करमाळा तालुक्यातील शेतकऱ्याच्या मुलाचा पराक्रम, सौरऊर्जेवर चालणाऱ्या बोटीची निर्मिती, नागरिकांकडून कौतुक

शेती करीत असताना सामान्य शेतकऱ्यांना अनेकदा अडचणीचा सामना करावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांनी त्यावर कायमचा तोडगा काढला असल्याचे वारंवार पाहण्यात आले आहे.

करमाळा तालुक्यातील शेतकऱ्याच्या मुलाचा पराक्रम, सौरऊर्जेवर चालणाऱ्या बोटीची निर्मिती, नागरिकांकडून कौतुक
solapur karmala solar boat
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Mar 09, 2023 | 1:27 PM

शितलकुमार मोटे, करमाळा : शेतकरी (Solapur farmer) हा अनंत अडचणीवर मात करून आपली शेती (farmer) करीत असतो. त्याचबरोबर मिळालेल्या पैशातून आपल्या परिवाराची काळजी घेत असतो. त्याचबरोबर शेतकरी प्रत्येकवेळी आपल्या कामात अधिक प्रयोग करीत असतो. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या मुलांनी चांगली शेतीच्या फायद्याची उपकरण तयार केली आहेत. त्याचपद्धतीने करमाळा (karmala) तालुक्यातील भिवरवाडी येथील शेतकरी कुटुंबातील श्रीहरी जाधव या उच्चशिक्षित तरुणाने संपूर्णपणे सौरऊर्जेवर चालणारी बोट विकसित केली आहे. या बोटीचा प्रवास यशस्वी ठरल्याने श्रीहरी जाधव यांचे करमाळा तालुक्यातून कौतुक केले जात आहे.

स्वतः सौरऊर्जेवर चालणारी बोट तयार केली

करमाळा तालुक्यातील भिवरवाडी, ढोकरी, बिटरगाव, वांगी 1, 2, 3, शेलगाव,सांगवी, या परिसरातील नागरिकांना दैनंदिन कामासाठी तसेच वैद्यकीय सुविधा मिळवण्यासाठी इंदापूरला जावे लागते. यासाठी टेंभुर्णी मार्गे 70 किलोमीटरचा वळसा घालून जावे लागत होते. त्यावर मात करण्यासाठी सुरुवातीला सन 2019 मध्ये डिझेल इंजिनवरील बोट सेवा बंद पडली. यावर पर्याय म्हणून श्रीहरी जाधव यांनी सौरऊर्जेवरील सर्व साहित्य आणून स्वतः सौरऊर्जेवर चालणारी बोट तयार केली आहे. या बोटीच्या माध्यमातून ढोकरी (करमाळा) ते शहा (इंदापूर) या गावादरम्यान या बोटीने फेऱ्या मारण्यासाठी यशस्वी प्रवास केलेला आहे.त्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थ अधिक खूष आहेत.

पारंपारिक पद्धतीने शेती करण्यापेक्षा आधुनिक पद्धतीने शेती करावी

शेती करीत असताना सामान्य शेतकऱ्यांना अनेकदा अडचणीचा सामना करावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांनी त्यावर कायमचा तोडगा काढला असल्याचे वारंवार पाहण्यात आले आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या काही मुलांनी पारंपारिक शेतीला छेद देत चांगल्या बागा फुलवल्या आहेत. त्याचबरोबर त्यातून लाखो रुपयांची कमाई सुध्दा केली आहे. त्यामुळे पारंपारिक पद्धतीने शेती करण्यापेक्षा आधुनिक पद्धतीने शेती करावी असा सल्ला सुध्दा तरुण देत आहेत.

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान

सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला असून शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सगळ्या शेतकऱ्यांचं लक्ष सरकारच्या मदतीकडे लागलं आहे.