लय भारी! शेतकऱ्यांसाठी एमओएफएसने दिली ‘ही’ खूश खबर!

| Updated on: Dec 20, 2020 | 8:55 AM

नवी दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असलं तरी शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. ( rabi season could be better in the midst of farmers protest)

लय भारी! शेतकऱ्यांसाठी एमओएफएसने दिली ही खूश खबर!
Follow us on

नवी दिल्ली: नवी दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असलं तरी शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. यंदा रब्बी सीजनसाठी योग्य वातावरण असल्याचं मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या (एमओएफएस) अहवालात म्हटलं आहे. खत आणि अॅग्रोकेमिकलच्या दिग्गजांनी 2एचएफवाय21मध्ये चांगली कामगिरी होण्याची शक्यता वर्तवली आहे. अवकाळी पावसामुळे काही राज्यात कृषी उत्पादन घटणार असलं तरी चांगल्या पावसामुळे खत आणि अॅग्रोकेमिकलच्या उत्पादनात मोठी वाढ झाल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ( rabi season could be better in the midst of farmers protest)

रसायने आणि खत मंत्रालयानुसार दरवर्षी या काळात 1 एचएफवाय 21 मध्ये 15 टक्क्याने विक्री वाढून 3.4 कोटी टन होते आणि डीएपी आणि एनपीकेएसमध्ये क्रमश: 28 टक्के आणि 24 टक्क्याने वाढ होते. याप्रमाणे यूरियामध्ये सात टक्क्याने वाढ झाल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

सलग दुसऱ्या वर्षी साधारण ते अधिक पाऊस पडल्याने उद्योगामध्ये सुधारणा झाली आहे. चांगल्या पावसामुळे पेरणीच्या क्षेत्रात 111.7 मीटर हेक्टरमध्ये पाच टक्क्याने वाढ झाली असल्याचंही या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. 1एचएफवाय 21 मध्ये खताच्या विक्रीत डीएपी आणि एनकेएसमध्ये क्रमश: 28 आणि 24 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. देशातील शेतकरी आंदोलन अजूनही सुरू आहे. अशावेळी यंदा शेतीत चांगलं उत्पादन होणार असल्याचं वृत्त आल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ( rabi season could be better in the midst of farmers protest)

 

संबंधित बातम्या:

आता तीन कागदपत्रांद्वारे मिळणार शेतकरी क्रेडिट कार्ड; कार्डावर मिळणार ‘इतकं’ कर्ज

दरवर्षी 75 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात; जाणून घ्या मोदींची विशेष योजना

कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी ‘या’ पोर्टलवर अर्ज करा, 31 डिसेंबर शेवटची तारीख