Success Story : ऊसाचे उत्पादन अन् जोडीला रसवंतीचा व्यवसाय, ना गाळपाची चिंता ना एकरकमी ‘एफआरपी’ चा प्रश्न

| Updated on: May 05, 2022 | 4:37 PM

तुकाराम शिंगणे यांना नागपूर-पुणे या मुख्य मार्गावर 4 एकर शेती आहे. दरवर्षी दीड एकरामध्ये ऊसाचे उत्पादन हे ठरलेलेच आहे तर उर्वरीत क्षेत्रात पारंपरिक पीके. मात्र, उन्हाळा सुरु होताच या भागातील नारगिकांना उत्सुकता असते ती शिंगणे यांच्या रसवंती गृहाची. गेल्या 10 वर्षापासून ते ही रसवंती चालवित आहेत. देऊळगाव मही येथील आठवडी बाजार असला तरी परिसरातील लोक हे रस पिण्यासाठी गावाबाहेर 3 किमी येतात आणि रस पितात.

Success Story : ऊसाचे उत्पादन अन् जोडीला रसवंतीचा व्यवसाय, ना गाळपाची चिंता ना एकरकमी एफआरपी चा प्रश्न
ऊसाचे उत्पादन अन् जोडीला रसवंतीगृह व्यवसायाची जोड देऊन शेतकऱ्याने उत्पादनात वाढ केली आहे.
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

बुलडाणा: राज्यात भोंग्याच्या मुद्द्यानंतर चर्चेत असलेला विषय म्हणजे (Surplus Sugarcane) अतिरिक्त उसाचा प्रश्न. उसाच्या क्षेत्रात वाढ झाल्याने यंदा तो अधिक तीव्रतेने जाणवू लागला आहे. वाढत्या क्षेत्रामुळे ही समस्या उद्भवणारच होती. त्यामुळेच देऊळगाव मही येथील (Farmer) शेतकऱ्याने अशी काय नामी शक्कल लढवली आहे की त्यांना आतापर्यंत ना ऊस (Sugar Factory) साखर कारखान्याला पाठवावा लागला आहे ना एफआरपी साठी कारखान्याचे उंबरठे जिझवावे लागले आहेत. आता हे कसे शक्य आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल पण हे खरंय. उसाची लागवड करतानाच तुकाराम शिंगणे यांनी शेताला लागून असलेल्या मुख्य मार्गावर रसवंती सुरु केली होती. उन्हाळ्यात रसवंतीसाठी लागेल एवढ्याच दीड एकरामध्ये ते ऊसाची लागवड करतात आणि उसाची विक्री न करता सर्व ऊस रसवंतीसाठीच वापरतात.

‘थंडगार रस’ करण्याचाही वेगळाच अंदाज

नागपूर-पुणे राष्ट्रीय महामार्गाला लागूनच बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव मही येथील शेतकरी तुकाराम शिंगणे यांचे 4 एकर शेत आहे. मुख्य रस्त्यावर रसवंती गृह हे टाकायचे म्हणून टाकले नाही तर येथील थंडगार रस पिण्यासाठी 4 किलोमिटरहून नागरिक रसवंतीगृह जवळ करतात. या रसवंती चे आगळेवेगळे वैशिष्टय असून रसात बर्फाचा वापर केला जात नाही. तरीही रस हा थंडगार असतो, उसाचे तुकडे करून ते फ्रीजमध्ये ठेवले जातात. आणि त्याचाच रस केला जातो. तर रसवंती चे दुसरे वैशिष्टय म्हणजे या ठिकाणी जो कोणी ग्राहक म्हणून रसवंती मध्ये येईल त्याच्या अंगावर पाण्याचे थंडगार बारीक फवारे पडतात , त्यामुळे गिर्हाईक एकदम थंड होऊन जातो. थंडगार रसाची चवच न्यारी असल्याने येणारा प्रत्येकजण एक ग्लास नव्हे तर रसाचा दोन किंवा तीन ग्लास तरी रचतातच.

4 एकरात दीड एकर ऊस हा ठरलेलाच

तुकाराम शिंगणे यांना नागपूर-पुणे या मुख्य मार्गावर 4 एकर शेती आहे. दरवर्षी दीड एकरामध्ये ऊसाचे उत्पादन हे ठरलेलेच आहे तर उर्वरीत क्षेत्रात पारंपरिक पीके. मात्र, उन्हाळा सुरु होताच या भागातील नारगिकांना उत्सुकता असते ती शिंगणे यांच्या रसवंती गृहाची. गेल्या 10 वर्षापासून ते ही रसवंती चालवित आहेत. देऊळगाव मही येथील आठवडी बाजार असला तरी परिसरातील लोक हे रस पिण्यासाठी गावाबाहेर 3 किमी येतात आणि रस पितात. ग्राहकांचे समाधान हिच आपली कमाई असल्याची त्यांची भावना आहे.

हे सुद्धा वाचा

कारखान्यावर गाळपच नाही

आता सध्या ऊस उत्पादकांची अवस्था पाहिली तर सर्वात मोठ्या नगदी पिकाची काय अवस्था आहे याचा प्रत्यय येईल. जो-तो ऊसाचे गाळप कऱण्यासाठी कारखान्याचे उंबरठे झिजवत आहे. पण तुकाराम शिंगणे यांनी आतापर्यंत कारखान्याची पायरी चढली नाही त कुण्या साखर कारखान्याचे ते सभासद नाहीत. वेगळी वाट निवडल्यावर काय होऊ शकते हे त्यांनी दाखवून दिले आहे.