Farmer: अवकाळीमुळे सर्वकाही व्यर्थ मात्र, चंद्रपुरात कृषी विभागाचा चक्रावून टाकणारा दावा

| Updated on: Jan 13, 2022 | 11:53 AM

गेल्या दोन दिवसांमध्ये वर्धा आणि अमरावती जिल्ह्यातील कृषी विभागाने शेतकऱ्यांप्रती घेतलेली भूमिका कौतुकास्पद आहे. नुकसानीनंतर अवघ्या दोन दिवसांमध्ये येथील जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्यावतीने नुकसानीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून हा अहवाल शासन दरबारीही पाठविण्यात आला होता. मात्र, चंद्रपुरातील कृषी विभागाने केलेल्या दाव्यामुळे शेतकरीच नाही तर सर्वसामान्य नागरिकही चक्रादून जाईल.

Farmer: अवकाळीमुळे सर्वकाही व्यर्थ मात्र, चंद्रपुरात कृषी विभागाचा चक्रावून टाकणारा दावा
अवकाळी पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यात रब्बीसह खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे.
Follow us on

चंद्रपुर : गेल्या दोन दिवसांमध्ये वर्धा आणि अमरावती जिल्ह्यातील (Agricultural Department) कृषी विभागाने शेतकऱ्यांप्रती घेतलेली भूमिका कौतुकास्पद आहे. नुकसानीनंतर अवघ्या दोन दिवसांमध्ये येथील जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्यावतीने नुकसानीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून हा अहवाल शासन दरबारीही पाठविण्यात आला होता. मात्र, (Chandrapur) चंद्रपुरातील कृषी विभागाने केलेल्या दाव्यामुळे शेतकरीच नाही तर सर्वसामान्य नागरिकही चक्रादून जाईल. आता तुम्हाला वाटेल असा काय जावाई शोध लावला आहे, कृषी विभागाने म्हणून. पण या विभागाने दोन दिवसापूर्वी झालेला पाऊस हा नुकसानीचा नसून फायद्याचे असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे नुकसान भरपाईचे तर सोडाच पण या अजब दाव्यामुळे शेतकऱ्यांनी नेमकी काय भूमिका घ्यावी हे सुध्दा स्पष्ट होईना झाले आहे. या पावसामुळे(Rabi Season) रब्बी हंगातील गहू, हरभरा, ज्वारी या पिकांचे तर नुकसान झालेच आहे पण खरीपातील कापूस तूर या पिकांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे.

मुख्य पिकांसह भाजीपाला पाण्यात

चंद्रपूर जिल्ह्यात गेले 3 दिवस कमी अधिक प्रमाणात पाऊस बरसतोय. जिल्ह्यातील काही भागात जोरदार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या आहेत. या पावसाने शेत पिकांचे मोठे नुकसान केले. चिमुर तालुक्यातील पळसगाव परिसरात जोरदार पाऊस झाला. तुर, हरबरा, लाखोळी या पिकांना पाऊस मारक ठरला आहे. राजूरा तालुक्यात येणाऱ्या भेंडवी परिसरात पावसामुळे मिर्ची पिकांचे मोठे नुकसान झाले. मुल, सावली तालुक्यात भाजीपाला पिक भुईसपाट झाले. त्यामुळे खरीप हंगामाप्रमाणे रब्बीतही निसर्गाचा लहरीपणा कायम आहे.

काय आहे कृषी विभागाचा दावा?

जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसामध्ये सातत्य आहे. त्यामुळे रब्बी हंगामासह खरिपातील पिकांचे न भरुन निघणारे नुकसान असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे. मात्र, जिल्ह्यात पाऊस झाला आहे पण सध्या सूरू असलेला अवकाळी हरबरा, ज्वारी, करडई पिकासाठी उपयुक्त असल्याचे कृषी विभागाचे मत आहे. जिल्ह्यात काही तुरळक ठिकाणी नुकसान झाले आहे. मात्र मोठे नुकसान जिल्ह्यात झाले नाही त्यामुळे कृषी विभागाचा हा दावा म्हणजे अंधारात ठेवणारीच बाब असल्याचे म्हणणे शेतकऱ्यांचे आहे.

मजूरांअभावी रखडली कापूस वेचणी

खरिपातील केवळ कापूस पीक सध्या शेतामध्ये ऊभे आहे. सातत्याने वातावरणातील बदलामुळे कापूस वेचणीला अडचण निर्माण झाली होती. आता तर आता मजूरांची टंचाई असल्याने ही शेती कामे रखडलेली आहेत. बोंडगळती होऊन कापसाचे नुकसान होत आहे. गोंडपिपरी तालुक्यात मजूरांची समस्या मोठी आहे. त्यामुळे आजही अनेक शेतातील कापुस वेचणी शिल्लक आहे. अवकाळी पावसाने कापुस पिकाचे मोठे नुकसान झाले. कापुस काळवंडला तर अनेक शेतात कापुस गळून पडला आहे. सध्या कापसाला विक्रमी दर असताना शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत असे नुकसान होत आहे.

संबंधित बातम्या :

Farmer Advice: वाढलेली हुडहुडी अन् घटलेल्या तापमानाचा रब्बी पिकांवर परिणाम, कृषी विज्ञान केंद्राचा काय आहे सल्ला?

Cotton Rate : कापसाचे उत्पादन घटले मात्र, विक्रमी दरामुळे भरपाई, काय आहे विदर्भातले चित्र?

Start Up : शेतकऱ्याच्या मुलाने लावला स्वयंचलित फवारणी यंत्राचा शोध, 15 राज्यांमध्ये विस्तार अन् लाखोंची कमाई