पारंपरिक पिकांवर कृषी विभागानेच शोधला पर्याय अन् नगर जिल्ह्यात झाला हा बदल, वाचा सविस्तर

| Updated on: Jan 17, 2022 | 11:25 AM

पारंपारिक पिकामधून उत्पादनात घट अन् अधिकचा खर्च हे सर्वश्रुत असले तरी बदल करतो कोण? दरवर्षीचा अनुभव असतानाही शेतकरी चाढ्यावर मूठ ठेवताना दरवर्षी घेतलेल्या पिकांनाच महत्व देतो. पण कृषी विभागाने यामध्ये पुढाकार घेतल्यावर काय होऊ शकते हे नगर जिल्ह्यातील संगमेन तालुक्यातील पीक पध्दतीवरुन लक्षात येते.

पारंपरिक पिकांवर कृषी विभागानेच शोधला पर्याय अन् नगर जिल्ह्यात झाला हा बदल, वाचा सविस्तर
रब्बी हंगामामध्ये पीक पध्दतीमध्ये बदल झाला असून शेतकऱ्यांनी तेलबियांवर भर दिला आहे
Follow us on

अहमदनगर : पारंपारिक पिकामधून उत्पादनात घट अन् अधिकचा खर्च हे सर्वश्रुत असले तरी बदल करतो कोण? दरवर्षीचा अनुभव असतानाही शेतकरी चाढ्यावर मूठ ठेवताना दरवर्षी घेतलेल्या पिकांनाच महत्व देतो. पण (Agricultural Department) कृषी विभागाने यामध्ये पुढाकार घेतल्यावर काय होऊ शकते हे नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील पीक पध्दतीवरुन लक्षात येते. मोहरी हे तसे उत्तर भारतामधले पीक आहे. मात्र, कडधान्याचे बाजारपेठेतले वाढते महत्व पाहता याबाबत कृषी विभागाने जनजागृती केली. केवळ जागृतीची मोहीमच राबवली नाही तर या (Rabi Season) रब्बी हंगामात तालुक्यातील 8 गावांमध्ये सुमारे 90 एकरामध्ये प्रायोगिक तत्वावर हा प्रयोगही केला. याकरिता महत्वाचे असणाऱ्या बियाणांचा पुरवठा केला. त्यामुळे नगर जिल्ह्यात पहिल्यांदाच (Change in crop pattern) पीक पध्दतीमध्ये बदल झाला आहे. या यशस्वी प्रयोगामुळे भविष्यात का होईना येथील मोहरीच्या क्षेत्रात वाढ होईल असा विश्वास कृषी विभागाला आहे.

कसा राहिला कृषा विभागाचा पुढाकार?

पश्चिम महाराष्ट्रातही दरवर्षी रब्बी हंगामात शेतकऱ्यांचा भर हा गहू पिकावरच राहिलेला आहे. मात्र, वातावरणातील बदल आणि घटत्या दरामुळे शेतकऱ्यांना पाहिजे नफा मिळत नसल्याने कृषी विभागानेच या पीक पध्दतीमध्ये बदल करण्याचा निर्धार केला. त्यानुसार उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांनी या करिता नागपूर कृषी महाविद्यालयात संपर्क करुन सुधारित वाण उपलब्ध करुन घेतले. त्यानुसार टी.ए.एम 108-1 हे वाण शेतकऱ्यांना गटामार्फत वाटप केले. त्यामुळे शेतकऱ्यांनाही विश्वास निर्माण झाला होता. पीक पध्दतीमध्ये बदल करण्यास शेतकरी धजत नव्हते मात्र, कृषी अधिकाऱ्यांनी पीक पध्दतीमधील बदलाचे महत्व सांगितले त्यामुळेच हा बदल झाल्याचे शेतकरी सांगत आहेत.

8 गावे 90 एकरामध्ये मोहरीचा पेरा

ज्या गावांमध्ये केवळ गव्हाचे पीक घेतले जात होते त्या गावांमध्ये आता बदल होत आहे. संगमेनर तालुक्यातील 8 गावांमध्ये 90 एकरामध्ये मोहरीची लागवड केली आहे. मोहरी हे कडधान्य असून बाजारपेठेत या पीकाच्या दरात सुधारणा होत आहे. त्यामुळे काळाच्या ओघात शेतकऱ्यांनी हा बदल स्वीकारावा याकरिता कृषी विभागाने केलेली जनजागृती अखेर कामी आली असून या जिल्ह्यामध्ये बदल सुरु झाला आहे. शिवाय दीड महिन्यानंतर हे पीक बहरात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचाही आत्मविश्वास वाढला असून आता उत्पादन वाढीवर भर देणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

मोहरी फुलोऱ्यात

रब्बी हंगामात पेरा केलीली मोहरी सध्या फुलोऱ्यात आहे. पेरणीपूर्वची मशागत, योग्य बियाणे आणि शेतकऱ्यांची मेहनत आता कामी येत आहे. दरवर्षी गहू, हरभरा, ज्वारी या पारंपारिक पिकांमधून शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळत नव्हते. मात्र, योग्य पर्यायही समोर नसल्याने पारंपारिक पिकावर त्यांचा भर राहत होता. मात्र, कृषी विभागाकडून सुधारित वाणाचे बियाणे आणि केलेली जनजागृतीमुळे हा बदल दिसत आहे. आता प्रयोग तर यशस्वी झाला आहे शेतकऱ्यांसह कृषी अधिकाऱ्यांना अपेक्षा आहे ती उत्पादनावाढीची अशी प्रतिक्रिया तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांनी व्यक्त केली आहे.

संबंधित बातम्या :

Rabi Season: अवकाळी, गारपिटीनंतर आता धुक्याचे सावट, खरिपापाठोपाठ रब्बीही धोक्यात

Organic Farming: सेंद्रीय पध्दतीने पिकवलेला टोमॅटो 400 रुपये किलो अन् वर्षभर उत्पादन

Sugarcane Sludge: मराठवाड्यात साखरेचे उत्पादन 1 कोटीवर, तरीही अतिरिक्त ऊसाचा प्रश्न ऐरणीवर, काय आहेत कारणे?