधान शेतकरी सन्माननिधी प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांना अगोदर ई-केवायसी आणि बँक विवरण पूर्णपणे अपडेट करावे लागेल. अनेक शेतकऱ्यांच्या मनात असा प्रश्न येतो की, कोणत्या कारणामुळे त्यांचा पीएम किसानचा हप्ता थांबवल्या जाऊ शकतो.
या कारणामुळे थांबवल्या जाऊ शकतो हप्ता
e-KYC अपूर्ण – जर तुम्ही वेळोवेळी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल. अथवा ती अपूर्ण असेल तर ही रक्कम थांबवली जाऊ शकते.
भू-सत्यापन – शेतकऱ्याच्या अर्ज प्रक्रियेत जमिनीचा रेकॉर्ड अत्यंत गरजेचा आहे. जर भू सत्यापन प्रक्रिया रखडलेली असेल तर मग पीएम किसानचा हप्ता मिळणार नहाी.
बँक खाते आणि आधार लिंक – शेतकऱ्यांचे बँक खाते हे आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे. त्यात NPCI मॅपिंग सक्रिय असणे आवश्यक आहे.
पात्रता यादीतून कोण बाहेर?
जर कुटुंबातील सदस्य हा सरकारी नोकरीत असेल अथवा सरकारी निवृत्त सेवक असेल तर त्याला योजनेचा लाभ मिळत नाही
मागील आर्थिक वर्षात त्याने आयकर भरला असेल तर त्या शेतकऱ्यालाही या योजनेचा लाभ मिळत नाही
एखाद्या घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीला या योजनेचा कोणताही आर्थिक लाभ मिळत नाही
हप्ता अडकला तर करणार काय?
PM Kisan पोर्टलवर जाऊन ‘Know Your Status’ या पर्यायावर अर्जाची स्थिती जाणून घ्या
तुमच्या नावाचे स्पेलिंग, बँक खाते चुकीचे आहे का याची खात्री करून घ्या
काही चूक असल्यास ‘Edit Registration Details’ द्वारे ते दुरुस्त करा
तरीही अडचण असेल तर पीएम किसानची अधिकृत हेल्पलाईन क्रमांक 155261 वर कॉल करा